Ganesh Athalye Guruji

Ganesh Athalye Guruji ज्योतिषी व धार्मिक विधी

03/12/2024

🔅 🔅 🔅 🔅 🔅 🔅 🔅 🔅
सध्या महापुरुषांच्या नावाने आपली दुकाने चालवण्यासाठी अध्यात्माचे मार्केटिंग करणे जोरात चालू आहे.! वास्तविक पहाता परमेश्वराला मनातून निर्मळ अंतःकरणाने केली जाणारी भक्ती कशी प्रिय आहे हे ठासून पटवून सांगणे म्हणजे *अध्यात्म* आहे.याऐवजी समस्याग्रस्त माणसांना देहाच्या आकर्षणात गुंतवून कर्मकांडाच्या नादी लावणारे स्वतःला रंगवून नटूनथटून येणारे हे स्टेजगुरू ,कथेकरी, लाखोच्या संख्येने दिसून येत आहेत.! दोरेगंडे, माळा,रुद्राक्ष, शिवलिंग,यांची अमिशे दाखवून ! एका अर्थाने अधोगतीचाच मार्ग दाखवताना दिसून येत आहेत.!! अध्यात्म हा देहाचा खेळ नाही.! चित्तशुद्धी करूनच या खेळात भाग घेता येतो.! जो या कर्मकांडात गुंतेल तो संपुष्टात येईल !असे म्हणणे वावगे ठरणार नाही![ पटले तर घ्या!]

02/08/2024

सहनं सर्वदुःखानामप्रतीकारपूर्वकम् |
चिन्ताविलापरहितं सा तितिक्षा निगद्यते ||

विवेकचूडामणि, २४.

31/07/2024

मेशं केशं सुशंभु, भुवनवनवहं, मारहं रत्नरत्नं ।
वंदे श्री देवदेवं सगुणगुरुगुरुं, श्रीकरं कंजकंजम् ।।
मामज्ञं मत्तभर्भ भवदव सुवहं वासनासर्वसंधे |
मातः पातः सुतस्ते वहरहसि हरे देशिके शिष्य शिष्यम् ||

26/07/2024

- यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः । न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्‌ ॥ १६-२३ ॥तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ । ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥

18/07/2024
26/08/2023

नमस्कार मंडळी 30 तारखेला रक्षाबंधन आहे काही लोकांच्या मते त्या दिवशी सकाळी दहा वाजून 59 मिनिटे ते रात्री नऊ वाजून दोन मिनिटे पर्यंत भद्रा आहेत म्हणून रात्री रक्षाबंधन करावे परंतु हा उत्सव प्रतीकात्मक असल्यामुळे त्याचा बदलाशी काही संबंध व अडचण नाही आपण सूर्योदय ते सूर्यास्त या काळामध्ये रक्षाबंधन करण्यास काहीही हरकत नाही

07/08/2023

अधिकमास – या काळात पुढील व्रत तथा पुण्‍यकारी कृत्‍य करावे
अधिकमासात श्रीपुरुषोत्तमप्रीत्यर्थ महिनाभर उपोषण, अयाचित भोजन (अकस्मात एखाद्याच्या घरी भोजनासाठी जाणे), नक्तभोजन (दिवसा न जेवता केवळ रात्री पहिल्या प्रहरात एकदाच जेवणे) अथवा एकभुक्त (दिवसभरात एकदाच जेवावे) रहावे. अशक्त व्यक्तीने या चार प्रकारांपैकी एक प्रकार निदान तीन दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा. संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल, त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथी आणि व्यतिपात, वैधृति या योगांवर विशेष दानधर्म करावा, असे शास्त्रात सांगितले आहे.

या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. अखंड अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा.
प्रतिदिन एकच वेळ भोजन करावे. जेवतांना बोलू नये. त्यामुळे आत्मबळ वाढते. मौन भोजन केल्याने पापक्षालन होते.
तीर्थस्नान करावे. किमान एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पापांची निवृत्ती होते.
दीपदान करावे. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते.
तीर्थयात्रा करावी. देवदर्शन करावे.
तांबूलदान (विडा-दक्षिणा) करावे. महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती होते.
गोपूजन करावे. गोग्रास घालावा.
अपूपदान (अनारशांचे दान) करावे.‘
See also नवग्रह स्तोत्र - Navagraha Stotra in Marathi
या संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल, त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथींना आणि व्यतिपात, वैधृति या योगांवर विशेष दानधर्म करावा’, असे शास्त्रात सांगितले आहे.

07/08/2023

अधिकमासाचे वैज्ञानिक कारण
अधिकमास लागण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत. सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यातील फरक संतुलित करण्यासाठी अधिक महिने येतात. हिंदू कॅलेंडरची गणना देखील सौर वर्ष आणि चंद्र वर्षाच्या गणनेच्या आधारे केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक सौर वर्ष 365 दिवसांचे असते. सौर वर्षाचा अर्थ असा आहे की पृथ्वीला सूर्याची एक प्रदक्षिणा करण्यासाठी 365 दिवस आणि सहा तास लागतात. आणि चंद्र वर्ष 354 दिवसांचे असते. चंद्र वर्ष म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 354 दिवस लागतात. दोन्ही वर्षांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक आहे. जे दर तीन वर्षांनी सुमारे 1 महिन्याच्या बरोबरीचे होते. सौर वर्ष आणि चंद्र वर्षातील फरक संतुलित करण्यासाठी, अधिक मासच्या रूपात एक अतिरिक्त महिना तयार केला जातो.

07/08/2023

कृष्णाने मासाचे 'पुरुषोत्तम मास' असे ठेविले अशी कथा प्रचलित आहे. या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या विशिष्ट महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे.

माझे १०० फॉलोअर झाले आहेत!  तुमच्या निरंतर समर्थनासाठी तुमचे धन्यवाद. तुमच्या प्रत्येकाशिवाय मला हे जमलंच नसतं. 🙏🤗🎉
26/04/2023

माझे १०० फॉलोअर झाले आहेत! तुमच्या निरंतर समर्थनासाठी तुमचे धन्यवाद. तुमच्या प्रत्येकाशिवाय मला हे जमलंच नसतं. 🙏🤗🎉

02/01/2023

पौष महिना शुभ कि अशुभ ?

वर्षातील बारा महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना, पण त्याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत, इतके कि पौष सुरु झाला म्हणून अनेक शुभकार्ये पुढे ढकलली जातात तर महत्वाची बोलणी टाळली जातात. नवीन व्यवहार होत नाहीत इतका महिना वाईट असल्याची समजूत असल्याने याची भयंकर भीती जनसामान्यांमध्ये आहे तर धर्मशास्त्रानुसार हा महिना खरच इतका वाईट आहे का ? याचा घेतलेला हा धांडोळा............

चैत्र माह वर्षारंभातील दहावा महिना तर हेमंत ऋतूतील दुसरा मास म्हणजे पौष महिना. त्याला तैष आणि सहस्य अशी अन्य दोन नावंही आहेत. अधिक मासाला जसं मलमास किंवा धोंडा मास म्हणतात तसं याला भाकडमास म्हटलं जाऊ लागलं. कारण मकर संक्रातीशिवाय या महिन्यात अन्य सण नाहीत, असा सार्वत्रिक समज. मात्र निर्णयसिंधु, धर्मसिंधु या ग्रंथात या महिन्यात करण्याची काही कृत्यं सांगितली आहेत ती अशी -

१) पौष पौर्णिमेपासून पौर्णिमान्त माघ सुरू होतो म्हणून या दिवसापासून माघस्नानाला प्रारंभ करावा.
२) पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा महोत्सव (शाकंभरी नवरात्र) शारदीय नवरात्रौत्सवासारखा असतो.
३) पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवप्रित्यर्थ स्नान, जप, होम तर्पण व ब्राह्मणभोजन करावं.
४) पौष अमावास्येला अधोंदय पर्व आलं असता स्नानदानादी धर्मकृत्यं करावीत.
५) शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करावा. या शिवापुढे दीपाराधना करावी.
६) पौषाच्या दोन्ही पक्षांतील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा करावी. दुर्गेची मूर्ती पीठाची करावी व्रतानिमित्त आठ कुमारिकांना भोजन घालावं.
७) महिनाभर एकवेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावं.
८) रवि धनु राशीत प्रवास करून मकर राशीपर्यंत प्रवेश करेपर्यंतच्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात. धनुर्मास श्रवणासारखाच पवित्र मानला जातो या धनुर्मासाचे काही दिवस पौषात येतात. संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा व अन्हिकं उरकून देवास महानैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. महानैवेद्यास मुगाच्या डाळीची खिचडी, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, वांग्याचे व तिळाचे पदार्थ केले जातात.
वरील विवेचनावरून धार्मिक कार्यासाठी हा महिना निषिद्ध नाही, हे स्पष्ट होतं. राहिला प्रश्न विवाह आणि वास्तुविषयक कार्याचा. पौष महिन्यात रवि धनुत असतात विवाहाचे मुहूर्त घेऊ नयेत असे शास्त्र सांगते, मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज्य नाही.पौष महिना शुभकार्यासाठी वर्ज्य आहे ही निव्वळ खुळचट कल्पना असून तिला कसलाही शास्त्राधार नाही. धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते पितृपंधरवडाही सर्वच शुभकार्यासाठी वर्ज्यनसतो.पौष महिन्याचा बागुलबुवा करू नये.
सोप्या आणि सहज भाषेत सांगायचे तर श्रीखंडोबा आणि श्रीम्हाळसादेवी यांचा विवाह पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरज मुहूर्तावर पाली येथे होत असतो. त्यामुळे जनसामान्यांना या महिन्यामध्ये विवाह करण्यास हरकत नसावी. गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी हा महिना अजिबात वर्ज्य नाही. मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात सुरू करू नये, पण अगोदर सुरू असलेलं बांधकाम थांबवू नये. घराऐवजी कुंपण किंवा अन्य कामे करायला हरकत नाही. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचर वगैरे करायला हरकत नाही. संपूर्ण महिनाभर घरखरेदी, दागिने खरेदी, प्रवास वा अन्य नैमित्तिक कामं निर्धास्तपणे करावीत.
काहींच्या मते पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून मिळाले असल्याने नक्षत्र स्वामी शनीचा प्रभाव या महिन्यावर असतो आणि शनिग्रह वैवाहिक सौख्यासाठी मारक असल्याने या महिन्यामध्ये विवाह करू नयेत. परंतु प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असते त्यावरून त्या महिन्याला नाव मिळाले आहे जसे चित्रा वरून चैत्र, विशाखा वरून वैशाख इत्यादी आणि पौर्णिमेच्या त्या चंद्र नक्षत्राचा त्या महिन्यावर प्रभाव असतो असे ज्योतिष शास्त्राच्या आधारावर सांगतात त्यापैकी पौष पौर्णिमेला पुनर्वसु नक्षत्र असते त्यामुळे हा युक्तिवाद तकलादू आणि न पटण्याजोगा वाटतो.
पौष महिन्यात शुभकार्य करत नाहीत ही रुढी बनली आहे म्हणून ती पाळावी. कारण शास्त्रात रुढी बलियेसी, असं वचन आहे, असा युक्तिवाद काहीजण करतात. मात्र वरील वचनात हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय असून पेक्षा आणि पासून अशा दोन्ही अर्थानं तो वापरला जातो. म्हणून वरील वचनाचा अर्थ शास्त्रापेक्षा रुढी बलवान असा नसून शास्त्रापासून उत्पन्नच झालेली रुढी बलवान असा काढता येईल. अर्थात जी रुढी शास्त्रापासून उत्पन्नच झाली नाही ती न पाळणंच योग्य. दुसरा वेडय़ांच्या बाजाराला चाललाय म्हणून आपणही निघावं, हे काही खरं नाही.

Address

Mumbai
400030

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

9821147758

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganesh Athalye Guruji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share