Vivahsaptpadi

Vivahsaptpadi "vivahsaptapadi.com"

25/06/2025

*विवाह....*
हा शब्द आनंदाचा न राहता डोकेदुखीचा विषय झाला आहे. मुलाचा फोटो, संस्कार नंतर ,त्याचा पगार किती? ते आधी बोला, अशी परिस्थिती सध्या आहे. मुलाचे आईवडील आपल्या मुलासाठी स्थळ शोधणार तरी कसे? कारण मुलींचे ढीगभर पगार आणि अवाजवी अपेक्षा यामुळे ते हताश झाले आहेत . मुलींचे पगार भरमसाट अर्थात कर्तृत्त्वाने मिळवलेले ( पण तेच आज लग्नाचा मोठा अडथळा होऊ पाहत आहेत ) आणि आणि मला १० लाख पगार, मग मला २० लाख पगार असलेला मुलगा हवा किंवा त्या पेक्षा अधिक पगार असलेला मुलगा हवा ही अपेक्षा! संसार ह्या शब्दाचा अर्थच कुठेतरी हरवत चालला आहे . आधीचे ते कांदेपोहे बरे म्हणायची वेळ आली आहे. अरे काय चाललंय काय ?

भानावर या लवकर, नाहीतर त्या २० लाखांच्या नोटांशी विवाह करावा लागेल. पैशावर प्रेम केलेत तर पैसा मिळत राहील, सुख सुविधा मिळतील, पण नवर्‍याचे प्रेम मिळणार नाही. कारण हाच पैसा मिळवायला स्वतःचे सो कॉल्ड स्टेट्स जपायला तो घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा कॉम्पुटर घेऊन काम करत राहील आणि जगणे व पर्यायाने सहजीवनाचा आनंद गमावून बसेल. पालकांनीही भानावर या, नाहीतर मुलांचे /मुलींचे विवाह आपल्या उभ्या हयातीत पाहायला मिळणार नाहीत. हे ऐकायला आणि वाचायला त्रासदायक आहे पण त्रिवार सत्य आहे आणि हे चित्र आपणच बदलू शकतो .

एक मुलगी, तिला पगार ३ लाख आणि नवरा हवा १० लाख पगाराचा. तिला मी म्हटले, अगं तुला आणला तुझ्या मनासारखा १० लाखाचा बाहुला, पण तो स्वीकारेल का तुला? तो म्हणेल मला हवी १० लाखाची बाहुली त्याचे काय करणार आपण ? आपण काय आहोत आणि काय अपेक्षा करत आहोत ह्याचा कुठेही ताळमेळ नाही . एकतर मुलगा पुण्यातील हवा नाहीतर थेट अमेरिक .अग्गोबाई ? मध्ये काही पर्याय नाही की काय? मध्ये काय सगळी वाळवंट आहेत की काय? आपण स्वतः सदाशिव पेठेतून बाहेर आलो नाही आणि जायचे ते थेट अमेरिका? असो!

माणूस पैसा मिळवायच्या मागे लागला कारण ऐहिक सुखासाठी तो आवश्यक आहे, अगदी मान्य! पण, जेव्हा पैसा हाच विवाह ठरण्याचा निकष ठरतो तेव्हा गणिते बदलत जातात . माझ्या वर प्रेम करणारा , मला माणूस म्हणून समजून घेणारा , माझ्या आवडी निवडी, माझे छंद ह्यांना प्रोत्साहन देणारा नवरा हवा असे एखाद्या तरी मुलीने म्हणावे. सतत पैशाचा चष्मा लावून बसलात, तर असंख्य आनंदाच्या क्षणांना मुकाल आणि भानावर याल तेव्हा वेळ नुघून गेलेली असेल. मुलीला १० लाख पगार म्हणून त्याही पेक्षा कमी पगार असणारी स्थळे नाकारायची, मग उरणार काय ओंजळीत? सगळंच वाहून जाईल.

मुळात पैसा हा विवाहाचा निकष हे समीकरण न पटणारे आहे . स्त्रियांना शिकवले, त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी! त्यांना आचार विचारांनी स्वावलंबी केले हे चुकले की काय पालकांचे ? नाही, काहीच चुकले नाही; पण चुकत आहे ते ह्या गोष्टीना अवास्तव महत्त्व दिल्यामुळे! मुलींची वय सुद्धा ३५ शी ओलांडत आहेत . मला ८ लाख पगार आहे आणि मुलालाही तितकाच किंवा अगदी एखादा लाखभर कमी असला तरी चालेल. दोघांचे होतात की १५-१६ लाख... त्यात संसार सुखाचा नक्कीच होईल . आपल्या आईवडिलांनी नाही का केला? त्यांना कुठे होते लाखांनी पगार . पण त्यांचा विवाह संस्था , सहजीवन ह्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता.

आज त्यांचाच तो सहजीवनाचा आनंद देणारा चष्मा पुन्हा एकदा डोळ्यांना लावायची नितांत गरज आहे. पुढे जाऊन आता पालकांनी सुद्धा आपली धोरणे थोडी बाजूला ठेवून मुलामुलींशी बोलले पाहिजे , आजकालची मुले हुशार आहेत त्यांना फक्त एक वेगळा संसाराचा आरसा दाखवण्याची गरज आहे. भौतिक सुखे हवी, त्यासाठी लागणारा पैसाही हवा, पण मिळवलेला पैसा उपभोगायला आपणही घरात हवे.

काय होतंय, पैसा हाच निकष प्राथमिक किंबहुना तो एकमेव निकष झाल्यामुळे मुलींची स्थळे शोधताना गुण ,पत्रिका गोत्र सर्व व्यवस्थित असेल तरी पगारावर सर्व गाड्या येऊन थांबतात. पुढे कसे जायचे? माझ्या मते अनेक स्थळांच्या बाबतीत बघण्याचे कार्यक्रम, भेटी गाठी सुद्धा होत नाहीत; कारण मुलीचा पगार अधिक त्यामुळे पुढचे सर्व थांबते. अनेकांना हे अनुभव येत असतील.

आपली विचारसरणी बदलायची वेळ आता आली आहे , आपले अहंकार ( जे आपल्याला आयुष्यभर एकटे ठेवू शकतात ) ते वेळीच आटोक्यात आणण्याची गरज आहे. दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. एकदा वेळ निघून गेली की गेली, मग कितीही अक्कल आली तरी उपयोग नाही . मुळात विवाह हा एक आनंद सोहळा आहे. आईवडिलांसाठी आपल्या मुलांच्या डोक्यावर अक्षता पडणे ह्यासारखे सुख दुसरे असूच शकत नाही . ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले , वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून मुलांच्या गरजा त्यांची शिक्षणं केली, ती त्यांचा सुखाचा संसार पाहायला मिळावा ही एकमेव इच्छा उराशी असलेले पालक आज हतबल झाले आहेत . विवाह म्हणजे सुखाची देवाण घेवाण , दोन जीवांचे मिलन तेही आयुष्यभरासाठी , दोन कुटुंबांचे एकत्र येणे ह्यात पैशाची गणिते आलीच कुठून ? सगळेच राजकुमार परीकथेतील नाहीत. सगळेच आलिशान गाडीतून येणार नाहीत , जो तुमचे मन जिंकून संसार सुखाचा करेल तोच तुमचा खरा खुरा राजकुमार असेल आणि तोच तुमचा सुयोग्य सहचर सुद्धा!

आज हा लेख वाचून निदान एका मुलीने किंवा मुलाने आपल्याला आलेल्या स्थळांचा पुनर्विचार केला आणि आपला जोडीदार शोधला तर त्यासारखा आनंद माझ्यासाठी दुसरा नसेल .तो आनंद सगळ्यांच्या ओंजळीत येण्याची आस धरून आहोत. विचार बदला , आपल्या आवडी निवडी बदला! मला विवाह का करायचा आहे ? ह्याचे सर्व आराखडे पुन्हा एकदा कागदावर मांडा , चुकलेली गणिते पुन्हा सुधारा , पुन्हा मांडा . हाती लागेल तो फक्त आनंद हे नक्की!

पैसा हीच विवाहाची इतिपुर्तता नाही तो आयुष्यभर मिळवायचाच आहे, पण आज जाणारे वय पुन्हा मिळणार नाही ते मात्र मागे फिरवता येणार नाही . संसार सहजीवन ह्याची खरी व्याख्या म्हणजे एकमेकांची सोबत , सहवास असणे ही आहे. पैशाच्या तराजून विवाह तोलण्याची गल्लत आपण करत आहोत . पैसा पैसा करत अनेक उत्तमातील उत्तम स्थळे हातातून निसटून जात आहेत. वास्तवात कधी जगणार आहोत आपण ? सगळे सगळे दूर ठेवून वास्तव स्वीकारण्याची गरज आहे आणि तसे झाले, तर येत्या लग्न सराईत अनेक आई बाबा सासू सासरे झालेले पाहायला मिळतील.

28/11/2023

सौ ऊर्मिला दत्तात्रय यादव यांच्या विवाह सप्तपदी डॉट कॉम वेबसाईट च्या वतीने आयोजित केलेल्या उच्चशिक्षित उमेदवारांसाठी "थेटभेट कार्यक्रम" हा माझ्यासाठी खरोखरच एक आगळावेगळा अनुभव होता. हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल सौ उर्मिला यादव आणि श्री दत्तात्रय यादव या उभयतांचे हार्दिक अभिनंदन.

संपूर्ण महाराष्ट्राच्या मुंबई,पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, अकोला नागपूर अशा कानाकोपऱ्यातून आणि त्याचबरोबर उच्चशिक्षित असे बर्लिन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, स्वीडन असे परदेशस्थ उच्चशिक्षित उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी या थेट भेट कार्यक्रमाला प्रेरणादायी प्रतिसाद दिल्याबद्दल मी या उमेदवारांचे आणि त्यांच्या पालकांचे कौतुक करतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक वधू-वरांना जगप्रसिद्ध सवाई मसाले यांच्याकडून दहा मसाला पाकिटांचा संच भेट म्हणून देण्यात आला. आज आम्ही सवाई मसाला वापरून मिसळ बनवली. सवाईची इतरही मसाला पाकिटे लवकरात लवकर वापरण्याचा मोह आम्हाला होतो आहे. याबद्दलही यादव कुटुंबीयांचे धन्यवाद.

आपल्या परिट समाजातील उच्चशिक्षित उमेदवारांसाठी अत्यंत आधुनिक पद्धतीने, नियोजनबद्ध असा कार्यक्रम आयोजित केला होता. क्षणभर आपण एखाद्या ब्राह्मण समाजाच्या वधूवरांच्या कार्यक्रमाला आलो नाहीत ना ? असं वाटत होतं. नव्या पिढीला आवडेल असे या कार्यक्रमाचे नियोजन होते. विशेष म्हणजे हा देखणा कार्यक्रम केवळ श्री व सौ यादव आणि त्यांची दोन मुलं, जवळचे नातेवईक,मित्र अशा सात आठ जणांनी यशस्वी करून दाखवावा याबद्दल त्यांचे कौतुकच वाटते. आणि याबद्दल मी त्यांचे व त्यांच्या नातलगांचे सर्व पालकांच्या वतीने अभिनंदन करतो.

माझ्या परदेशस्थ मुलासाठी मी या कार्यक्रमास गेलो होतो .अत्यंत नेटक नियोजन असल्याने हा कार्यक्रम अत्यंत चांगला झाला. आपल्या मागील पिढीतील लग्न आपल्या जोडीदाराशी न बोलताच झाली. लग्नानंतर आठवडाभराने आपल्याला पत्नीशी किंवा पतीशी मनमोकळेपणाने बोलता आलं.नवीन पिढीला आपल्या जोडीदाराबरोबर आपले अनुभव, आपल्या भविष्याबद्दल, नोकरी बद्दल, करिअर बद्दल, जोडीदाराच्या अपेक्षा बद्दल आपल्या भावी जोडीदाराबरोबर बोलायचं असतं. एकमेकांना जाणून घ्यायच असतं.याची जाणीव श्री व सौ यादव यांना आहे. म्हणूनच ते थेट भेट सारखा एक चांगला प्लॅटफॉर्म लग्न करू इच्छिणाऱ्या आपल्या समाजातील उच्चशिक्षित मुला-मुलींना करून देत आहेत. आधुनिक पिढीच्या मनाचा, त्यांच्या इच्छा आकांक्षांचा विचार विवाह सप्तपदी केला. असाच विचार परीट समाजातील वधू-वरांचे मेळावे भरवणाऱ्या संस्थांनी करावा असे मला वाटते.

श्री व सौ यादव यांच्या या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती देखील हजर होत्या. पुणे शहरातील परीट समाजाचे काही प्रतिनिधी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी सुद्धा श्री व सौ यादव यांच्या या नवीन उपक्रमाचे कौतुक केले.

मी पुन्हा एकदा श्री व सौ यादव यांचे सर्व वधू वर व त्यांच्या पालकांच्या वतीने एक अत्यंत चांगला प्लॅटफॉर्म मुला मुलींना आणि त्यांच्या पालकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल दोघांचे मनापासून आभार मानतो. इतरांना मदत करणाऱ्या अशा छान व्यक्तिमत्वांना देव नेहमीच आपला आशीर्वाद देत असतो.

- संजय कुमार, पुणे
🙏🙏🙏🙏🙏

🟣 *परीट-धोबी समाजातील*      *वधू-वरांचा*        *थेट-भेट कार्यक्रम*🟢 *सौ ऊर्मिला यादव संचालित* 🟡 *विवाह सप्तपदी डॉट कॉम*...
25/11/2023

🟣 *परीट-धोबी समाजातील*
*वधू-वरांचा*
*थेट-भेट कार्यक्रम*
🟢 *सौ ऊर्मिला यादव संचालित*
🟡 *विवाह सप्तपदी डॉट कॉम*
या वेबसाईट च्या वतीने
🔵 *परीट-धोबी समाजातील*
*वधू-वर यांचेसाठी*
*थेट-भेट कार्यक्रम* Pune

🟡 *सूचना-* 🟡
*1) फक्त एकाच पालकांना प्रवेश दिला जाईल*
2) *वधू-वर उपस्थित नसल्यास पालकांना प्रवेश दिला जाणार नाही*

(कार्यक्रम नियोजित वेळेत सुरू होईल)

🔵संपर्कासाठी फोन-
865565 7200
865565 7201

लग्न करायचं ठरवलंय ? एक 'आदर्श' नवरा, एक 'आदर्श' पत्नी या दोघांचा 'आदर्श' संसार अशी कोणतीही चीज या भूतलावर अस्तित्वात ना...
22/11/2023

लग्न करायचं ठरवलंय ?

एक 'आदर्श' नवरा, एक 'आदर्श' पत्नी या दोघांचा 'आदर्श' संसार अशी कोणतीही चीज या भूतलावर अस्तित्वात नाही. वर्तमानात तशी शक्यता नाही. भविष्यात तर नाहीच नाही. उगाच खोटं कशाला बोलायचं ?

केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील कुटुंब संस्था ही संस्कृती, परंपरा आणि त्याग यासारख्या मूल्यांचे टेकू लावून उभी असलेली. ही 'लग्नसंस्था' मुळातच असंख्य दोष आणि विरोधाभासांनी खिळखिळी झालेली. दोन मनांचं मिलन, दोन शरीरांचे मिलन, दोन आत्म्यांचे मिलन, दोन कुटुंबांचं मिलन या साऱ्या अत्यंत उदात्त आणि पवित्र संकल्पना !

'नातिचरामी' ची शपथ घेऊन वयात आलेलं जोडपं सहजीवनाची सुरुवात करते. अशावेळी प्रत्येक नवपरिणीत जोडप्याच्या नजरेसमोर एक सुंदर स्वप्न असतं. जन्म-जन्मांतरीच्या अखंड सहवासाचं ! एकमेकांच्या कुशीत जगण्या मारण्याचं ! अखेरच्या श्वासापर्यंत एकमेकांची साथ निभावण्याचं !

परस्परांना वचनं देत-घेत स्त्री पुरुष लग्न करण्यासाठी एकत्र येतात. स्त्री-पुरुषांच्या आदिम प्रेरणेने, एका अनामिक आकर्षणापोटी एकमेकांकडे ओढली जातात. एकमेकांच्या सोबतीने अख्खं आयुष्य काढण्याच्या शपथा घेतात. प्रेमभावनेने शारीरिक आणि मानसिक गरजेपोटी लग्न करतात. लग्नाच्या निमित्ताने एक अलिखित धार्मिक सामाजिक करार अस्तित्वात येतो.

लग्न बंधनात अडकलेल्या या दोन व्यक्ती वेगवेगळी संस्कृती, रीतीभात, परंपरा, संस्कार घेऊन वाढलेल्या. वेगवेगळे स्वभाव, वेगवेगळ्या सवयी, वेगवेगळी मूल्य सांभाळत संसार करणारी. आपल्या जोडीदाराबरोबर सुखाचे सोहळे आणि दुःखाचे भोग साजरी करणारी.

आपल्या आधीच्या पिढ्यांचा संसार या तरुणाईने जवळून पाहिलेला. तरीसुद्धा आधुनिक तंत्रज्ञान युगाच्या तरुणाईला लग्नाच नुसतं नाव काढलं तरी भीती वाटते. जोडीदाराच्या प्रेमात स्वतःला झोकून देणारी, समर्पित होणारी, आपल्या आधीची पिढी ! हे लोक कोणत्या धुंदीत एकाच व्यक्ती बरोबर कशी काय राहत होती ? याचच त्यांना कोडं वाटतंय.

नात्याचे पाश नकोत. जबाबदारी नको. कर्तव्य नको. कसलंच उत्तरदायित्व नको. एकाच व्यक्तीशी, एकाच नात्याशी, आयुष्यभर एकनिष्ठेने राहायचं ? तेही कुठल्याही पूर्व अटींशिवाय ?

आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात नव-नवीन आव्हानं मोठ्या हिमतीने पेलणारी तरुणाई ' लग्न करायचे ' या नुसत्या विचाराने सुद्धा धास्तावली आहेत.

मोस्ट ऑफ युवर फ्रेंडस आर मॅरीड ! व्हेन यू विल ?

ज्यांचा लग्न या संकल्पनेवर विश्वास आहे, ते या लग्नाच्या फंदात पडतात. मग त्यासाठी तयारी करायला नको ? लग्न संस्थेवर विश्वास असेल, मनात एकमेकांविषयी शंका नसेल, तडजोडीची तयारी असेल, परस्परांना देण्यासाठी वेळ असेल, मनाचा संयम असेल, मी आणि माझं यातून बाहेर यायचं असेल, फक्त स्वतःचाच स्वार्थी विचार करायचा नसेल. तरच लग्नाच्या मांडवाखालून जा.

यु कान्ट अफोर्ड टू बी सेल्फिश इन मॅरेज.

फक्त स्वतःचाच विचार करत असाल, स्वतःतच रमत असाल, स्वतःसाठी जगायचं ठरवलं असेल, स्वतःचेच सुख पाहणार असाल. मी आणि माझं याच्या बाहेर काही तुम्हाला दिसत नसेल तर ? अशा लोकांनी लग्नापासून दूर राहिलेलं बरं.

तुमच्यावर कधी काळी लग्न करायची वेळ आलीच तर तुम्ही काय कराल ?
कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.

-

There separate Charges for one to One counselling and profile of the Week, said charges can be solemnly decided by VS Team.

शुभ दीपावली 🪔 ❤️
14/11/2023

शुभ दीपावली 🪔 ❤️

Vivahsaptapdi Visheshank 2023385+ profilesContact us if you need book onn9655657201
22/02/2023

Vivahsaptapdi Visheshank 2023

385+ profiles

Contact us if you need book onn9655657201

5 नोव्हेंबर पासून तुळशीच्या लग्नाला सुरुवात होतेय ! आपल्या मुला-मुलीला स्थळं पाहायला सुरुवात करायची आहे ?  मग वाट कशाची ...
29/10/2022

5 नोव्हेंबर पासून
तुळशीच्या लग्नाला सुरुवात होतेय !

आपल्या मुला-मुलीला स्थळं पाहायला सुरुवात करायची आहे ?

मग वाट कशाची पाहाताय ?

रविवार दिनांक 6 नोव्हेंबरला
विवाह सप्तपदी डॉट कॉम
आयोजित
थेट-भेट कार्यक्रम पुणे मेळाव्यास या.

थेट-भेट कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात जमणाऱ्या सुशिक्षित स्थळांमधून
मनपसंत जोडीदार,
जावई-सून निवडा.

मेळाव्याला येण्यासाठी
पूर्व नोंदणी आवश्यक.
संपर्क-
8655657200
8655657201

पुण्यात वधू-वरांची प्रचंड गर्दी !विवाह सप्तपदी डॉट कॉम आयोजित थेट-भेट आणि गप्पा गोष्टी या कार्यक्रमाला परिट-धोबी समाजाती...
16/05/2022

पुण्यात वधू-वरांची प्रचंड गर्दी !
विवाह सप्तपदी डॉट कॉम आयोजित थेट-भेट आणि गप्पा गोष्टी या कार्यक्रमाला परिट-धोबी समाजातील मुला-मुलींनी प्रचंड गर्दीत हजेरी लावली. आज पर्यंत पारंपारिक वधु-वर मेळावे हे कार्यकर्ते, त्यांचे सत्कार, त्यांची भाषणे, मुला- मुलींचे पालक यांच्याच गर्दीने फुलून जात असत. विवाह सप्तपदीच्या या कार्यक्रमामुळे मेळावे भरवण्याच्या पारंपरिक चौकटीला छेद दिला गेला. या अभिनव उपक्रमाला समाजातील सुशिक्षित मुला-मुलींनी पालकांच्या संमतीने उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात श्री. दत्ता यादव व वेबसाईटच्या संचालिका सौ. उर्मिला यादव यांनी मुला-मुलींचे विवाहपूर्व समुपदेशन केले. अशा अभिनव व विनामूल्य थेट-भेट कार्यक्रमाचे समाजबांधव, पालक व लग्नाळू सुशिक्षित तरुण-तरुणींकडून स्वागत व कौतुक झाले. सहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर मुला-मुलींनी परस्परांची थेट-भेट घेऊन प्रत्यक्ष संवाद साधला.
आम्ही लवकरच विविध शहरात असेच थेट-भेट कार्यक्रम घेऊ. आपल्या या कार्यक्रमाबाबत काही सूचना किंवा अभिप्राय असल्यास आम्हाला नक्की कंमेंट मध्ये कळवा .

07/05/2022
मुंबईतील 13 फेब्रुवारी,2022, रोजीच्या 💝 *थेट-भेट कार्यक्रमाच्या* 💝 यशस्वी आयोजना नंतर *फक्त परिट-धोबी समाजातील उपवर वधु-...
05/05/2022

मुंबईतील 13 फेब्रुवारी,2022, रोजीच्या
💝 *थेट-भेट कार्यक्रमाच्या* 💝 यशस्वी आयोजना नंतर *फक्त परिट-धोबी समाजातील उपवर वधु-वरांसाठी*
आता असाच
*थेट-भेट कार्यक्रम पुण्यात*....
🙏🙏🙏

सौ. ऊर्मिला दत्ता यादव संचालित,
🌹 *विवाह सप्तपदी डॉट कॉम* 🌹
या वेबसाईट संस्थेच्या वतीने
ज्या परीट-धोबी समाजातील उपवर वधू-वरांना पुण्यातील जोडीदार हवा,
आशा सुशिक्षित, नोकरदार आणि व्यावसायिक
🌹 *परीट-धोबी समाजातील वधू-वर* 🌹
यांचेसाठी
💐 *रविवार, ८ मे रोजी* 💐

🚩 *ब्राह्मण मंगल कार्यालय*

03/05/2022
*जोडीदाराला मोकळ्या मनाने गुणदोषांसहित स्वीकारलं, त्याच्याशी जुळवून घेतल की संसार सुखाचा होतो - सौ मनिषाताई रवींद्र वायक...
02/05/2022

*जोडीदाराला मोकळ्या मनाने गुणदोषांसहित स्वीकारलं, त्याच्याशी जुळवून घेतल की संसार सुखाचा होतो - सौ मनिषाताई रवींद्र वायकर*

लग्न करताना नोकरी, व्यवसाय, शिक्षण,रंग,रूप,पैसा या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. परंतु लग्नानंतर संसार सुखाचा करण्यासाठी जोडीदाराला मोकळ्या मनाने गुणदोषांसहित स्वीकारलं, की संसार सुखाचा होतो. लग्नाच्या रुपाने आपल्याला एक चांगला मित्र, साथीदार मिळतो. दोघेही कमावते असल्यास, जोडीदाराच्या साथीने घर नसेल तर घरही घेता येत. घरात आवश्यक अश्या इतर छोट्या-मोठ्या गोष्टी घेता येतात. जोडीदाराबरोबर संवाद साधता आला, एकमेकांना वेळ देता आला, एकमेकांची काळजी घेता आली की नवरा बायको मधील नात्याची वीण पक्की होते. आणि मग एकमेकांना परस्परांमधील उणीवा जाणवत नाहीत. असा सल्ला थेट-भेट कार्यक्रमाच्या उद्घाटन पर भाषणात मा सौ मनीषाताई रवींद्र वायकर यांनी उपस्थित वधू-वरांना मार्गदर्शन करताना, त्यांच्याशी संवाद साधताना दिला.

सौ उर्मिला दत्ता यादव संचलित *विवाह सप्तपदी डॉट कॉम, मुंबई* या संस्थेच्या वतीने मुंबईतच नोकरी करणाऱ्या आणि ज्यांना मुंबईतलाच जोडीदार हवा अशा परीट धोबी समाजातील वधू-वरां साठी, थेट-भेट आणि गप्पा गोष्टींचा कार्यक्रम, रविवार दिनांक 13 फेब्रुवारी,2022 रोजी मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील इच्छापूर्ती गणपती मंदिर- तलावा जवळील दत्ताराम वायकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

मुंबईतील *विनामूल्य प्रवेश* असलेल्या थेट-भेट कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई, वसई ,विरार, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल येथे राहणाऱ्या व नोकरी करणाऱ्या, उच्च शिक्षित उपवर 32 मुली व 30 मुलांनी हजेरी लावली.

विवाह सप्तपदी डॉट कॉम आयोजित थेट-भेट या कार्यक्रमाची संकल्पना ही कालानुरूप सुसंगत अशी आहे. आपल्या समाजातील शिकलेल्या आधुनिक विचारांच्या मुला-मुलींना त्यांची लग्न लवकर जुळण्यास मदत होईल, असा हा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात अनेक मेळाव्यांमध्ये पालकच हजेरी लावतात. मुलं-मुली येतच नाहीत अशी आयोजकांची तक्रार असते.आज या कार्यक्रमात केवळ मुलं आणि मुली दिसत आहेत. विवाह सप्तपदी च्या माध्यमातून सौ ऊर्मिला आणि श्री दत्ता यादव हे दोघेही करीत असलेले समाजोपयोगी काम कौतुकास्पद आहे. थेट-भेट कार्यक्रमाला उपस्थित वधू-वरांना मार्गदर्शन करताना शिवसेनेच्या मीरा-भाईंदर महिला अध्यक्षा मा.सौ. विद्याताई कदम बोलत होत्या.

*या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे या कार्यक्रमास पालकांना प्रवेश नव्हता.*

विवाह सप्तपदी डॉट कॉम आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मा सौ मनीषाताई वायकर मॅडम, सौ विद्याताई कदम मॅडम आणि विवाह सप्तपदीच्या संचालिका सौ ऊर्मिला यादव यांचे हस्ते संत श्री गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली.

संस्थेच्या संचालिका सौ ऊर्मिला यादव यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे सौ मनीषाताई रवींद्र वायकर आणि सौ विद्या ताई कदम आणि उपवर वधू-वरांचे यांचे स्वागत केले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात उर्मिला यादव यांनी विवाह सप्तपदीच्या बारा वर्षाची यशस्वी वाटचाल सांगितली. विवाह सप्तपदीचे आणि यादव कुटुंबीयांचे मार्गदर्शक आणि प्रमुख आधारस्तंभ असलेल्या वायकर कुटुंबीयांचे मनापासून आभार मानले. थेट-भेट या कार्यक्रमासाठी सौ मनीषाताई वायकर मॅडम यांनी विनामूल्य हॉल उपलब्ध करून दिला. याच बरोबर कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मुला-मुलींना वायकर कुटुंबियांकडून बिसलेरी,कोल्ड्रिंक्स, अल्पोपहार, आणि चहा देण्यात आला. मुंबईतील हा थेट भेट कार्यक्रम वायकर कुटुंबियांकडून प्रायोजित होता. विवाह सप्तपदी च्या वतीने वायकर कुटुंबीयांचे त्यांनी आभार मानले.

विवाह सप्तपदी डॉट कॉम या संस्थेचे संस्थापक श्री दत्ता यादव यांनी आपल्या समाजातील मुलं मुली शिकली. आपले गाव सोडून मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली तसेच परदेशात अमेरिका, जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड येथे नोकरी करू लागली. या उच्चशिक्षित मुला-मुलींना विवाह सप्तपदीने त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून अनुरूप जोडीदार निवडायला मदत केली. समाजातील सुशिक्षित, नोकरदार मुला-मुलींना जोडीदार आणि त्यांच्या पालकांना सून-जावई निवडताना खूप अडचणी निर्माण होत असून बदलत्या काळाची पावले ओळखून समाज बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे असे सांगितले.
*आपल्या समाजातील वधु-वरांसाठी विवाह सप्तपदी 2013 पासून व्हाट्सअप चे ग्रुप चालवीत आहे.*
*आपल्या समाजातील सुशिक्षित नोकरदार मुल-मुलीं लग्न ठरवण्यासाठी शादी डॉट कॉम, मराठी मेट्रोमोनी, धोबी मेट्रोमोनी, अनुरूप विवाह संस्था,जीवनसाथी डॉट कॉम अशा अनेक व्यावसायिक ऑनलाईन वेबसाईट वर नावे नोंदवत आहेत. यासाठी आपले समाज बांधव 4,000/= ते 25,000/= इतकी फी भरत आहेत.* त्यातही या वेबसाईट वरील स्थळांबद्दल योग्य ती माहिती मिळत नसल्यामुळे फसवणुकीची भीती आहेच. या वेबसाईटवर आपल्या समाजातील मुले नावे का नोंदवित आहेत ? पैसे भरूनही फसवले जात आहेत. यासाठी समाजातील तथाकथित नेते या मोठ्या मोठ्या वेबसाईटच्या विरोधात काहीच बोलत नाहीत. या ऑनलाइन वेबसाईट ला पर्यायही देत नाहीत.
विवाह सप्तपदी डॉट कॉम या ऑनलाईन वेबसाईट च्या माध्यमातून आपल्या परिट धोबी समाजातील उच्चशिक्षित मुला मुलीं आणि त्यांच्या पालकांना आम्ही एक विश्वसनिय पर्याय दिला.
संस्थेच्या संचालिका सौ ऊर्मिला यादव यांनी रोज सकाळी नऊ ते रात्री सात या वेळेत, मोबाईल फोन वरून समुपदेशकाच्या, समाज शिक्षकाच्या भूमिकेत राहून मुला-मुलींची, पालकांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मध्यस्थाची भूमिका स्वीकारली.

विवाह सप्तपदी अनुरूप मुला-मुलींना प्रथम व्हर्च्युअल पद्धतीने भेटवते. नंतर कॉफी टेबलवर त्यांचा संवाद घडवून आणते. सप्तपदीच्या या बारा वर्षाच्या काळात विवाह सप्तपदीच्या माध्यमातून अनेक लग्न ठरली.

केवळ व्हाट्सअप ग्रुपद्वारे, पुस्तकाद्वारे, ऑनलाइन वेबसाईटद्वारे मुला-मुलींना आणि पालकांना स्थळे सुचवली की आपली जबाबदारी संपली असे न मानता विवाह सप्तपदी ने मुला- मुलींचे विवाहपूर्व समुपदेशन, प्रत्यक्ष गाठीभेटी आणि लग्न ठरेपर्यंत सतत संवाद यावर भर दिला. मुला-मुलींचे पालकांचे म्हणणे आत्मीयतेने ऐकून घेतले. लग्न झाल्यानंतर ते लग्न टिकले पाहिजे, बहरले पाहिजे यासाठीसुद्धा विवाह सप्तपदी आग्रही राहते. यामुळेच अल्पकाळातच समाज बांधवांनी सप्तपदीला आपल्या कूटुंब सदस्याप्रमाणे आदराची वागणूक दिली. याबद्दल दत्ता यादव यांनी विवाह सप्तपदी च्या संचालिका सौ उर्मिला यादव यांच्या वतीने सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

यानंतर दत्ता यादव यांनी समुपदेशकाच्या भूमिकेत राहून उपस्थित मुला-मुलींशी आईस-ब्रेकींग, प्रश्नोत्तरे याद्वारे त्यांना बोलत केलं. मुला-मुलींनी रोखठोक पणे आपली मते मांडली. आपल्या समस्या सांगितल्या. उपस्थित मुला-मुलींनी परस्परसंवाद, ग्रुप डिस्कशन च्या माध्यमातून परस्परांची ओळख करून घेतली.
या थेट-भेट कार्यक्रमात नवीन पिढीतील मुला मुलींकडून लग्न, लग्न विषयक समस्या, बदलते लग्नाचे निकष, नोकरी- करियर-कुटुंब सांभाळताना भावी जोडीदाराकडून अपेक्षा, बदलती कुटुंब व्यवस्था, तंत्रज्ञानाची, सोशियल मीडियाची, पालकांची, आणि पत्रिकेतील ग्रहांची, लग्न ठरवताना होणारी लुडबुड, मुलींच्या तुलनेत मुलांचे शिक्षण, मुलांच्या आणि मुलींच्या अपेक्षा, लग्नाचे वाढलेले वय अशा अनेक प्रश्नांबाबत ओपिनियन पोल द्वारे त्यांची मतं जाणून घेतली. पालकच उपस्थित नसल्यामुळे मुला-मुलींनी या सर्व प्रश्नांना अगदी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी योगेश यादव यांनी आभार प्रदर्शन केले.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vivahsaptpadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vivahsaptpadi:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram