16/06/2025
Rhythm 0 ही एक अतिशय प्रसिद्ध आणि वादग्रस्त परफॉर्मन्स आर्ट होती, जी सन् १९७४ मध्ये सर्बियन कलाकार Marina Abramović हिने इटलीतील नेपल्स शहरात सादर केली होती. ही कला सादरीकरणाची एक प्रकारची सामाजिक आणि मानसशास्त्रीय चाचणी होती, जीने मानवी वागणुकीच्या मर्यादा आणि हिंसेची प्रवृत्ती उघड केली.
Rhythm 0 चा मराठीत सारांश:
कलेचा प्रकार: परफॉर्मन्स आर्ट
कुठे सादर केली: स्टुडिओ मोर्रा, नेपल्स, इटली
कधी: १९७४ साली
कलाकार: मरीना अब्रामोविच
काय घडलं होतं?
Marina Abramović ने सहा तासांसाठी स्वतःला एक "निष्क्रिय वस्तू" म्हणून मांडले. ती एका टेबलासमोर उभी होती आणि तिने प्रेक्षकांना असे सांगितले की, "तुम्ही मला जसं हवं तसं वापरू शकता. मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही."
तिच्यासमोर एका टेबलावर ७२ वस्तू ठेवले होते – काही सौम्य (फुले, पाणी, ब्रश), काही धोकादायक (कात्री, चाकू, बंदूक, गोळी).
सुरुवातीला काय झाले?
प्रेक्षकांनी सुरुवातीला सौम्य कृती केल्या – तिच्या केसांशी खेळले, गालाला स्पर्श केला, फुलं दिली. पण जसजसा वेळ गेला, तसतसं लोकांचं वागणं बदलू लागलं.
नंतर काय घडलं?
लवकरच प्रेक्षक अधिक आक्रमक, क्रूर आणि हिंसक झाले:
तिच्या अंगावर वस्त्र फाडले गेले
तिला जबरदस्तीने हालवले गेले
एका व्यक्तीने तिच्या दिशेने बंदूक धरून गोळी लावली, दुसऱ्याने ती थांबवली
कलेचा उद्देश काय होता?
Marina Abramović हिने मानवी वागणुकीतील हिंसेची, अधिकाराची, आणि नीतिमत्तेच्या मर्यादेची चाचणी घ्यायचा प्रयत्न केला. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याचं सामाजिक किंवा कायदेशीर बंधन नसेल, तेव्हा लोक कसे वागतात – हे उघड करण्याचा प्रयत्न या सादरीकरणातून झाला.
मराठीतून याचा अर्थ:
Rhythm 0 आपल्याला विचार करायला लावतो – जर माणसाला कोणतीही शिक्षा होणार नाही, कोणी अडवणार नाही, तर तो किती दूर जाऊ शकतो? नुसता प्रयोग नव्हता, तर ही माणसाच्या मनोवृत्तीवर केलेली खोल भाष्यात्मक टिपणी होती.
हाच प्रयोग आजही मानवी स्वभाव, स्त्रीच्या शरीरावरील नियंत्रण, आणि सामाजिक जबाबदारी याबद्दल जगभर चर्चा निर्माण करतो.
Marina Abramović हा एक स्वभाव देखील दर्शवते म्हणजे चांगल्या लोकांचा अति प्रमाणात जावून गैर फायदा घेणे आणि वरील सर्व प्रकार मी लोकांच्या तोंडातून ऐकले आहे. तुमचा चांगुलपणा हा तुमच्यासाठी घातक ठरू शकतो नाही तर अनेकदा ठरला आहे.
लोकांनी काय काय अनुभव शेअर केले ते खालील प्रमाणे :
१) हजार ते करोडो रुपयांसाठी लुटले.
२) उद्योग, व्यवसायात लुबाडले.
३) घर फोडले.
४) खोटे आरोप करून जेल मध्ये टाकले किंवा फसवले.
५) मानसिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण केले.
६) काहींच्या आयुष्यात वाईट करणाऱ्यांची लाईन लागत गेली.
७) नवरा, बायको, मुल, मुली पळवल्या गेल्या.
८) लग्नात, प्रेमात आणि लिव्ह इन मध्ये फसवले गेले आहे.
चांगल्या कर्माचे वाईट फळ बघितले आहे. आमच्या घरात अजून पर्यंत लहान मुले आयसीयु मध्ये नव्हती ह्याचा अर्थ असा नाही कि ह्या जगात असे घडतच नाही म्हणून, हा विश्वास तेव्हा तुटला जेव्हा नातेवाईक आयसीयु मध्ये होते आणि तिथे सर्व वयोगटाची रुग्ण आयसीयु मध्ये होती तेव्हा समजले कि प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यातून जात आहे म्हणून मी कधीही माझे मत, माझा दृष्टीकोन समोरचे ऐकल्या शिवाय आणि महत्वाचे म्हणजे समजल्याशिवाय समोरच्यावर थोपत नाही.
अश्या चांगल्या लोकांपासून मी दूर राहतो कारण अशी लोक नकारात्मक लोकांना शक्ती देतात व ती नकारात्मक लोक पुढे जावून अजून चांगल्या लोकांना शिकार बनवतात पण जी चांगली लोक हि शृंखला तोडतात ती पुढे अनेक चांगल्या लोकांची घरे वाचवतात.
मरीना अब्रामोविच च्या Rhythm 0 ह्या परफॉर्मन्स आर्ट मधून हे समजते कि आपल्या भारतात, महाराष्ट्रात किंवा मुंबईत नाही तर संपूर्ण जगभरात जी चांगली व्यक्ती आहे ती चांगलीच राहते आणि जी वाईट व्यक्ती आहे ती वाईटच राहते. चांगल्या लोकांच्या संपर्कात रहा आणि वाईट लोकांना आयुष्यातून काढून टाका आणि जर काहींच्या आयुष्यात वाईट व्यक्ती असतील तर त्यांना एकदा सांगा, जर ऐकत असेल तर ठीक, नाहीतर तुम्ही त्या व्यक्तीपासून लांब रहा, जर एखाद्याने बुडायचे ठरवले तर उत्तम पोहणारा देखील त्याला वाचवू शकत नाही.
मी इथे स्वभावाला महत्व देतो ना कि मनुष्य प्राण्याने बनवलेल्या कायद्यांना, निसर्ग नियम मोडता येत नाही पण मनुष्याने बनवलेले नियम मोडता येतात, कसे हि वापरता येतात, वाईट लोकांना सोडू देखील शकतात व चांगल्यांना अडकवू देखील शकतात.
तुम्ही जर अश्या परिस्थिती मधून जात असाल तर आजच संपर्क करा, तुम्हाला ह्यामधून बाहेर काढू शकतो, अजून दुसरा पर्याय म्हणजे जवळील मानसोपचार तज्ञांना भेटा, ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील, काही सेशन करा. संमोहन तज्ञांची मदत घ्या, ध्यान करणाऱ्या गुरूंची मदत घ्या, रेकी हीलर ची मदत घ्या.
कृपया हात जोडून विनंती आहे कि चांगुलपणाला कुठेतरी मर्यादा ठेवायला शिका, जग अक्षरक्ष विकून खाईल, १४० करोड लोकांचा भारत आहे, प्रत्येक जन आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे, भोगायचे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आहे. खरच खूप त्रासदायक असते, अनुभव घेवू नका.
धन्यवाद
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
#परफॉर्मन्सआर्ट #समाज #मानसशास्त्र #वागणूक #हिंसा #प्रवृत्ती #नैतिकता
#समुपदेशक #संमोहनतज्ञ #ग्रांडमास्टर #रेकी #हीलर #ध्यानगुरु #आकर्षणाचासिद्धांतप्रशिक्षक #ज्योतिष #वास्तूतज्ञ
#विनाऔषधीउपचार