29/10/2025
दोन दिवसांच्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये केवळ थेरपी शिकवली जात नाही, तर आत्मअनुभवाचा एक सुंदर प्रवास घडतो. या शिबिरात पास्ट लाइफ रीग्रेशन थेरपी कशी कार्य करते हे सविस्तरपणे समजावून सांगितले जाते. जागृत मन आणि निद्रिस्त मन यांचा परस्पर संबंध, तसेच डावा आणि उजवा मेंदू आपले विचार, भावना आणि कृतींवर कसा प्रभाव टाकतात हे प्रत्यक्ष उदाहरणांसह समजून घेतले जाते.
यासोबतच आपल्या स्वप्नांचा अर्थ, कर्म सिद्धांत, आणि आत्म्याची उत्क्रांती कशी होत गेली याबद्दलचे ज्ञानही दिले जाते. थेरपीच्या माध्यमातून मनाच्या खोल थरांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया समजून घेतली जाते.
शिबिरात श्वासांचे विविध आयाम, ध्यानाचे प्रयोग, आणि प्रत्यक्ष थेरपीचे प्रॅक्टिकल्स करून अनुभव मिळवला जातो. प्रत्येक सहभागीला स्वतःचा अनुभव घेऊन अंतर्मनाशी संवाद साधण्याची संधी मिळते.
या दोन दिवसांच्या प्रवासात ज्ञान, अनुभव, सराव आणि पुढील मार्गदर्शन — हे सर्व एकत्र मिळून एक आत्मशोधाचा आणि अंतःशांतीचा अनुभव घडवतात.
येत्या एक आणि दोन नोव्हेंबरला विलेपार्ले पूर्व मुंबई येथे शिबीर घडत आहे
ऍडमिशन सुरू आहेत
प्रशिक्षिका संगीता शेंबेकर
9920576115
(उगाचच फोन अथवा मेसेज केल्यास गप्पा मारण्यासाठी ह्या फोनचा वापर केल्यास ताबडतोब ब्लॉक केले जाईल )