Bhavisha Polyclinic , Kasturinagar, Nagpur

Bhavisha Polyclinic , Kasturinagar, Nagpur Family medicine and Consulting services, Road side accidents, Trauma Care Surgical centre, Peadiatri

05/10/2025
28/09/2025
16/03/2021

मि मागच्या पंधरा वर्ष्यांपासुन क्लिनिकल जनरल प्रॅक्टीस करतो आहे . आता चार वर्ष्यापासुन आयुर्वेद सुद्धा करायला लागलोय . मागच्या पंधरा वर्ष्यात असंख्य प्रकारचे रुग्ण , त्यांची लक्षणे आजार वगैरे , ट्रीटमेंट्सचा खुप जवळुन अनुभव आला आहे .

सुरुवातीचा म्हणजे मे - २००५ ते ऑगस्ट २००६ ह्या काळात म्हणजे २००६ मध्ये चिकुनगुनियाची जी साथ महाराष्ट्रत आली होती , त्याच्या अगोदरचा एक दिड वर्ष्यांच्या काळाचा पेशंट्सचा अनुभव आणी त्यानंतरचा अनुभव ह्यात प्रचंड फरक जाणवला . पावसाळ्याच्या दिवसात थंडी तापाने फणफणलेले भरपुर पेशंट्स ट्रीट केले . त्यावेळी ह्या व्हायरल इंफेक्शन मध्ये मि स्वता ओफ्लोक्झसिन ( Ofloxacin ) आणी डॉक्झीसायक्लिम ( Doxycycline ) ह्यासारखे अगदी सामान्यांच्या खिश्याला परवडतील अश्या औषधांचा वापर करत होतो . सोबत क्लोरोक्वीन ह्या मलेरियाच्या औषधाचा वापर नित्याचा होता . आणी विशेष म्हणजे ह्या साध्या औषधान्नी अगदी १०२-१०३ ताप असणारे पेशंट्स टणक्यात चांगले व्हायचे . एखाद सलाईन लावल कि विषय संपला . टायफॉइड मध्ये ॲझिथ्रोमायसिन ( Azitromycine ) सारखे औषध वापरल्यानंतर पेशंट्स अगदी घरच्या घरी चांगले व्हायचे हा माझा अनुभव आहे .

२००६ च्या चिकुनगुनियाच्या साथीनंतर ही परिस्थिती सपशेल बदलली . चिकुनगुनिया हा स्ट्रॉंग व्हायरल आजाराची साथ होती . ह्यात संधिवातासारखी लक्षणे दिसायची . थंडी ताप , सांध्यांच्या ठिकाणी प्रचंड वेदना अशी सामान्य लक्षणे ह्यात होती . महत्वाची गोष्ट अशी कि ह्या व्हायरल साथीमध्ये वर सांगितलेल्या औषधांचा काहीच उपयोग होत नव्हता हे विशेष ! ह्याच साथीत डॉक्टर लोक्स क्लोरोक्वीन जणु विसरले आणी ॲंटी - व्हायरल किंवा ॲंटीमलेरिअल म्हणुन त्याची जागा अर्तेमिथर ( artemether ) आणी आर्टीस्युनेट ( Artesunate ) सारख्या औषधान्नी घेतली . ह्यापुर्वी सुद्धा ही औषध वापरली जात होती , पण प्रमाण प्रचंड कमी होत . ॲंटीबायोटिक्स चा वापर ह्याच काळात मोठ्या प्रमाणात झाला . ताप कमी होत नसल्याकारणाने हायर ॲंटीबायोटिक्स सर्रासपणे वापरले गेले , ते आजतागायत वापरले जात आहेत . ॲंटीव्हायरल ड्र्ग्जचे नवनविन जनरेशनच्या औषधान्मुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती प्रचंड कमी झाली आणी ह्या औषधांचा रेझिस्टंट सुद्धा आजारान्ना येत गेला . मोठ्या हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या ह्या औषधांचा दुष्परिणाम रुग्णासोबतच खेड्यात किंवा ग्रामीण भागात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरान्ना भोगावा लागाला कारण त्यांचा ॲंटीबायोटिक्सचा वापर मर्यादित असतो . एकदा का कोणत्याही आजाराच्या विषाणु किंवा जिवाणुन्ना त्या ॲंटीबायोटिक्सची सवय झाली कि त्यान्ना वेगळे ॲंटीबायोटिक्स किंवा ॲंटीव्हायरल औषध द्यावी लागतात . जितकी नविन जनरेशनची ही औषधे वापराल , तितकी लोकांची प्रतिकारशक्ती कमी होणार हे ठरलेले आहे , म्हाणजे ही औषध वापरल्यान्नंतर रुग्णात प्रचंड अशक्तपणा येतो , तो कमी व्हायला दिड दोन महिने इतका कालावधी सुद्धा लागु शकतो .

आता कोरोनाच्या काळात काय होतय बघा ! वर सांगितलेली औषधांचा सुद्धा ह्यावर परिणाम होताना दिसत नाहीये . तापाने फणफणलेल्या काहीच रुग्णान्ना ह्याचा उपयोग होताना दिसतोय . ह्यात एक महत्त्वाचे सांगावेसे वाटते कि अगोदर ज्यान्नी ही औषधे घेतली नसतील , त्यान्ना उपयोग होतो . अगोदर घेतलेल्यांची प्रतिकारशक्ती चांगली असल्यास उपयोग होइल अन्यथा नाही . मग त्यांचा छातीचा सिटी स्कॅन करुन किती टक्के तापाची लागण आहे हे बघायच आणी मग त्यानुसार रेमडेसिविर ( Remdesivir ) किंवा फॅबी - फ्ल्यु ( Favipiravir ) ह्यासारख्या ॲंटीव्हायरल औषधांचा वापर करायचा अस सद्ध्या तरी सुरु आहे .

*अस_का_होतय ?*

आतापर्यंतच्या आजारात केवळ ताप आला म्हणुन व्हायरल इंफेक्षन मधे इतका अशक्तपणा येत नव्हता , जो ह्या व्हायरल मध्ये बघायला मिळत आहे . निव्वळ एक दिवस ताप येतो आणी पेशंट जागच हलु शकत नाही ? हा कसला परिणाम आहे , ह्याचा विचार आम्ही कधी केलाय का ? ह्यावेळेस अस का होत आहे ? ह्यावर विचार व्हायला हवा .

ह्याच सर्वात मोठ कारण अस आहे कि आम्ही आजपर्यंत इतक्या मोठ्याप्रमाणावर ॲंटीबायोटिक्स कुठल्या ना कुठल्या माध्यमातून खाल्ले आहेत किंवा आम्हाला खाऊ घालण्यात आलेले आहेत . ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली , जे चांगल जेवण करतात , व्यायाम करतात , श्रम करतात ( उदा. आदीवासी समाज जो शक्यतो रानावनात राहतो , वाड्याबस्त्यांवर राहतो , जो नैसर्गिक जीवनमान जगत आहे ) अश्या लोकांपर्यंत आजही कोरोना गेलेला नाही . ह्याच महत्वाच कारण म्हणजे नैसर्गिक जीवनमान होय .

*आता_पुढ_काय_होणार ?*

हा प्रश्न नक्कीच महत्वाचा आहे . जे जे लोक्स ह्यावेळेस कोरोनात आजारी पडले व ज्यान्नी ज्यान्नी वरिल औषध घेतलीत , त्यान्ना प्रचंड अशक्तपणा जाणवत आहे . ह्यात औषधांचा दोष आहे असही म्हणता येणार नाही कारण ते दिल्याशिवाय तुम्हाला चांगल वाटणारही नाही आणी घेतल्यानंतर तर अशक्तपणा राहणारच आहे . आणी ह्यापुढे जर तुम्ही परत तापान आजारी पडलात तर मात्र तुम्हाला कुठली औषध वापरायाची हा सर्वात मोठा यक्षप्रश्न डॉक्टरांपुढे उभा राहणार आहे . काही वयस्कर रुग्ण ज्यान्ना उच्चरक्तदाब किंवा मधुमेह / डायबेटिस आहे , असे काही रुग्ण तर घरी परत आलेले नाहीत . कारण बिपी आणी डायबेटिजमुळे अगोदरच अवयवहानी झालेली असताना ह्या औषधान्नी सुद्धा परिणाम शरिरावर होतो , परिणामी औषध काम करत नाहीत , शेवटी मृत्युला सामोर जाव लागत . इतकी भयानकता सद्ध्या निर्माण झालेली मि माझ्या डोळ्यानी बघत आहे .

*काय_करायला_पाहिजे ?*

ह्या सर्व गोष्टींवर एकच पर्याय आहे कि तुम्हाला तुमच आयुष्य ह्यापुढे जितक नैसर्गिक जगता येईल , तितक नैसर्गिक जगण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे . जिभेचे चोसले जितके कमी कराल , तितक चांगल ! मग आता नैसर्गिक कस ? तर पंचविस तिस वर्ष्याच्या मागे डोकाउन बघा . कस होत आयुष्य ? खाण पिण अगदी सामान्य , सकाळी लवकर उठणे , रात्री लवकर झोपणे , शक्यतो चालत जाउन काम करण्याचा प्रयत्न करणे , बाहेरच अजिबात न खाणे , तेलाचा वापर अत्यंत कमी , मिठाचा वापर अत्यंत कमी , मसाला तळलेल नको किंवा अगदी कधीतरी , साधा आहार , पाणी उकळुन पिणे , कुलर किंवा एसीचा वापर शक्यतो अगदी कमी , फ्रीजच पाणी अजिबातच नको , नॉनव्हेज कमीप्रमाणात , पालेभाज्या व फळभाज्यावर भर , साखरेचा वापर अगदी कमी , कुकरमध्ये शिजवलेल अन्न विष आहे असे समजा , फ्रीजमधील अन्न दुसऱ्यादिवशी खाण म्हणजे आयुष्य कमी करण्यासारख आहे . ह्या गोष्टींचा उपयोग दैनंदिनीमध्ये करणे हाच ह्यावर उपाय आहे .

सद्ध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हात धुणे , गर्दीत मास्क वापरणे , गरम पाणी पिणे , कुठलीही शारिरीक तक्रार अंगावर न काढता विश्वासातल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या . ह्यागोष्टी जरी केल्या तरी तुम्ही ह्याला रोखु शकता . स्वताच्या मनाला प्रश्न विचारा कि काय आम्ही ह्या गोष्टी करतो आहोत ? उत्तर तुम्हाला तुमचच मिळवायचय व पर्याय सुद्धा तुम्हालाच शोधायचा आहे . ही सामाजिक जबाबदारी आहे असे समजुन वागा . धन्यवाद !

*डॉ. चक्रधर पाटील .*
*निऋती आयुर्वेद ( स्किन एण्ड जॉइंट केअर क्लिनिक , चोपडा जि. जळगाव )*
*कॉल : 9921674367*
*व्हाट्स अप : 9156495129*

13/03/2021

Address

Nagpur

Telephone

+919823990199

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhavisha Polyclinic , Kasturinagar, Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Bhavisha Polyclinic , Kasturinagar, Nagpur:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram