Madhavbaug Mulund West Cardiac Clinic

Madhavbaug Mulund West Cardiac Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Madhavbaug Mulund West Cardiac Clinic, Hospital, Shop No. 1A/Wing, Om Srushti Bldg. , Opp. Buddha Vihar, Dumping Road Mulund (W), Mumbai.

31/05/2019

सप्रेम नमस्कार.
या आठवड्यात तीन वेगळे लेख ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध झाले आहेत. त्याकडे तुमचे लक्ष वेधत आहोत.
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर दर आठवड्याला किमान दहा लेख प्रसिद्ध होतात. कळावे.

साहित्याची लोकनीती - https://www.thinkmaharashtra.com/node/3331
महाराष्ट्राचे व्हेनिस... नगर, सोळाव्या शतकातील - https://www.thinkmaharashtra.com/node/3332
मी कराडची होऊन गेले – सुलभा ब्रम्हनाळकर - https://www.thinkmaharashtra.com/node/3333

- नितेश शिंदे 9323343406
उपसंपादक, ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’
-------------------------------------------------------------------------
#कराड #साहित्य #अहमदनगर

09/04/2019

सोलापूरचे डिसले सर यांची क्यूआर कोड पद्धत संपूर्ण भारतात
https://thinkmaharashtra.com/node/3287

सोलापूर जिल्ह्यातील रणजित डिसले या शिक्षकाने विकसित केलेली 'क्यूआर कोड' पद्धत महाराष्ट्र शासनाने क्रमिक पुस्तकांमध्ये 2015पासून वापरण्यास सुरुवात केलेली आहे. डिसले यांनी शिक्षणाची उद्दिष्टे विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्यासाठी हा यत्न केला आहे. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम दिसत आहेत. त्यामुळे 'क्यूआर कोड' पद्धत जून 2019 पासून संपूर्ण भारतात राबवण्यात येणार आहे. हा महाराष्ट्रातील एका शिक्षकाचा मोठाच बहुमान होय. डिसले सरांची संशोधक बुद्धी फक्त शिक्षणापुरती मर्यादित राहिली नाही. त्यांनी त्यांच्या तंत्रबुध्दीच्या साहाय्याने त्यांच्या गावच्या इतर काही क्षेत्रांमध्येही हस्तक्षेप सुरू केला. त्यांना त्यांच्या गावात झाडे लावून जगवण्याचा प्रयोग करायचा होता. परंतु त्यांना त्यांच्या अखत्यारीतील गाव माळढोक अभयारण्य परिसरात असल्यामुळे तेथील नियमांमुळे तेथे झाडे लावणे शक्य झाले नाही. तेव्हा त्यांनी त्यांच्या गावात झाडे आहेत तरी किती, ते मोजण्याचे ठरवले...
Ranjitsinh Disale

27/12/2018

‘थिंक महाराष्ट्र’साठी तालुका प्रतिनिधी
https://thinkmaharashtra.com/node/3165

‘थिंक महाराष्ट्र’ने माहिती संकलनाला चालना देण्याच्या दृष्टीने एमकेसीएलच्या सहकार्याने तालुका प्रतिनिधी नेमण्याचे योजले आहे. तालुका प्रतिनिधीला त्याच्या तालुक्यातील माहिती गोळा करून देण्याचे काम करावे लागेल. माहिती त्यांनीच लिहिली पाहिजे असे नाही, परंतु लेखन/छायाचित्रे/व्हिडिओफिती असे अभिलेखनाचे साहित्य मिळवून देणे महत्त्वाचे. तालुका प्रतिनिधींना त्यांची नियुक्ती झाल्यास महिना तीन हजार रुपये मानधन देणे शक्य होईल. इच्छुकांनी त्यांची माहिती info@thinkmaharashtra.com या ई-मेलवर पाठवावी. त्यापूर्वी ‘थिंक महाराष्ट्र’चे वेबपोर्टल पाहून घ्यावे. www.thinkmaharashtra.com म्हणजे कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

1. सुधारित योजना १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या बारा महिन्यांच्या कालावधीत राबवली जाईल.

2. दहा तालुक्यांमध्ये हा प्रयत्न करून पाहुया. दहा तालुक्यांत प्रत्येकी एक याप्रमाणे दहा प्रतिनिधी नेमले जातील. त्यांना प्रत्येकाला तीन हजार रुपये मासिक मानधन मिळेल.

3. त्यांच्यावर जबाबदारी त्या तालुक्यातील सुमारे शंभरच्या आसपास असलेल्या खेड्यांतील माहिती संकलन करण्याची असेल. ही माहिती तीन प्रकारांत – प्रत्येक गावातील कर्तबगार व छांदिष्ट व्यक्ती, उपक्रमशील खासगी व सार्वजनिक संस्था आणि मंदिर-मशिदीपासून वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांपर्यंतचे संस्कृतिसंचित – संकलित केली जाईल. हे सर्व लेखन प्रतिनिधीने करावे असे अपेक्षित नाही. त्याने हे लेखन व त्याबरोबरचे फोटो/व्हिडिओ/ध्वनिफिती व तशी सामग्री तालुक्यातून मिळवून द्यायचे आहे.

4. प्रत्येक तालुका प्रतिनिधीने महिन्याला दहा लेख मिळवून द्यावे असे अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट लागोपाठ दोन महिने साध्य न करता आल्यास तालुका प्रतिनिधीच्या नियुक्तीची गांभीर्याने दखल घेतली जाईल.

5. तालुका प्रतिनिधींच्या प्रशिक्षणाच्या दोन बैठका वर्षभरात होतील.

6. तालुका प्रतिनिधींकडून जे साहित्य मिळेल ते त्यावर संस्करण ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या ऑफिसशी संलग्न मंडळी करतील व ते लेखन ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध होईल. त्या लेखनास ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या पद्धतीप्रमाणे फूल ना फुलाची पाकळी स्वरूपात मानधन दिले जाईल.

7. या योजनेस गती देण्याचे व त्यामध्ये सुसूत्रता ठेवण्याचे काम शैलेश पाटील करतील. तालुका प्रतिनिधींशी शैलेश पाटील/किरण क्षीरसागर हे गरजेनुसार संपर्कात राहतील.

8. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या माहिती संकलनाचा हेतू जसा अभिलेखन संग्रहाचा (डॉक्युमेंटेशन) आहे तसाच तो जनजागरणाचाही आहे. त्यामुळे तालुका प्रतिनिधींनी त्यांचे कार्य माहिती संकलनापुरते मर्यादित न ठेवता विधायकतेचा प्रसार – त्यासाठी उपक्रमशील व्यक्तींचे दौरे, काही सभासंमेलने असे कार्यक्रम योजण्यास ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’कडून प्रोत्साहन दिले जाईल. मात्र, ते तालुका प्रतिनिधींवर कामाचा भाग म्हणून बंधन नसेल.

9. तालुका प्रतिनिधीला त्या त्या तालुक्यातील ‘एमकेसीएल’चे प्रतिनिधी सहकार्य करतील.

10. तालुका प्रतिनिधीला ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या वतीने नेमणुकीचे पत्र; तसेच, त्याला ओळखपत्र दिले जाईल. प्रतिनिधीने त्याचा उपयोग ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे कार्य अधिक विस्तारण्यासाठी करावा असे अभिप्रेत आहे.

11. जो अथवा जे प्रतिनिधी माहिती संकलनाचे काम वर्षभर निष्ठेने व जनजागृतीसाठी बांधिलकीच्या भावनेने करतील त्यांना वर्ष संपल्यानंतर ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ व ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या केंद्रीय समितीत कार्य करण्याची संधी मिळू शकेल.

12. तालुका प्रतिनिधींनी स्वत:च्या कल्पनेने व हिंमतीने स्थानिक पातळीवर काही संयोजन उभे केले तर ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ची केंद्रीय समिती त्यांना शक्य ते पाठबळ पुरवील.

23/10/2018

रावणाची पूजा की त्याचे दहन?
https://thinkmaharashtra.com/node/3081

रावणाच्या पुतळ्याचे दहन दसऱ्याला करावे की नाही याबाबत, रावणचरित्रावर आधारित गाजत असलेली ‘रावण - राजा राक्षसांचा’ ही कादंबरी लिहिणारे शरद तांदळे यांचे म्हणणे असे आहे, की “हजारो वर्षांपूर्वीच्या गोष्टीचा संदर्भ देऊन रावणाचा पुतळा जाळणे हे पर्यावरणाच्या; तसेच, भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने अनुचित आहे. मेलेल्या व्यक्तीचा पुतळा जाळणे ही विकृती आहे. व्यक्तीला कोणी शत्रू असेल तरीही तो मेल्यावर वाईट वाटते. ती शत्रुता राम-रावण यांच्यातील होती आणि रामाने रावणाला शेवटच्या क्षणी माफही केले होते! रावण हा विद्वान पंडित असल्यामुळे, रामाने लक्ष्मणाला रावणाकडे जाऊन काही उपदेश प्राप्त करण्यासदेखील सुचवले होते. रावणदहनाचा मागील काही वर्षांपासून अतिरेक होत आहे. भारत देश बुद्धाच्या, गांधीजींच्या शांततेच्या मार्गाने चालणारा आहे. अशा ठिकाणी या प्रकारची हिंसा घडते हे चुकीचे आहे. तसेच, रावणाची पूजा करणे हेही चुकीचे आहे. रावण हा रामायणातील खलनायक नसून नायक होता.”

आदिवासींचे ‘रावणायन’ नावाचे पुराण आहे. आदिवासींमध्ये दरवर्षी रावण व मेघनाथ यांची मिरवणूक काढून मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते. त्यालाच ‘रावेन महा गोंगो’ म्हणजेच ‘रावणाची महापूजा’ असे म्हटले आहे. रावण हे भारतातील काही आदिवासी जमातींचे दैवत आहे. देशात रावणाची मंदिरे काही ठिकाणी आहेत. आंध्र प्रदेशमधील काकिनाडा येथे रावणाचे मंदिर असून मंदिराच्या दरवाज्यामध्येच मोठा रावण उभारलेला आहे. उत्तरप्रदेशमधील कानपूर शहरामध्येदेखील रावणाचे मंदिर आहे. त्या मंदिराचा दरवाजा फक्त नवरात्रीमध्ये उघडा असतो; त्यानंतर, पूर्ण वर्षभर तो बंद असतो. रावणभक्त रावणदर्शनासाठी नवरात्रीमध्ये तेथे येतात.

रावणाचे मंदिर हिमाचल प्रदेशमध्येही आहे, ते बैजनाथ मंदिर या नावाने ओळखले जाते. रावणाने त्याला दहा तोंडे मागण्यासाठी महादेवाला प्रसन्न तेथे करून घेतल्याचे मानले जाते. रावण हा महादेवाचा भक्त आहे. त्यामुळे त्या मंदिरात त्याचीही पूजा केली जाते.

मध्य प्रदेशात रावणगाव आहे. तेथेही रावणदेवतेचे मंदिर आहे. रावण कान्यकुब्ज ब्राह्मण असल्याचे मानले जाते. तेथील गावकरी त्यांना रावणाचे वंशज मानतात. रावणाचे मंदिर मध्य प्रदेशातील इंदूर शहरामध्येही आहे. त्या मंदिरामध्ये रावणाची, अन्य देवी-देवतांच्या; तसेच, रामायण काळातील मूर्तीही आहेत. त्याच राज्यात मंदसौर येथे रावणाचे मंदिर असून तेथे रावणाचा बावन्न फूट उंच पुतळा आहे.

लोक रावणाची पूजा का करतात? तर रावण हा एक पराक्रमी राजा होता. त्याने राज्यविस्तारासाठी अनेक राज्यांवर स्वारी केली व इंद्राला अंकित करून अनेक राजांचे राज्य हस्तगत केले, त्याकरता त्यांच्याशी युद्ध केले. भारतात प्राचीन काळी दक्ष आणि रक्ष या दोन संस्कृती अस्तित्वात होत्या. देवांची ती दक्ष आणि राक्षसांची ती रक्ष. दक्षसंस्कृती ही दैवकेंद्रित होती तर रक्षसंस्कृती ही मानवकेंद्रित होती- पुरोगामी विचारांची व स्वतःमध्ये कालानुरूप बदल करवून घेणारी, अशी. त्याच रक्षसंस्कृतीचा पुरस्कर्ता प्रणेता रावण. रावण हा मानवी मूल्याधारित संस्कृतीचा आग्रही होता.

रावण हा भगवान शंकराचा विद्वान भक्त होता. रावण वेदांचा जाणकार होता. तो सामवेदामध्ये निपुण होता. रावण वेद आत्मसात करण्याचे ‘पद-पथ’ नावाचे जे तंत्र होते त्यात पारंगत होता. रावणाने ‘शिवतांडव’, ‘युद्धीषा तंत्र’ आणि ‘प्रकुठा कामधेनु’ यांसारख्या ग्रंथांची रचना केली आहे. रावणाने आयुर्वेदावर ‘अर्क प्रकाश’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. रावणाला शक्तिवर्धकाची मात्रा मोठ्या प्रमाणावर असलेला भात उत्पादित करण्याचे तंत्र अवगत होते. रावण कवीदेखील होता- ‘शिवतांडव’ ही काव्यरचना रावणाच्याच हस्ते निर्माण झाली. शंकर त्यांच्यावर रावणाने रचलेल्या कविता पाहून प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला वर दिले होते. रावणाला संगीताची आवड होती. त्याने शास्त्रोक्त पद्धतीने संगीत शिकून घेऊन संगीतकलेत नावलौकिक मिळवला होता. रावणाला ‘रुद्रवीणा’ वाजवण्यात हरवणे जवळपास अशक्य होते. रावणाने ‘रावणहथा’ हे वाद्य बनवले होते. ते व्हॉयोलिनप्रमाणे होते. ते वाद्य राजस्थानच्या काही भागांत वाजवले जाते. रावणाने त्याची पत्नी मंदोदरी हिच्या सांगण्यावरून स्त्रीरोगविज्ञान आणि बालचिकित्सा यांवर आधारित ग्रंथ लिहिला. त्यामध्ये शंभरपेक्षा जास्त आजारांचे विश्लेषण केले आहे आणि उपाय सांगितले आहेत.

रावण रामासोबत युद्धात हरल्यानंतर जीवनाची अखेरची घटका मोजत होता. रामाला रावणाच्या ज्ञानाची कल्पना असल्याने त्याने त्याचा भाऊ लक्ष्मण याला रावणाकडून ज्ञान प्राप्त करण्यास सांगितले. रामाच्या सांगण्यावरून लक्ष्मण पहुडलेल्या रावणाच्या डोक्याशी जाऊन बसला. त्यावेळी रावणाने त्याला बजावले, की कोणत्याही व्यक्तीकडून ज्ञान प्राप्त करताना त्या व्यक्तीला स्वत:चा गुरू मानावे आणि त्याच्या चरणी बसून ज्ञान प्राप्त करावे. लक्ष्मणाने रावणाच्या सूचनेचे पालन केले आणि रावणाने लक्ष्मणाला राज्यकारभारापासून जीवनात यशस्वी होण्याच्या युक्तींपर्यंत अनेक गोष्टींचे ज्ञान दिले.

रावण दहा तोंडांचा होता असे मानले जाते. पण रावण जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्या आईने त्याच्या गळ्यात नऊ मोती असलेला हार घातला होता. त्या प्रत्येक मोत्यामध्ये रावणाची छबी दिसायची. रावण इतका ज्ञानी होता, की त्याच्या मेंदूमध्ये दहा मेंदूंचे ज्ञान आहे असे म्हटले जात असे. म्हणूनच रावणाला पुराणात ‘दशानन’ असे म्हटले गेले.

असे सगळे असताना रावणाने सीतेचे हरण करून अयोध्यावासीयांचा रोष का ओढवून घेतला? तसे बघितले तर रावणावर सीतेच्या अपहरणाशिवाय दुसरा कोठलाही आरोप नाही. अपहरणामागील कहाणीदेखील वेगळी आहे. सीताहरणाचे कारण व कथा ही अशी आहे - राम वनवासात असताना लक्ष्मणावर रोज फळे आणण्याची जबाबदारी होती. तो शुर्पणखा ज्या भागाची लोकपाल होती तेथून फळे आणत असे. शुर्पणखा लक्ष्मणाकडे आकर्षित झाली. तिने लक्ष्मणाला लग्नासाठी मागणी घातली. लक्ष्मण रूपवान अशा शुर्पणखेचा मोह आवरू शकला नाही. परंतु, तो विवाहित असल्याने तो शुर्पणखेला होकारही देऊ शकत नव्हता. त्यावर उत्तर म्हणून त्याने शुर्पणखेला रामाला भेटण्यास सांगितले. रामास त्याच्या विवाहित भावाला विधवा रक्ष राजकन्येने लग्नासाठी मागणी घातली हे रुचले नाही. त्यावरून रामाचा वाद शुर्पणखेशी झाला. वादाअंती, रामाने त्याची परवानगी शुर्पणखेच्या पाठीवर लिहून देऊन तिला लक्ष्मणाकडे पाठवले. तेव्हा लक्ष्मणाने रामाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे शुर्पणखेचे नाक व कान कापले! ती तशीच रावणाकडे गेली. रावणाला त्याच्या बहिणीचा अपमान सहन झाला नाही. त्याने सीतेचे हरण शुर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी केले. रावणाने सीतेचे हरण करूनही सीतेला राजमहालात न ठेवता अशोक वाटिकेत ठेवले; तिला कसलाही त्रास होऊ नये म्हणून अनेक दासी तिच्या सेवेत तैनात होत्या. तसेच, रावणाने सीतेचे शीलभंग करण्याचाही प्रयत्न केला नाही. अशा या यथार्थवादी रावणाचे दरवर्षी होणारे दहन कितपत योग्य आहे? असा सवाल विचारी जन करतात.

प्रत्येकात चांगले व वाईट, दोन्ही गुण असतात. मग रावणाचा हा एक दोष बघून त्याचे दहन दरवर्षी का करायचे?

- नितेश शिंदे, niteshshinde4u@gmail.com

15/08/2018

ध्वज
संपूर्ण लेख - http://thinkmaharashtra.com/node/3021

वेगवेगळे ध्वज किंवा झेंडे वापरण्याची प्रथा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. लहान-मोठ्या लढाया, सागरी पर्यटन या ठिकाणी ध्वज प्रथम वापरण्यात आले. समुद्रप्रवास करणारे खलाशी त्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा संदेश पाठवण्यासाठी झेंड्यांचा वापर करत. सर्वात पहिला राष्ट्रध्वज, म्हणजे देशाने अधिकृतपणे त्याचे प्रतीक म्हणून ठरवलेला ध्वज डेन्मार्क देशाचा आहे. तो 1299 साली फडकावण्यात आला. त्यानंतर ती पद्धत पडली. जगातील सर्व स्वतंत्र राष्ट्रांनी त्यांचे त्यांचे राष्ट्रध्वज निश्चित केलेले आहेत.

भारताच्या घटना समितीने 22 जुलै 1947 रोजी 'तिरंगी ध्वज' हा भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली; ‘जनगणमन’ हे राष्ट्रगीत म्हणून तर ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गान म्हणून 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकृत केले गेले.

30/06/2018

ग्रामजीवन दर्शन - सिद्धगिरी संग्रहालय
संपूर्ण लेख - http://thinkmaharashtra.com/node/2979

सिद्धगिरी संग्रहालय म्हणजे ग्रामजीवनाचे यथार्थ दर्शन घडवणारा देशातील पहिला उपक्रम.

‘सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय’ म्हणजे स्वावलंबी, जिवंत खेडे आहे. हुबेहूब प्रतिकृती ही त्याची शक्ती. संग्रहालयाची स्थापना लंडनच्या मादाम तुसा संग्रहालयाच्या प्रेरणेतून केली गेली. ग्रामीण संस्कृतीवर आधारित असा तो आगळावेगळा प्रकल्प. तो या प्रकारचा देशातील पहिला उपक्रम असावा. ते आशिया खंडातील दोन नंबरचे संग्रहालय मानले जाते. ग्रामीण संस्कृती दर्शवणारी ती शिल्पे पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ चालू असतो.

पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडीसंपूर्ण लेख - http://thinkmaharashtra.com/node/2939जखिणवाडी या गावाला पौराणिक...
22/05/2018

पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडी
संपूर्ण लेख - http://thinkmaharashtra.com/node/2939

जखिणवाडी या गावाला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. गाव खुद्द शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. तसेच, छत्रपती शाहू महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आले तेव्हा त्यांचा महाराणी ताराबाई यांच्याशी संघर्ष झाला होता. त्यावेळी तह जखिणवाडी गावी झाला होता. त्यानंतर दोन गाद्या निर्माण झाल्या. एक सातारची गादी आणि दुसरी कोल्हापूरची गादी. तो ‘वारणेचा तह’ म्हणून प्रसिद्ध आहे. तह 13 एप्रिल 1731 रोजी झाला. त्यांपैकी काही अटींचे पालन झाले तर काहींचे नाही. तहाची आठवण म्हणून शाहुराजांनी गावाला दोन तलवारी भेट दिल्या होत्या. त्या गावच्या मळाईदेवी मंदिरात आहेत.

जखिणवाडी गाव हे सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यापासून तीन किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. ते साताऱ्यापासून बासष्ट किलोमीटरवर आहे. गावातील कुटुंबांची संख्या सातशेसत्तर असून लोकसंख्या तीन हजार सातशे आहे. गावात जखणाईदेवीचे मंदिर आहे. देवीच्या त्या नावावरून गावाला जखिणवाडी हे नाव पडले.

पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडी नितेश शिंदे 22/05/2018 जखिणवाडी या गावाला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभू...

21/04/2018

गावकथा
आपली गावे जपून ठेवुयात!
आवाहन

माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी त्याचा गाव त्याच्या मनातून दूर जात नाही. आठवणी, अनुभव, संस्कार, तेथे झालेली शरीर आणि मन यांची घडण यांच्या मिश्रणातून जी ओढ तयार होते ती विलक्षण असते. म्हणूनच माणसाने त्याच्या गावाचे नाव कोठेही निव्वळ वाचले-पाहिले तरी त्याला आनंद होतो. प्रत्येकाचे ते गाव कायमस्वरूपी नोंदले जावे आणि तेथील प्रथा-परंपरा-जत्रा-इतिहास या तऱ्हेची माहिती जगभर सर्वत्र पोचत राहावी याकरता ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलने महाराष्ट्रातील सर्व गावांची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. तुम्हीदेखील त्यात सहभागी होऊ शकता. तुम्ही तुमच्या गावासंबंधात मोठा, विस्तृत लेख लिहून द्यावा अशी अपेक्षा नाही. तुम्ही तुमच्या गावाची माहिती पंचवीस ते तीस वाक्यांत लिहून पाठवली तरी चालेल. ती माहिती तुमच्या नाव-फोटो-संपर्क यांसह 'थिंक महाराष्ट्र'चे वेबपोर्टल आणि अॅप यांवर प्रसिद्ध केली जाईल. जर तुमच्या गावाची नोंद 'थिंक महाराष्ट्र'वर आधीच झालेली असेल तर 'थिंक महाराष्ट्र'चे संपादकीय मंडळ तुम्ही पाठवलेली माहिती मूळ लेखात समाविष्ट करेल. त्यात माहिती संकलन सहाय्य म्हणून तुमच्या नावाचा उल्लेख करण्यात येईल.

त्या माहितीत कोणते मुद्दे असावेत? गावाची माहिती लिहिताना पुढील मुद्दे समाविष्ट करावे. गावाचा तालुका आणि जिल्हा कोणता? गावाच्या नावाच्या उत्पत्तीची दंतकथा आहे का? गावात कोणकोणती मंदिरे आहेत? ग्रामदैवताचे नाव काय? त्याची माहिती. ग्रामदैवताच्या नावाने जत्रा किंवा यात्रा आहे का? ती कशी आयोजित-साजरी केली जाते? गावाचा इतिहास, स्थानिक कला आणि उत्सव, गावात वा गावाजवळ असलेली लेणी-किल्ले किंवा इतर ऐतिहासिक-पुरातन वास्तू, तेथील बाजार, सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, गावात असलेल्या किंवा होऊन गेलेल्या उल्लेखनीय व्यक्ती, गावातील संस्था किंवा उपक्रम, गावाची लोकसंख्या, गावातील लोकांची भाषा-बोलीभाषा, गावातील नदी-तलाव, पावसाचे प्रमाण, शिक्षणाची सोय, पाणी आणि पिके यांची स्थिती, हवामान, पर्यटन स्थळ, गावातील इतर व्यवसाय, गावापर्यंत पोचण्याची वाहतूक व्यवस्था व मार्ग, तसेच, गावाची इतर वैशिष्ट्ये! सर्वात महत्वाचे म्हणजे तेथील माणसे – त्या माणसांच्या हकिगती, त्यांची कर्तबगारी.
हे सगळेच मुद्दे तुमच्या लेखनात यावेत असा आग्रह नाही. तुम्ही तुम्हाला शक्य तितक्या मुद्यांची माहिती द्यावी. त्यात कमतरता राहिली तर ती 'थिंक महाराष्ट्र'चा संपादकीय विभाग तुमच्याशी व अन्य संबंधितांशी संपर्क करून भरून काढेल. तुम्ही ती माहिती लिहून ‘थिंक महाराष्ट्रच्या’ पुढील मार्गांनी पाठवू शकता.
इमेल - info@thinkmaharashtra.com किंवा niteshshinde4u@gmail.com
व्हॉट्स अॅप - 9892611767 किंवा 9323343406
पत्ता - २२, मनुबर मँन्शन, १९३ आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर, दादर (पूर्व), मुंबई- ४०००१४
संपर्क - नितेश शिंदे (उपसंपादक, 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम', 9323343406.)
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' २०१० सालापासून महाराष्ट्रभराची माहिती गोळा करून ती ऑनलाईन मांडत आहे. तुम्हाला ती माहिती 'थिंक महाराष्ट्र'च्या वेबपोर्टलवर (www.thinkmaharashtra.com) किंवा अॅपवर (डाऊनलोड करा - https://goo.gl/DM3RRW)वाचतायेईल.
धन्यवाद.
- टीम 'थिंक महाराष्ट्र'

Hospital

भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर काश्मीर मध्ये गोळीबारात शहीद विनम्र श्रद्धांजली 💐💐💐💐
24/12/2017

भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर
काश्मीर मध्ये गोळीबारात शहीद
विनम्र श्रद्धांजली 💐💐💐💐

Last Month Madhumeh Mukticha Sohala...
12/12/2017

Last Month Madhumeh Mukticha Sohala...

On 5th Dec.2017 Hardik Programme of Madhavbaug Mulund West
10/12/2017

On 5th Dec.2017 Hardik Programme of Madhavbaug Mulund West

Address

Shop No. 1A/Wing, Om Srushti Bldg. , Opp. Buddha Vihar, Dumping Road Mulund (W)
Mumbai
400080

Telephone

9323969090

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhavbaug Mulund West Cardiac Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category