18/12/2023
अलीकडल्या काळात दम्याच्या, सर्दी व श्वसनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे...संशोधित आयुर्वेद उपचाराने सदरील रोगांचे समूळ उच्चाटन शक्य आहे.
दमा हा फुप्फुसातील श्वास वाहिन्यांशी संबंधित आजार असून, यात विशेषतः श्वास सोडण्यास त्रास जाणवतो. दम लागण्याची अनेक कारणे आहेत. शरीरात रक्ताची उणीव, हृदयविकार, निकामी मूत्रपिंड अथवा शरीरावर अतिरिक्त चरबी (लठ्ठपणा) आदी कारणांमुळेही दम लागू शकतो. मात्र, त्याला दम्याचा आजार म्हणत नाहीत. फुप्फुसाच्या आत असलेल्या श्वसनवाहिन्यांवर सूज आल्याने त्यांचा व्यास कमी होतो. त्यात स्राव वाढून वाहिन्या आकुंचन
पावतात. अशा वेळी श्वास सोडताना त्रास होतो. एकूणच हा फुप्फुसाचा आजार आहे. दम्याची लक्षणे श्वसनवाहिन्यांवर आलेल्या सुजेमुळे व आतल्या स्रावामुळे फुप्फुसाच्या क्रियान्वयनात अडथळा येतो. त्यामुळे दम लागत असतो. अशा वेळी जे कार्य आपण पूर्वी करीत होतो, तेच आता करताना अधिक त्रास जाणवतो. पूर्वी घरात एक मजला चढून जाताना दम लागत नसे; मात्र नंतर तोच एक मजला चढून गेले तरी दम लागतो. हा दम्याचा त्रास असू शकतो. याशिवाय घरकाम करताना उडणाऱ्या धुळीमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. या धुळीमध्ये अनेक अॅलर्जीकारक घटक असतात. त्यातील प्रमुख म्हणजे 'हाउस डस्ट माइट'. धुळीमुळे अनेक लोकांना अॅलर्जी होऊन दमा होतो. वारंवार सर्दी व खोकलादेखील होते. छातीत भरून येणे हेदेखील याचेच लक्षण आहे. अनेकदा तर अशाप्रकारचे एकही लक्षण आढळून येत नाही; केवळ खोकलाच असतो. अशा वेळी केवळ खोकला आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, हा खोकला दम्यामुळेच असू शकतो. एकूणच नियमित खोकला, घशातून खरखर आवाज येणे, छाती भरून येणे ही लक्षणे दम्याच्या आजारात ढोबळमानाने आढळून येतात. दम्याची कारणे दम्याचा आजार होण्याची अनेक कारणे आहेत. अनुवांशिकता हे दम्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. दमा होण्यासाठी अॅलर्जी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. एखाद्या गोष्टीची अॅलर्जी असेल व त्या गोष्टीचा वारंवार संपर्क आला अथवा अॅलर्जी असलेल्या गोष्टींचे सेवन केले, तर रक्तातील काही घटक वाढतात. त्यातील 'इसोनिओफिल' नामक घटक वाढतो. त्यामुळे श्वासवाहिन्यांवर सूज येते. वातावरणाचा आणि दम्याचा फार जवळचा संबंध आहे. हिवाळा अथवा थंड वातावरण, धूळ व प्रदूषणयुक्त वातावरणदेखील दम्याचा आजार होण्यास पोषक असतात. वातावरणातील प्रदूषणही दम्याचा आजार होण्यास कारणीभूत ठरतात. याशिवाय ब्रॉन्कायटिस, दीर्घकाळ असलेला कफ यामुळे दम लागू शकतो. धूम्रपान दम्याच्या आजारासाठी कारणीभूत ठरते. याशिवाय नियमित होणारे व्हायरल इन्फेक्शन (स्वाइन फ्ल्यू आणि आता कोव्हिड-१९) दम लागण्यास कारणीभूत ठरत आहे. आपणास वारंवार सर्दी होणे, शिंका येणे, घशातून खरखर आवाज येणे, वातावरण बदलल्यावर सर्दी-खोकल्याचा प्रादुर्भाव होणे अशी लक्षणे आढळून आली तर तातडीने आयुर्वेद डॉक्टरांकडे उपचार घ्यावा.
Ayurvedic Therapy | Panchkarm Therapy | Yog Thrapy
Holistic Healing For all Diseases....