03/08/2024
*रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्रा द्वारा व्यसनमुक्ती जन-जागृती कार्यक्रम नेहरू नगर येथील योग केंद्रात संपन्न*
नागपूर: दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी, ( शुक्रवार) प्रिव्हिव फाउंडेशन अंतर्गत, रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र ( लेडीज अँड जेन्ट्स) च्या वतीने नेहरू नगर, नागपूर येथील, नेहरू योग केंद्रात नागरिकांसाठी व्यसनमुक्ती जन-जागृती कार्यक्रम घेण्यात आला. गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला. प्रथम पूजनीय जनार्दन स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यात उपस्थित सर्व गुरूंचा सन्मान केला गेला. यात मुख्य मार्गदर्शन रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्राने संचालक श्री सुरेश वांढरे यांनी "व्यसनमुक्ती" या विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान दिले. तसेच अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष श्री गुणेश्वर आरीकर यांनी सुद्धा यात मोलाचे मार्गदर्शन केले. केंद्राचे मुख्या कौन्सिलर ॲड. अनंत घुलक्षे यानी सुधा मोलाचे मार्गदर्शन केले,मोठ्या संख्येने नेहरू नगर भागातील नागरिकांचा विशेषतः महिलांचा सहभाग होता. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व योगा प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
या साठी श्री. कातोरे (योगा प्रशिक्षक) यांचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाची संकल्पना रिफ्रेश केंद्राच्या संचालिका प्रांजली वांढरे (ताल्हन) यांची होती. हा व्यसनमुक्ती जन-जागृति कार्यक्रम यांच्या मार्गदर्शनात आणि विशेष उपस्थितीत पार पडला. त्यांनी केंद्राची व व्यसन मुक्ती उपचाराची माहिती दिली. अश्या प्रकारे हा कार्यक्रम उत्साहात यशस्वीपणे संपन्न झाला.
श्री गुणेश्वर आरीकर, , अनंत घुलक्षे, श्री. रोहित येटने, योगा शिक्षक ढबाले सर,श्री कातोरे सर, श्री वंजारी सर, श्री बोपचे सर या सर्वांची मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन वंदना वनकर यांनी केले. तर आभार सुरेखा वरघडे यांनी व्यक्त केले. येथे यमुनाताई भोयर, साधना मुरस्कर, ज्योती सहस्त्रबुद्धे, यशोदा सेलुकर, बेबीताई गिरडकर, कल्पना लक्कावार, रेखाताई चौधरी, अस्मिता चव्हाण, ममता वरुडकर,वंदना गाझीमवार,मालाताई, वनिता गिरडकर,अश्या अनेक महिलांची उपस्थिती होती.