Ayurved vyaspeeth nagpur

Ayurved vyaspeeth nagpur सेवा शिक्षा संशोधन प्रचार

07/04/2023

Nagpur:-
अध्यक्ष:- वै श्रीकान्त वणीकर
उपाध्यक्ष:-
1. वै प्रफुल्ल फडणवीस
2. वै आशिष गोतमारे
कार्यवाह:- वै सूरज पिसे
सहकार्यवाह:-
1. वै समीर गिरडे
2. वै.गौतम जोगड
कोषाध्यक्ष:- वै. सचिन मेंढे
सहकोषाध्यक्ष:- वै. मिनल गिरी🎊🎊🎊💐💐💐अभिनंदन १/४/२३

07/11/2022
धन्वंतरी जयंती समारोह २०२२
25/10/2022

धन्वंतरी जयंती समारोह २०२२

 #तीर्थोदकनलूआजी आम्हा नातवंडांची सगळ्यात लाडकी आजी. म्हणायला ती बाबांची काकू. पण ती सगळ्यांचीच माऊली होती. नियतीने तिला...
24/10/2022

#तीर्थोदक

नलूआजी आम्हा नातवंडांची सगळ्यात लाडकी आजी. म्हणायला ती बाबांची काकू. पण ती सगळ्यांचीच माऊली होती. नियतीने तिला मातृत्वाचं सुख दिलं नाही; पण ममतेचं वरदान भरभरून दिलं होतं. बाबांचं शालेय शिक्षण तिच्या घरी झाल्याने तिला त्यांचा पुत्रवत् लळा होता.

नलूआजी आपल्या काळाच्या बरीच पुढे होती. आपल्या संस्कारांची कास न सोडता देखील आधुनिक विचारांचा प्रासंगिक अवलंब करणं हे तिचं वैशिष्ट्य! सणावारांमध्ये, बाळंतपणांमध्ये, लग्नामुंजींमध्ये तिचा तना-मना-धनाने सर्वांना पाठिंबा असायचा. सोवळ्याला स्वच्छतेनं, परंपरांना कर्तृत्वानं आणि अहंभावाला उदारतेनं रिप्लेस करणारी एक silent revolutionary वाटायची ती मला.

वसंताआजोबा आणि नलूआजीची जोडी म्हणजे राम-सीता. सदैव इतरांच्या उपयोगी पडणे, इतरांच्या जीवनात आनंद आणणे हा दोघांचाही स्वभाव होता. वसंताआजोबा हे मैफिली स्वभावाचे, राजस, खुशरंग वृत्तीचे होते; तर नलूआजी काहीशी विरक्त, सात्त्विक, ऋजु स्वभावाची. पण दोघांचं प्रेम हे अगदी उदाहरण द्यावं असं आदर्शवत् होतं. वसंताआजोबांनी हौसेनं तिला सारे दागिने घडवावे, आणि नलूआजीने साधे मंगळसूत्र घालून सुती साड्यांमध्ये वावरावे. सीता-रामांच्या भाळी वियोगाचे भोग होते; यांच्याही नशीबी तेच आले. आजोबांच्या पश्चात् ती २१ वर्ष एकटी राहिली; त्यातली १८ वर्ष आजारपणात!

नलूआजीनं आयुष्यभर सर्वांना लळा लावला, पण कोणाचाही पाय गुंतवून ठेवला नाही. तिचं “नलिनी” नांव होतं, अन् आत्मभाव कमलपत्रावरच्या जलबिंदुसारखा निर्लिप्त होता. तिचं माहेर इंदूरचं असल्यानं तिच्या बोलण्यात मधून-मधून एखादा हिंदी शब्द यायचा. “ज्याला आपल्या कोख मधून जन्म दिला, त्याच्याच कडून अपेक्षा करता येते, पण तोही पूर्ण करेल याची काय गॅरंटी?” असं वाक्य मी एकदा तिच्या तोंडून ऐकलं होतं. ती तिची अगतिकता नसून निरपेक्ष स्वीकारोक्ति होती.

ती आध्यात्मिक पातळीवर अतिशय उन्नत होती. स्वतः मीरा-भावाने कृष्णभक्तीत तल्लीन असायची. बाहेरून सर्वांत मिसळलेली दिसली, तरी आतून तिचं अनुसंधान सुरु होतं. जीवनाच्या शेवटच्या काळात देहभान व्यवस्थित नसतांना देखील तिची जपमाळ सुटली नाही.

सुरुवातीला आजारपणातून ती तशी बरी झाली होती. पण तेंव्हापासून ती एकटेपणाच्या कोषात बंदिस्त होऊन राहिली. नरेंद्रनगरातल्या घरातून ती शेवटच्या जवळ-जवळ एक दशकापासून बाहेर पडली नाही. आमचे ममता काकू आणि राजू काका यांनी तिची यथाशक्ति सेवा केली. पण काही अपरिहार्यतांमुळे तिचा अंतकाळ मात्र हेल्थकेयर सेंटर मध्ये गेला. अतिशय सुंदर दिसणाऱ्या आमच्या नलूआजीची जरारोगाने पार रया गेली होती. नियतीने तिचे एक एक गात्र शिथिल करीत तिच्याशी पाठशिवण खेळली. शेवटी दिवाळीतल्या चतुर्दशीला ही कृष्णभक्तीची ज्योत कृष्णतत्त्वात विलीन झाली.

माझी मौंज वसंताआजोबा-नलूआजी यांच्या मांडीवर लागली होती. त्या नात्याने ते माझे धर्मपालक होते. त्यांचं, विशेषतः नलूआजीचं दुःख हलकं करण्यासाठी मी काहीच उपयोगात येऊ शकलो नाही, याची मला फार खंत वाटते.
तिचं जीवन दुःखमय असलं, तरी केविलवाणं अजिबात नव्हतं.
बोरकरांच्या शब्दात सांगायचं झाल्यास,

“देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे”

श्वेत-धवल सुती किंवा कोसाच्या साडीतलं नलूआजीचं रूप आठवलं, की परहिताच्या तृप्तीची तीर्थयात्रा घडते.

आज ती इहभोगातून मुक्त झाली. तिचा सत्कर्मांचा पुण्यसंचय बघता, तिला सद्गति मिळणार हे निश्चित. पण मला मात्र तिची क्षमाच मागावीशी वाटते.
आणि कृष्णाकडे तिच्या बंधमुक्तीचं दान मागावंसं वाटत.

नलूआजीला साश्रु श्रद्धांजली!

🥲🙏🏻

आयुर्वेद व्यासपीठ, नागपुर शाखा की ओर से आज धन्वन्तरि पूजन तथा वैद्य सम्मान समारोह सम्पन्न हुआ। प्रमुख अतिथि डॉ. चन्द्रगु...
23/10/2022

आयुर्वेद व्यासपीठ, नागपुर शाखा की ओर से आज धन्वन्तरि पूजन तथा वैद्य सम्मान समारोह सम्पन्न हुआ। प्रमुख अतिथि डॉ. चन्द्रगुप्त वर्णेकर जी थें। इस अवसर पर वैद्य मुकुन्द दिवे जी, वैद्य प्रतीन पट्टलवार जी तथा वैद्य प्रज्ञा मेश्राम जी को सम्मानित किया गया।

29/09/2022
⚜️⚜️⚜️🌹⚜️⚜️⚜️आयुर्वेद व्यासपीठ आयोजित    NATIONAL ONLINE     *युक्ताहार प्रतियोगिता*     Health भी और taste भी🌸आयुर्वेद ...
29/09/2022

⚜️⚜️⚜️🌹⚜️⚜️⚜️
आयुर्वेद व्यासपीठ आयोजित

NATIONAL ONLINE
*युक्ताहार प्रतियोगिता*

Health भी और taste भी

🌸आयुर्वेद व्यासपीठ यह आयुर्वेद के लिये कार्यरत राष्ट्रस्तरीय संघटना है .इस वर्ष यह संघटना अपना रौप्य महोत्सव वर्ष मनाने जा रहा है . इसि उपलक्ष में आयुर्वेद व्यासपीठ जनसामान्य के लिये ला रहि है एक विशेष भेट......
💫*युक्ताहार प्रतियोगिता*💫

🌸"हर दिन हर घर आयुर्वेद" इस आयुष के घोषवाक्य की प्रचिती आपको भी हो ऐसि यह प्रतियोगिता है.

और ..............

आकर्षक इनामों के विजेता बन सकते है .💫💫✨💫💫

🌸*स्पर्धा के विषय *-

1.परंपरागत चलती आयी परंतु लुप्त हो रही स्वास्थवर्धक पाककृतियां .

2. स्वास्थ्य की दृष्टि से परिवर्तित दीपावली की पाककृतियां॒॒.

3. मुंग ,जवार ,चावल की फुली (लाही )मुनक्का,हलीम(अहळीव) , आवला इनमे से कोई एक को लेकर बनाई गई टिकाऊ पाककृती.

🌸स्पर्धा के कुछ नियम ...

1. इस स्पर्धा मे सभी सहभागी हो सकते है.

2. एक कृती एक पंजीकरण मतलब हर एक गट के लिये अलग अलग पंजीकरण आवश्यक है.

3. पंजीकरण गुगल फॉर्म के द्वारा करना है और साथ मे हर एक रेसिपी के ingredients, कृती बनाते वक्त और बनी हुई कृती ऐसे तीन फोटो और हातो से लिखी हुई कृती की पीडीएफ फाईल बनाकर गुगल फॉर्म से जोडना है.

4. पैसे भरने के बाद उसका स्क्रीनशॉट भी गुगल फॉर्म से जोड दे.

5. कृपया अपनी पाककृती निम्नलिखित फॉर्मेट मे ही भेजे.
A-साहित्य
B- कृती
C- उपयुक्तता एवं गुणधर्म

6. प्रतियोगिता का नतीजा धनतेरस के दिन घोषित किया जायेगा.

7. परीक्षकोंका फैसला अंतिम फैसला रहेगा.

🌸 कालावधी-

26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर

🌸पंजीकरण शुल्क -100/-

🌸बँक details
AYURVED VYASPEETH
Bank of Baroda
Ac. No. 04680100018054
IFSC CODE -BARB0 AMRAVA (fifth character is zero)

🌸गुगल फॉर्म की लिंक निम्नलिखित -
https://forms.gle/exk1aksoeB4CK2tN6

🌸 प्रथम पारितोषिक -3000/-
द्वितीय पारितोषिक-1500/-
(हर एक catogory में अलग अलग पारितोषिक दिये जायेंगे)

🌸 विजेताओके रेसिपी के व्हिडिओ आयुर्वेद व्यासपीठ के you tube channel ,twitter पे upload किये जाएंगे.(अंतिम अधिकार संयोजको पर निर्भर रहेंगे.)

🌸संपर्कहेतु क्रमांक-
Vd Pallavi Agarkar- 9834645280

Vd Charusmita Shah -9423124003

Vd Kshama Kochar-
9422865579

Vd Jayashri shingvekar-
9403313191

दिनांक 30जुलै, भाऊ मूळक आयुर्वेदिक कॉलेज ला मा. वैद्य सुविनय दामले सरांच व्याख्यान, विषय =यालाच म्हणतात आयुर्वेद, उपस्थि...
06/08/2022

दिनांक 30जुलै, भाऊ मूळक आयुर्वेदिक कॉलेज ला मा. वैद्य सुविनय दामले सरांच व्याख्यान, विषय =यालाच म्हणतात आयुर्वेद, उपस्थिती 125

Address

Nagpur
440034

Telephone

+919422120878

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurved vyaspeeth nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram