10/01/2023
उद्योजकता विजडम
गोकर्णी वेलीमुळे शांती, समृध्दी व आरोग्य
१) एक संदर्भ : एके दिवशी संध्याकाळी आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या वनस्पती आणि फुलांपासून कोणकोणती औषधे बनविता येतात व ती कोणकोणत्या रोगविकारांवर कशी उपयुक्त असतात, याविषयी वाचन करीत होतो. त्यामध्ये गोकर्णीच्या फुलांबद्दल माहिती मिळाली. शास्त्रीय भाषेत त्याला क्लीटोरिअटरनॅटी असे नाव आहे. दक्षिणपूर्व आशियाई देशांमध्ये आहार शास्त्रामध्ये या फुलाचे अनन्यसाधारण महत्व आहे. मलेशिया, म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम या देशांमध्ये दैनंदिन उपयोगांसाठी गोकर्णीच्या फुलाचा वापर करतात. जेवण झाल्यानंतर तेथे लोक चहा पितात. त्या चहामध्ये गोकर्णीचे एक फूल टाकतात व तो चहा सर्व्ह करतात. त्याला Buttertly pea flower tea, chamomile tea अशी नावे आहेत. जेवणानंतर हा चहा पिण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. गोकर्णीच्या फुलांमध्ये असणार्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे त्याच्या वापरातून बनविलेल्या पेयाच्या नियमित सेवनामुळे डिप्रेशन कमी होते. स्ट्रेस (तणाव) कमी होतो. मायग्रेनच्या त्रासात लाभ होतो. डोळ्यांचे त्रास कमी होतात. दातदुखी. कानदुखी, घशाचे रोग, पचनसंस्थेचे रोग यामध्ये गोकर्णी गुणकारी आहे. हे ब्रेन स्टिम्युलेटर आहे, म्हणजे तुमच्या विचार शक्तीला चालना देते व स्मरणशक्ती वाढवते. मन चिंतामुक्त होते. कोणताही रोग असला तरी गोकर्णाचा औषधी म्हणून वापर करायचा विचार करा; गोकर्ण कधीच पराजित होणार नाही, म्हणजे हरणार नाही. म्हणूनच की काय, गोकर्णाला ‘अपराजिता’ असेही सुंदर नाव आहे. या गोकर्णीच्या सेवनामुळेच जीवनात समृध्दी येते, असा त्या देशांचा एक दृढ समज आहे. हजारो वर्षापासून ते गोकर्णीच्या फुलांचा वापर करतात.
२) प्रयोग : वरील संदर्भ वाचल्यानंतर मी एक प्रयोग करायचे ठरवले. मीसुध्दा घरी कुंडीमध्ये गोकर्णीची वेल लावली. ती वेल मोठी झाल्यावर त्याला दर आठवड्याला २-३ फुले लागतात. मी सहज रोज एक फूल कोर्या चहामध्ये टाकून पिऊ लागलो. मलाही चांगला अनुभव येऊ लागला. माझा तणाव कमी झाला. गेल्या काही महिन्यांत माझ्या व्यवसायात नफा झाला, त्याची मी तुलना केली तेव्हा मला असे समजले की, माझ्या व्यवसायाचा व त्यातील नफ्याचा ग्राफ हा अगदी लॉकडाऊनच्या काळातही वाढला होता. कोरोना संकट, जागतिक मंदी या कारणामुळे अनेक व्यवसाय बंद पडले, परंतु या परिस्थितीतही माझा व्यवसाय वाढत होता. आता याला बरेच जण अंधश्रध्दा म्हणतील. परंतु मी जाणीवपूर्वक एक प्रयोग केला होता व त्यामध्ये मी यशस्वी झालो.
३) Givers Gain :एखाद्या गोष्टीमुळे मला फायदा झाला तर तो इतरांनाही व्हावा, अशी माझी स्पष्ट विचारसरणी आहे. मी केलेल्या प्रयोगातून मला फायदा झाला, चांगला अनुभव मिळाला. माझ्याकडील गोकर्णीच्या वेलीला साधारणत ४ ते ५ शेंगा दार आठवड्याला लागतात, मला २०-३० बिया मिळतात. मी माझे मित्र, स्नेही, हितचिंतक यांच्याशी माझा अनुभव शेअर केला व त्यांनाही गोकर्णीचा वेल घरी लावण्यास सांगितला. ज्यांना वाटले की, आपणही हा प्रयोग करून पाहूया, त्यांना मी त्या बिया देऊन टाकल्या. कुणी ५-६ बिया घेऊन गेले. त्यांनीही फायदा झाल्याचे काहींना मला सांगितले. काही जणांनी तर नर्सरी/ रोपवाटीकेमध्ये न जाता माझ्याकडेच आग्रह धरला की तुमच्याकडच्याच बिया आम्हालाही द्या, गुण येतो. मग मी त्यांना हसत उत्तर देतो की, माझ्याकडे काही या वेलीची मूळ पेटंट नाही. तुम्ही कुठूनही ते रोप घेऊ शकता. तरी काही लोक माझ्याकडेच येतात. मी त्यांना नेहमी सांगतो जर तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही दुसर्यांना सुध्दा त्याचा फायदा करून द्या. ते तुमच्यापुरतं ठेवू नका.
मित्र हो, मला व माझ्या मित्रांना या प्रयोगाचा खूप उपयोग झाला, आपणही हा प्रयोग करावा. ही अंधश्रध्दा मुळीच नाही आणि मी स्वत: अंधश्रध्देला प्रोत्साहन वा समर्थन देत नाही. परंतु या गोकर्णीच्या फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यांचे आयुर्वेदामध्येही महत्व आहे. आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपायकारक आहेत. त्याचा फायदा सर्वांनाच होईल आणि सध्या शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सुदृढ राहणे ही काळाची गरज आहे. याचा अर्थ असाही नाही की गोकर्णी हे चमत्कारिक फूल आहे. व त्यामुळे आपोआप जीवन समृध्द होईल असेही नाही, तुम्हाला स्वत:च तुमचे प्रयत्न करावे लागतील.
जो चूक करतो तो माणूस... तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस... जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस... ज्याला आपण विजडम (Wisdom) प्राप्त होणे असे म्हणतो. या लेख मालिकेद्वारे आपणास विजडम प्राप्त होण्यास मदत होईल.
वाचक मित्रहो, आमचे लेख आवडल्यास लाईक व कमेंट करा. आपले प्रश्न, प्रतिक्रिया यांचे आम्ही जरूर स्वागत करतो.
नियमित आमचे लेख मिळवण्यासाठी ८६५२८४७३७८ हा नंबर तुमच्या व्यावसायिक व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा
संपर्क -
कॉल: +९१ ८१६९७ ४९२६४
व्हाट्सअप: +९१ ८६५२८४७३७८
संपर्काची वेळ :- सोमवार ते शनिवार सकाळी १०. ते सायं ६.०० वा. पर्यंत.
© प्रकाश भोसले
ISBN 978-81-929682-0-12