16/02/2026
📌 श्री संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जालना येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त अंबड चौफुली तसेच चौधरी नगर, जालना येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या दोन्ही ठिकाणी आयोजित शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थित समाजबांधवांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी जालना जिल्हा कक्षाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. सोपान चव्हाण यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सहाय्याबाबत सविस्तर माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.