01/03/2025
नवी मुंबई महानगर पालिकेच्या शाळा क्रमांक ७६ मधील इयत्ता ८ वी मधील कुमार आयुष धर्मेंद्र सिंग ह्या मुलाचा मृत्यू इमॅजिका पार्क ह्या ठिकाणी मृत्यू झाला. महानगर पालिकेने आयोजित केलेल्या सहली दरम्यान ही दुर्दैवी घटना घडल्या नंतर आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मा.आयुक्त डॉ कैलास शिंदे यांची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ गेले होते.सन्मा. मुख्यमंत्री यांच्या VC मध्ये आयुक्त साहेब आणि सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी सदर VC मध्ये व्यस्त असल्याचे समजल्या नंतर अतिरिक्त आयुक्त सन्मा. श्री सुनील पवार साहेब यांचे सोबत भेट झाली. या दुर्दैवी दुर्घटनेच्या अनुषंगाने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार साहेबांना एक निवेदन दिले.निवेदनात नमूद केल्या प्रमाणे चौकशी होईपर्यंत शिक्षण उपायुक्त,शिक्षणाधिकारी त्याचप्रमाणे सहल परवानगी प्रकरणातील जबाबदार यंत्रणा यांचे तात्पुरते निलंबन करण्यात यावे अशी आग्रही मागणी अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी शिक्षण विभागातील अनागोंदी कारभार श्री पवार साहेबांच्या लक्षात आणून दिला.&चौकशी कालावधीमध्ये शिक्षण उप आयुक्त, शिक्षणाधिकारी तसेच जबाबदार अधिकारी यांचे तात्पुरते निलंबन करण्यात यावे.
चौकशी कालमर्यादेत करण्यात यावी. तसे न झाल्यास शिवसेना उग्र आंदोलन करेल असा ईशारा अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार यांना देण्यात आला.
निवेदन देताना ऐरोली विधानसभा जिल्हाप्रमुख श्री प्रवीण म्हात्रे, बेलापूर विधानसभा उपजिल्हाप्रमुख सुमित्र कडू, उपशहर प्रमुख समीर बागवान, उपशहर प्रमुख महेश कोटीवाले, विभाग प्रमुख मिलिंद भोईर, विभाग प्रमुख बाबू तळेकर, विभाग प्रमुख सिद्धराम शीलवंत, बेलापूर विधानसभा युवा अधिकारी निखिल मांडवे,उपविभाग अधिकारी संकेत मोरे उपस्थित होते.