ABVP Vidarbha

ABVP Vidarbha Official Page of the Vidarbha State Unit of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) Independence brought in its wake the challenge of reconstruction.

ABVP was started in 1948 after Indian Independence with the objective of channelizing student's energies in the task of national reconstruction by a group of students and teachers and registered on 9th July 1949 and the day of registration is also celebrated as National Student Day across the India. Akhil Bharatiya Vidyarthi Parishad is an all India student Organization, working in the field of education with a wider perspective of National Reconstruction. ABVP works with a faith in the collective existence of the educational community, a firm belief in constructive work and a nationalist approach which stays above partisan politics. The genius of the country has rusted hundreds of years of foreign rule. It was imperative, therefore, that the society re-organised itself in all its fields, each member doing his bit in his own field. As the reorganization and reconstruction, of each field would ultimately result into national reconstruction, the Parishad chose the field of education as its field of activity. Founded in 1949 in Delhi, ABVP has gradually spread its work across various universities in India. ABVP runs projects and programmes aimed at national integration and social consciousness programmes to solve the economic and other problems of the students and programs to encourage the hidden talent of the Students, with a view to bringing the best out of everyone. Thus ABVP conducts Book-Bank, Students' Vacation Employment Bureau, First Class First Felicitation Functions, Inter Collegiate and inter-University Music Competitions, Painting Competitions, Literary Competitions, Student- Writers' Meets, Sports Meets, Social Participation Campus, Personality Development Camps, Technical, Medical, Management, Agri Students Workshops, Technical Exhibitions, Indo-Foreign Students' Bureau, Study Circles and Art Circles, Students' Experience in inter-state Living, My Home is India, Students for Development etc.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वाडी नगर द्वारा १९ नोव्हेंबर २०२५ रोजी राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त वर्धमान सैनिक श...
20/11/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वाडी नगर द्वारा १९ नोव्हेंबर २०२५ रोजी राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त वर्धमान सैनिक शाळा व कनिष्ठ विद्यालय वडधामणा येथे व्याख्यानात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते प्रांत मंत्री पायलताई किनाके, प्रा.सुनीता मंजेवार, वाडी नगर मंत्री रेणुका सोनवणे, वाडी नगर कार्यालय मंत्री प्रज्ञा बनसोडे उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यवतमाळ नगर द्वारा १९ नोव्हेंबर २०२५ रोजी राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त "दाते डीएड मह...
20/11/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यवतमाळ नगर द्वारा १९ नोव्हेंबर २०२५ रोजी राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त "दाते डीएड महाविद्यालय यवतमाळ येथे भाषणात्मक कार्यक्रम घेण्यात आलं, यात प्रमुख उपस्थिती विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ.श्रीकांत पर्बत, प्रमुख वक्ता म्हणून पर्बत मॅडम, विभाग छात्रा प्रमुख आर्या मिश्रा, जिल्हा सह संयोजक पूजा कुडमेथे, नगर मंत्री कुणाल काळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

१५०वी भगवान बिरसा मुंडा जयंती, जनजाती गौरव दिवस निमित्य हिवरकार आर्टस & कॉमर्स सिनिअर कॉलेज साई नगर दत्तावाडी येथे पूजनत...
20/11/2025

१५०वी भगवान बिरसा मुंडा जयंती, जनजाती गौरव दिवस निमित्य हिवरकार आर्टस & कॉमर्स सिनिअर कॉलेज साई नगर दत्तावाडी येथे पूजनत्मक व्याख्यानात्मक व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यावेळेस उपस्थित प्रा.आतिश गजभे, प्रा.राजेश्वरी सांगोळकर, वाडी नगर मंत्री रेणुका सोनवणे, कार्यालय मंत्री प्रज्ञा बनसोडे, महाविद्यालय कार्यकारिणी अध्यक्ष साहिल आत्राम, व महाविद्यालय कार्यकारिणी उपस्थित होती.

*“बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।”*शौर्य, बलिदान एवं देशभक्ति की ...
19/11/2025

*“बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।”*

शौर्य, बलिदान एवं देशभक्ति की अद्वितीय प्रतिमूर्ति, झाँसी की रानी लक्ष्मीबाई जी की जयंती पर शत–शत नमन!

📢 ABVP नागपूर महानगर निवेदन – प्राध्यापक भरती निकष बदलावेत!महाराष्ट्र शासनाच्या नवीन ७५:२५ भरती सूत्रामुळे नुकतेच SET/NE...
18/11/2025

📢 ABVP नागपूर महानगर निवेदन – प्राध्यापक भरती निकष बदलावेत!

महाराष्ट्र शासनाच्या नवीन ७५:२५ भरती सूत्रामुळे नुकतेच SET/NET उत्तीर्ण किंवा PhD धारक विद्यार्थी अन्यायग्रस्त होत आहेत. UGC च्या ५०:५० सूत्राऐवजी ७५ गुणांमध्ये अनुभव व संशोधनाचे वजन दिल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही कमी गुण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन उमेदवार पात्र ठरत नाहीत.

ABVP ने कुलगुरूंना निवेदन देत स्पष्ट मागणी केली की सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी UGC मान्य ५०:५० सूत्रच लागू करावे व मानांकनातील दुजाभाव तातडीने दूर करावा.
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगराद्वारे उच्च शिक्षण सहसंचालक अमरावती विभाग यांना प्राध्यापक भरतीच्या नवीन निक...
18/11/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगराद्वारे उच्च शिक्षण सहसंचालक अमरावती विभाग यांना प्राध्यापक भरतीच्या नवीन निकषांमध्ये बदल करण्याबाबत निवेदन देण्यात आले..!

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगराद्वारे उच्च शिक्षण सहसंचालक नागपूर विभाग यांना प्राध्यापक भरतीच्या नवीन निकषा...
18/11/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगराद्वारे उच्च शिक्षण सहसंचालक नागपूर विभाग यांना प्राध्यापक भरतीच्या नवीन निकषांमध्ये बदल करण्याबाबत निवेदन देण्यात आले..!

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगराद्वारे मा.कुलगुरू राष्ट्रांत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांना प्राध्यापक...
18/11/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगराद्वारे मा.कुलगुरू राष्ट्रांत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांना प्राध्यापक भरतीच्या नवीन निकषांमध्ये बदल करण्याबाबत निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने नुकताच एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या शासन निर्णयानुसार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी निवड होण्यासाठी ७५:२५ हे सूत्र ठेवण्यात आले आहे, ज्यात शैक्षणिक पात्रता, शिकवण्याचा अनुभव आणि संशोधन कार्य या सर्वांना मिळून ७५ गुण ठेवले आहेत आणि या ७५ पैकी किमान ५० गुण जर मिळाले असतील तरच ती व्यक्ती मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहे व त्यानंतर २५ गुण हे मुलाखतीसाठी आहेत. पण सहाय्यक प्राध्यापक म्हणून अर्ज करण्यासाठी सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण अथवा पीएचडी झालेली असावी असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे मार्गदर्शक तत्वे सांगतात. या मार्गदर्शक तत्वानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी ५० गुण आणि मुलाखतीसाठी ५० गुण म्हणजेच ५०:५० चे सूत्र ठरवले आहे आणि हे सूत्र योग्य तसेच सर्व समावेशक असे आहे. परंतु महाराष्ट्राच्या या शासन निर्णयात मात्र या ७५ गुणांमध्ये मुळात केवळ सेट-नेट झालेल्या व्यक्तीला शिकवण्याचा अनुभव आणि संशोधन कार्य या संदर्भात गुण कसे मिळणार?बदल करावा अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे. मा.कुलगुरूजर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण नाही केली तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी विदर्भ प्रांत मंत्री कुपायल किनाके, नागपूर महानगर मंत्री वीरेंद्र पौणीकर, धरमपेठ नगराध्यक्ष प्रा.किशोर पाटील, महानगर शोध प्रमुख प्रा.दामोदर द्विवेदी, डॉ.अमृता इंदुरकर, प्रा.किशोर नैताम, नागपूर विद्यापीठातील शोधार्थी, प्राध्यापक व कार्यकर्ते उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगराद्वारे उच्च शिक्षण सहसंचालक नागपूर विभाग यांना प्राध्यापक भरतीच्या नवीन निकषा...
17/11/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगराद्वारे उच्च शिक्षण सहसंचालक नागपूर विभाग यांना प्राध्यापक भरतीच्या नवीन निकषांमध्ये बदल करण्याबाबत निवेदन देण्यात आले. या शासन निर्णयानुसार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी निवड होण्यासाठी ७५:२५ हे सूत्र ठेवण्यात आले आहे, ज्यात शैक्षणिक पात्रता, शिकवण्याचा अनुभव आणि संशोधन कार्य या सर्वांना मिळून ७५ गुण ठेवले आहेत आणि या ७५ पैकी किमान ५० गुण जर मिळाले असतील तरच ती व्यक्ती मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहे व त्यानंतर २५ गुण हे मुलाखतीसाठी आहेत. पण सहाय्यक प्राध्यापक म्हणून अर्ज करण्यासाठी सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण अथवा पीएचडी झालेली असावी असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे मार्गदर्शक तत्वे सांगतात. या मार्गदर्शक तत्वानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी ५० गुण आणि मुलाखतीसाठी ५० गुण म्हणजेच ५०:५० चे सूत्र ठरवले आहे आणि हे सूत्र योग्य तसेच सर्व समावेशक असे आहे. परंतु महाराष्ट्राच्या या शासन निर्णयात मात्र या ७५ गुणांमध्ये मुळात केवळ सेट-नेट झालेल्या व्यक्तीला शिकवण्याचा अनुभव आणि संशोधन कार्य या संदर्भात गुण कसे मिळणार? शिवाय या अटींमधे एक भेद असा करण्यात आला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील महाविद्यालय व विद्यापीठातून आपले युजी, पीजी आणि एम.फिल. पीएचडी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असेल त्यांना तुलनेने एका अर्थाने कमी गुण मिळणार आहेत. याचा अर्थ केवळ सेट-नेट अथवा पीएचडी झालेली व्यक्ती आणि शिवाय ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या ७५ पैकी ५० च्या अटी मध्ये पात्रच ठरूच शकणार नाही, म्हणजे महाराष्ट्रातील बहुसंख्य महाविद्यालय व विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना या प्रक्रियेतून डावलले जात आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अशा व्यक्तींना अर्ज करण्याची मुभा आहे पण महाराष्ट्राच्या या शासन निर्णयानुसार अशा व्यक्तींनी जरी अर्ज केला तरी ते पात्रच ठरू शकत नाही. हा एक प्रकारे नवीन पास झालेल्या सेट-नेट अथवा पीएचडी झालेली व्यक्ती जी सहायक प्राध्यापक पदासाठी नियुक्तीस पात्रच ठरू शकणार नाही त्यांच्या वर अन्याय करणारा निर्णय आहे.
या शासन निर्णयात सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापक या संदर्भात ज्या अटी आहेत त्या ७५ :२५ या सूत्रानुसार होण्यास काही आक्षेप असण्याचे कारण नाही. पण एन्ट्री पॉइंटला सहायक प्राध्यापक भरतीसाठीचे ७५:२५ चे सूत्र न अवलंबता विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेले ५०:५० चे सूत्र अवलंबावे, तसेच शैक्षणिक पात्रतेतील दुजाभाव करणारी मानांकन पद्धती यामध्ये बदल करावा अशी अखिल भारतीय विद्यार्थी पर

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगराद्वारे उच्च शिक्षण सहसंचालक अमरावती विभाग यांना प्राध्यापक भरतीच्या नवीन निक...
17/11/2025

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगराद्वारे उच्च शिक्षण सहसंचालक अमरावती विभाग यांना प्राध्यापक भरतीच्या नवीन निकषांमध्ये बदल करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

Address

"छात्र चेतना भवन", आनंद टॉकीज़ चौक, सिताबर्डी, नागपुर
Nagpur
440012

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Vidarbha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to ABVP Vidarbha:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram