Nobel Pathology Lab

Nobel Pathology Lab Nobel Pathology Lab is situated in the city of Nagpur

Body Check Up is @999/- Rs OnlyOffer is for Limited Period only...Contact On:- 8421136146
21/06/2019

Body Check Up is @999/- Rs Only
Offer is for Limited Period only...
Contact On:- 8421136146

06/12/2018
Good morning... 😊
13/11/2018

Good morning... 😊

मधुमेहींसाठी आहार (Diet For Diabetics Marathi Info)मधुमेही व्यक्तींसाठी आहार आणि पोषण कसे असावे?साधारणपणे मधुमेही रुग्णा...
12/11/2018

मधुमेहींसाठी आहार (Diet For Diabetics Marathi Info)

मधुमेही व्यक्तींसाठी आहार आणि पोषण कसे असावे?

साधारणपणे मधुमेही रुग्णाने काय आणि किती खावे हे प्रत्येक रुग्णाला प्रत्यक्ष किंवा फोनवर बोलल्याशिवाय सांगणे कठीण आहे. कारण अमेरिकन डायबेटिक असोशिएशनच्या ताज्या निर्देशानुसार प्रत्येक रुग्णाला त्याचे वय, रोगाचा कालावधी, त्याचा रक्तातील साखरेवरील ताबा, आनुषंगिक इतर व्याधी, इत्यादींची पार्श्वभूमी समजून घेऊन मगच त्याचा डायट ठरविला पाहिजे. मधुमेही रुग्णाने दर दिवसाला आपल्याला किती कॅलरीज अन्नाची गरज आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. हे तुमचा आहारतज्ञ (डायटिशिअन) ठरवून देईल. त्या ठरलेल्या कॅलरीजच्या मर्यादेत दिवसभरातले खाणे आवश्यक आहे.

आपल्याकडे सहज गप्पा मारताना अनेक लोक मधुमेहावर अधिकारवाणीने आणि आत्मविश्वासाने बोलतात. आपण मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कसा योग्य आहार घेतो, हे दुसऱ्याला हिरीरीने पटवून देत असतात. गम्मत म्हणजे सर्वांचे आपसात कितीही मतभेद असले तरी सर्वजण एका सुरात सांगत असतात- “कारल्याचा रस प्या, कारल्याची भाजी खा, मेथी चे दाणे खा!” म्हणजे, गोड खाल्ल्यामुळे मधुमेह होतो, म्हणून कडू खाल्ल्यावर तो बरा होईल, असा सिद्धांत. असा सल्ला देताना आपण एखाद्याचं किती नुकसान करतोय हे या लोकांच्या गावीही नसतं! अशा लोकांच्या सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष करावे आणि क्वालीफाईड आहारतज्ञाचा सल्ला घ्यावा.

याचा अर्थ मधुमेही व्यक्तींसाठी आहारविषयक जनरल गाईडलाईन्स काहीच नाहीत का?
आहेत ना! पण या जनरल गाईडलाईन्स अमलात आणण्यापूर्वी एकदा तरी आहारतज्ञाचा (डायटिशिअन: डायबिटीस स्पेशालिस्टचा) सल्ला जरूर घ्या. मधुमेही व्यक्तींसाठी आहारविषयक जनरल गाईडलाईन्स अशा आहेत:

प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यांचे योग्य प्रमाण:
प्रथिने 10% to 15%
कर्बोदके 55% to 60%
स्निग्ध पदार्थ 25% किंवा त्यापेक्षा कमी

मधुमेही व्यक्तींनी काय खाऊ नये ? (जनरल गाईडलाईन्स)

गूळ किंवा साखर (अगदी मध सुद्धा) घातलेले सर्व पदार्थ बंद
कोकाकोला, पेप्सी, मिरिंडा, मॅंगोला, लिम्का यांसारखे सर्व कोल्ड्रिंक्स बंद करा.
तळलेले सर्व पदार्थ बंद करा.
सर्व बेक केलेले पदार्थ बंद करा.
साबुदाणा, मैदा,रवा, खवा (मावा) यांपासून बनविलेले सर्व पदार्थ बंद
पांढरा भात, बटाटा, रताळे कमी प्रमाणात कमी वेळा खा.
पिकलेले आंबे, चिकू, केळी अतिशय कमी प्रमाणात खा किंवा अजिबात खाऊ नका. (दिवसातून जास्तीत जास्त २५- २५ ग्राम दोन वेळा-एकूण ५० ग्राम.)

मधुमेही व्यक्तींनी काय खावे? (जनरल गाईडलाईन्स)

इडली, उपमा, डोसा इत्यादी
लापशी, खीर (साखर बेताची असावी),
थालीपीठ, पराठा,
भाजके चणे, शेंगदाणे (कच्चे असल्यास उत्तम), चिक्की
ओल्या शेंगा (भुईमूग), हिरवा वाटाणा, मक्याचे कणीस
काकडी, सफरचंद, केळी, कलिंगड इत्यादी
नेहमीचे घरगुती जेवणाचे पदार्थ: चपाती, भाकरी, पिठले, डाळ, दही इत्यादी

जास्त चोथायुक्त पदार्थ
डाळी / कडधान्यं: छोले, वाटाणे, हरभरे, डाळ, उसळ इ.
मोड आलेली कडधान्यं (मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.)
हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, टोमॅटो, काकडी, कांदा, कोबी
पपई, पेरू, बोरे, कलिंगड, नाशपाती, सफरचंद, डाळिंब यांसारखी फळे
आख्खी कडधान्ये- उदा. मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.
कुरमुरे, भाजलेले चणे, मक्याचे कणीस, ओला हिरवा मटार इ.
गहू, बाजरी, ज्वारी यांच्या पिठांच्या पोळ्या/भाकऱ्या
पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या मिश्रपिठांच्या भाकऱ्या
पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या रव्याची खीर किंवा उपमा
व्होल व्हीट ब्रेड पासून बनवलेले व्हेज सॅंडविच
मधुमेही व्यक्तींसाठी स्वयंपाक तयार करताना कोणती काळजी घ्यावी? (जनरल गाईडलाईन्स)
फोडणीसाठी तेल अल्प प्रमाणात वापरावे
जेवणात कच्च्या भाज्या, टोमॅटो, काकडी, कांदा, कोबी + दही यांपासून कोशिंबीर/सॅलॅड तयार करून त्याचा जेवणात मुबलक प्रमाणात वापर करावा
गोड खायची इच्छा झाल्यास (उदा. हापूस आंबा) पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या मिश्रपिठांच्या भाकऱ्या यासोबत थोडासा खायला द्या, नुसता आंबा नको.
दोन किंवा तीन वेळा भरपूर जेवण्यापेक्षा पाच किंवा सहा वेळा थोडे थोडे जेवायला द्या.
पाच किंवा सहा वेळा थोडे थोडे जेवायला देणे शक्य नसेल तर तीन वेळा रेग्युलर जेवण आणि दोन वेळा नाश्ता (इडली/डोसा/उपमा/पोहे इ.) द्या. डोसा आणि उपमा कमीत कमी तेल वापरून बनवा.
नाश्त्यामध्ये सामोसा, वडापाव, भजी, पुरी-भाजी, शिरा, साबुदाणा-वडा, मिसळ-पाव यांसारखे पदार्थ टाळा.
चहा-नाश्त्यामध्ये फरसाण, बिस्किटे, खारी, केक, साबुदाणा खिचडी, शंकरपाळी, बाकरवडी यांसारखे तळलेले किंवा बेक केलेले व मैद्याचे पदार्थ टाळा.

मधुमेही व्यक्तींसाठी योग्य आहार कसा ठरवला जातो?
खाल्लेल्या अन्नातून ग्लुकोज साखर सुट्टी होऊन रक्तप्रवाहात किती वेगाने येते (हळूहळू येते की पटकन येते) यावर त्या अन्नपदार्थचा ग्लायसेमिक इंडेक्स ग्लायसेमिक इंडेक्स ठरवला जातो ५५ पेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असेल तर तो मधुमेही व्यक्तींसाठी योग्य समजला जातो. ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असलेले पदार्थ म्हणजे, साखर, गूळ, मध, पांढरा ब्रेड, बिस्किटे, उसाचा रस, पांढरा भात, उकडलेले बटाटे, रताळे, पिकलेले आंबे, केळी यांसारखी फळे, मैद्यापासून बनवलेले पदार्थ, साबुदाणा, रवा वगैरे. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले पदार्थ म्हणजे सर्व धान्ये, कडधान्ये, मोड आलेली कडधान्ये, गव्हाच्या चपात्या, ज्वारी, बाजरी व मक्याच्या भाकऱ्या, हिरवे वाटाणे (मटार), इडली, डोसा वगैरे.

काहीजण हाय प्रोटीन डायट सुचवतात ते योग्य आहे का?
असे लोक म्हणजे स्यूडो-सायंटिस्ट असतात आणि त्यांनी आहारशास्त्राचा अभ्यास केलेला नसतो. असा आहार सुचवणाऱ्या अनेक वेबसाईट्स आहेत. त्या रुग्णांच्या आरोग्याशी खेळत असतात. त्यापासून दूरच राहिलेले बरे. मधुमेही व्यक्तींना सर्व अन्नघटक हे निरोगी व्यक्तींप्रमाणेच लागतात. फक्त ते अन्न निवडताना असे निवडावे की रुग्णाच्या रक्तातली ग्लुकोज साखर फार वाढणार नाही आणि त्याला सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतील आणि शिवाय त्याचं वजन आणि कोलेस्टेरॉल वाढणार नाही. हाय प्रोटीन डायटचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो हे जरी खरे असले तरी तो समतोल आहार राहत नाही हे लक्षात घ्यायला हवे. हाय प्रोटीन डायटचे दुष्परिणाम शरीराच्या आरोग्यावर होतात आणि मधुमेही व्यक्तीचे मूत्रपिंड हे आधीच नुकसानग्रस्त असण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर हाय प्रोटीन डायटमुळे अधिक ताण पडतो किंवा लोड येतो त्यामुळे त्याचे अधिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे असल्या फॅड डायटच्या नादाला लागू नका.
पांढरा भात वगळता महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे गव्हाची पोळी, वरण, भाजी, कोशिंबीर, दही लिंबाची फोड हे जेवण म्हणजे मधुमेहासाठी आदर्श आहे असे म्हणावे लागेल. फक्त त्यात मधुमेही व्यक्तींसाठी किरकोळ बदल करावेत. उदा. दह्यात लोणी कमी असावे, कोशिंबीर जास्त वाढावी, फोडणीसाठी तेल कमी वापरावे, पोळीऐवजी फुलके करावेत, पांढऱ्या भाताऐवजी बिनपाॅलिशच्या तांदळाचा (ब्राउन राईस) भात वगैरे.

09/11/2018

Happy Diwali to all ✨🙏✨

09/11/2018

Celebrate the magic and joys of Diwali

सस्नेह नमस्कार,आजपासून भाऊबीजे पर्यंत साजऱ्या होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय दिपावली पर्वानिमित्त आपणास व आपल्या ...
06/11/2018

सस्नेह नमस्कार,

आजपासून भाऊबीजे पर्यंत साजऱ्या होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय दिपावली पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

हे नववर्ष आपणास *आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो ह्याच मनोकामना...!

- नोबेल लॅब टीम, नागपूर

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा- नोबेल लॅब
05/11/2018

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

- नोबेल लॅब

ग्रीन टी चे फायदे तुम्ही ग्रीन टी / Green Tea पिता का?जर तुम्ही तुमचे स्वास्थ सुधारायचे ठरविले असेल तर याचे सेवन नक्कीच ...
04/11/2018

ग्रीन टी चे फायदे

तुम्ही ग्रीन टी / Green Tea पिता का?

जर तुम्ही तुमचे स्वास्थ सुधारायचे ठरविले असेल तर याचे सेवन नक्कीच करा.

आपण सर्व जाणतो कि ग्रीन टी चे किती फायदे आहेत.? यामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिरोधक असतात जे कर्करोगाच्या समस्या दूर करू शकते. ग्रीन टी मधील प्रतिरोधके आपल्या पेशीमध्ये मृत होणाच्या समस्येला दूर करतो त्यामुळे पेशी मृत पावण्याचे प्रमाण कमी होते. हृदयावरील हल्ल्याची समस्या पण दूर करण्यास मदत करते

शरीरातील कोलेस्ट्रोल चे प्रमाण कमी करते. रोग प्रतिकारक शक्ती वाढवितो. ग्रीन टी रोज पिण्यामुळे आपले वजनपण कमी होते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळते. आपले शरीर तंदुरुस्त राहते. यामध्ये जीवनसत्व क मुळे सर्दीमध्येहि फार लाभ मिळतो.

चला तर मग जाणू या कि घर बसल्या ग्रीन टी ला कसे बनविता येईल.

Ingredients of Green Tea
ग्रीन टी साठी लागणारी सामग्री :-
ग्रीन टी ची पत्ती – १ चम्मच ( रेडीमेड प्याक मधील )
पाणी – १ कप
स्वादानुसार शहद
स्वादानुसार निंबू रस

Green Tea Recipe
ग्रीन टी बनविण्याचा विधी:-
१ कप पाणी गरम करावे. पाणी गरम करतेवेळी जास्त गरम करू नये. उकडन्याआधीच बंद करावे.
आता यात १ चम्मच ग्रीन टी ची पत्ती टाका. २-3 मिनिटे मिळवत राहावे. नंतर चहाच्या कपाट गाळून घ्या. निंबू रस व शहद स्वादानुसार टाकून चांगले ढवळा व गरमागरम ग्रीन टी चा आनंद घ्या

सूचना :-

ग्रीन टी बनविताना त्यामध्ये दुध टाकू नका सोबतच साखरेचा वापर करू नका. हे स्वास्थासाठी हानिकारक ठरू शकते.
ग्रीन टी मध्ये पुदिन्याची पाने टाकल्यास याचा स्वाद बदलून जाईल.
ग्रीन टी चे पाणी पूर्णपणे उकडलेले नसावे.
बाजारात ग्रीन टी ब्याग चा वापर हि करू शकता.
ग्रीन टीच का ?

हजारो वर्षापासून भारतीय आयुर्वेदात ग्रीन टीचा वापर केला जातोय. सध्याचा चहा इंग्रजांनी भारतात आणला. त्याआधी भारतीय लोक वनौषधी पान पाण्यात टाकून प्यायचे.

एशिया खंडात सर्वात जास्त उच्च रक्तदाबाचे रोगी आहेत. कर्करोगाचे रोगीही येथे बऱ्याच प्रमाणात जास्त आहेत.

चीन देशात ग्रीन टी चा शोध लागला. आता संपूर्ण जागत याचा वापर वाढत आहे.

याच्या वापरामुळे कर्करोग व उच्चरक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच वजन कमी करणे व झोप चांगली लागणे असे अनेक फायदे यापासून होतात. याच्यातील प्रतिरोधक तत्व आपल्या आरोग्यासाठी फारच लाभदायी ठरतात.
खालील काही ग्रीन टी च्या सेवनाने होणारया फायद्याबद्दल जाणू या.

ग्रीन टी चे फायदे

१.वजन कमी करणे

ग्रीन टी शरीरातील पाचन तंत्रास वाढवतो.
अतिरिक्त चरबीस शरीरातून बाहेर टाकतो. पोलीफिनोन तत्वामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर टाकता येते. त्यामुळे रक्तप्रवाह विकसित होते. व वजन कमी करण्यास मदत होते.

२.मधुमेह

ग्रीन टी च्या सेवनामुळे रक्तामधील साखर कमी करता येते. त्यामुळे मधुमेहांच्या रुग्णासाठी हि एक वरदान सिद्ध होते. हे इन्सुलिन ला नियंत्रित करतो त्यामुळे मधुमेहात त्रास कमी होतो.

3.हृदयासंबंधी आजार

वैज्ञानिकच्या मते ग्रीन टी हि रक्तवाहिनी नलीकांवर मजबुतीचे आवरण चढवते त्यामुळे रक्तातील अतिरिक्त चरबी व साखर शरीराबाहेर टाकल्या जाते. तसेच रक्ताचा प्रवाह हृदयात चांगला ठेवतो.

४.भोजन नलीकेचा कर्करोग

ग्रीन टी मुळे भोजन नलीकेच्या कर्करोगाची समस्या दूर होते. यासोबतच आणखी काही हानिकारक कर्करोगांमध्ये डॉक्टर ग्रीन टी चे सेवन करण्याचे सुचवतात याचे नियमित सेवन केल्यास कर्करोग निर्माण करणाऱ्या कोशिकांना नष्ट करता येते.

५ कोलेस्ट्रोल

ग्रीन टी रक्तातील घाण म्हणजेच कोलेस्ट्रोल ची मात्र कमी करण्यास फायदेशीर ठरते.

६.दातांमधील सडने

अभ्यासातून या गोष्टीचा सुगावा लागला आहे. कि ग्रीन टी पिल्याने दातातील हानिकारक ब्याक्टेरीया आणि वायरस कमी होतात त्यामुळे दात सडत नाहीत व दात स्वस्थ ठेवले जातात.

७.रक्तदाब

रोज सकाळी ग्रीन टी चे सेवन रक्तदाब नियंत्रित ठेवतो.

८.मानसिक दडपण

ग्रीन टी च्या सेवनाने आपले मानसिक आरोग्य चांगले होते. मस्तिष्कातील चेतापेशींना अधिक प्रभावी बनविल्यामुळे मानसिक दडपण येत नाही व मनस्थिती उत्तम राहते.

९.एन्टी वायरल आणि एन्टी ब्याक्टेरीयल

ग्रीन टी मध्ये एन्टी वायरल आणि एन्टी ब्याक्टेरीयल तत्व असतात. त्यामुळे इन्फ़्लुएन्जा च्या कर्करोगापासून बचाव होते. अभ्यासातून हे समजले आहे कि ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम पेय आहे.

१०.त्वचेची रक्षा

ग्रीन टी मुळे त्वचेच्या संबंधी विविध समस्यांवर चांगले उपचार करता येतात. ग्रीन टी च्या सेवनाने त्वचा निरोगी व ताजी तवानी बनते. तसेच उन्हाळ्यात त्वचेच्या सूर्यकिरणामुळे होनाऱ्या त्रासाला कमी करते.

तर मग कशाची वात बघताय तुम्ही? जा आणि आपल्यासाठी ग्रीन टी चा एक कप बनवा आणि याच्या आरोग्यदायी फायद्यांचा लाभ घ्या.

‘किडनीस्टोन’वर घरगुती उपायमीठ आणि मुत्रातील खनिज पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्याने किडनीस्टोनचा धोका संभवतो. किडनीस्टो...
03/11/2018

‘किडनीस्टोन’वर घरगुती उपाय
मीठ आणि मुत्रातील खनिज पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्याने किडनीस्टोनचा धोका संभवतो. किडनीस्टोनचे प्रकारही वेगवेगळे आहेत. यावर काही प्रमाणात का होईना पण, घरगुती उपायही करता येतात.

मीठ आणि मुत्रातील खनिज पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्याने किडनीस्टोनचा धोका संभवतो. किडनीस्टोनचे प्रकारही वेगवेगळे आहेत. यावर काही प्रमाणात का होईना पण, घरगुती उपायही करता येतात. त्यावरील हा आढावा..

* ओवा-
ओवा किडनीस्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो. त्यामुळे आहारात, मसाल्याच्या रुपात ओव्याचा समावेश असावा असा डॉक्टरही सल्ला देत असतात. कारण, लघवीला चालना देण्यात ओवा मदतकारी ठरतो.

* आहारात केळी असवीत-
केळ्यात बी-६ नावाचे जीवनसत्वा असते. या जीवनसत्वामुळे मुत्र खड्यांच्या निर्मितीला आळा बसतो. तसेच किडनीस्टोन झालेल्यांना केळ्याच्या सेवनाने आराम पडतो.

* तुळस
तुळस घालून नियमित चहा घेतल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.

* द्राक्षे खावीत
या मोसमांत द्राक्षेही चांगली येतात आणि किडनीस्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. द्रक्षात अलबुमीन आणि सोडिअम क्लोराइड यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी फळांमध्ये द्राक्षांना प्रधान्य द्यावे.
वरील नैसर्गिक पदार्थांमुळे किडनी स्टोनच्या आजारावर आराम मिळू शकतो. मात्र, ग्रस्तांनी यावर तज्ञांचा सल्ला घेऊनच पाऊल उचलावे.

02/11/2018

Wishing you a memorable Diwali

अशुद्ध रक्त शुद्ध करण्याचे घरगुती उपाय, शरीर राहील निरोगी आणि सुंदरशरीरातील कोट्यावधी पेशींना ऑक्सिजन, मिनरल्स आणि इतर प...
02/11/2018

अशुद्ध रक्त शुद्ध करण्याचे घरगुती उपाय, शरीर राहील निरोगी आणि सुंदर

शरीरातील कोट्यावधी पेशींना ऑक्सिजन, मिनरल्स आणि इतर पोषक तत्व पोहोचवण्याचे कार्य रक्त करते

शरीरातील कोट्यावधी पेशींना ऑक्सिजन, मिनरल्स आणि इतर पोषक तत्व पोहोचवण्याचे कार्य रक्त करते आणि याच पेशी आपल्या निरोगी शरीराचे निर्माण करतात. आपला चुकीचा आहार, अधिक आम्लीय पदार्थ आणि मिठाचे सेवन हळूहळू याला दुषित करते. शरीरातील विजातीय पदार्थ उदा. मल-मुत्र इ. शरीरातून योग्यप्रकारे बाहेर पडले नाही तर ही घाण शरीरातील रक्तामध्ये मिसळते. ज्यामुळे विविध रोग उत्पन्न होतात. यामध्ये त्वचा रोग विशेष आहे. यामुळे निरोगी आणि सुंदर शरीराची इच्छा बाळगणाऱ्या लोकांनी रक्त शुद्धीकडे विशेष लक्ष द्यावे.

आवळा
आवळा रक्तामध्ये वाढलेली गरमी कमी करतो. रक्तामध्ये जमा झालेला मल, विष दूर कार्टून रक्त शुद्ध करतो. पेशी, कोशिकांना शुद्ध करतो. आवळा प्रत्येक प्रकारे शरीरातील प्रत्येक गोष्टीची स्वच्छता करतो. त्वचा रोगामध्ये आवळा लाभदायक आहे. व्हिटॅमिन 'सी' चे भांडार आहे. नवीन रक्त तयार करण्यात सहायक ठरतात.

लिंबू
1. लिंबू रक्त शुद्ध करते. लिंबाचा रस गरम पाण्यातून दिवसातून तीन वेळेस घ्यावा. पाणी चहाप्रमाणे गरम असावे.
2. एका लिंबाचे चार तुकडे करून घ्या. चार कप दुध घ्या. एक कप दुधामध्ये लिंबाचा एक तुकडा पिळून लगेच हे मिश्रण प्यावे. प्रत्येक दहा मिनिटांनी दुधाचे इतर कप अशाचप्रकारे पिउन घ्यावेत. पाच आठवडे नियमितपणे अशाप्रकारे लिंबाचा उपाय केल्यास रक्त शुद्ध होऊन शरीर मजबूत होईल. भूक वाढेल. बद्धकोष्ठता दूर होईल. अस्वस्थता दूर होईल.

कोबी -
कोबीमध्ये गंधक भरपूर पमाणात असते. गंधक खाज, कुष्ठ इ. त्वचा विकारांवर लाभदायक ठरते. कोबी रक्तशोधक असल्यामुळे वाफेवर शिजवून खावी. पाण्यामध्ये उकळल्यास गॅस निर्माण करते.

आंबा
1.एक कप आमरस, एक चतुर्थांश दुध, एक चमचा अद्रकाचा रस, चवीनुसार बारीक खडीसाखर एकत्र करून हे मिश्रण नियमित घ्यावे.
2. एक कप आंब्याच्या रसात अर्धा कप दुध, एक चमचा तूप, दोन चमचे अद्रकाचा रस मिसळून नियमित (आंब्याचा सिझन असेपर्यंत) घ्यावे. यामुळे आरोग्य चांगले राहील आणी रक्तही शुद्ध होईल.

कोरफड
कोरफड रक्तशोधक आहे. कोरफडीचा ताज गर 25 ग्रॅम, मध 12 ग्रॅम आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ घ्यावे.

कडूनिंब
1.कडूनिंबाच्या पिकलेल्या दहा निंबोळ्या नियमित चोखल्यास रक्तविकार ठीक होतो.
2.कडूनिंबाचे पाने, फुले, साल, निंबोळ्या सर्व सामग्री सावलीत वाळवून घेऊन चूर्ण तयार करून घ्या. एक लहान चमचा दररोज या चूर्णाचे सेवन केल्यास रक्तदोष ठीक होईल, दीर्घकाळ निरोगी राहाल.

कांदा
1.एक चतुर्थांश कप कांद्याच्या रसामध्ये संपूर्ण एक लिंबाचा रस किंवा मध मिसळून हे मिश्रण दहा दिवस नियमित घेतल्यास रक्तविकार दूर होऊन रक्त शुद्ध होते.
2. कांद्याचा ताजा रस अर्धा कप, गाजराचा रस एक कप, पालकाचा रस एक कप हे तिन्ही एकत्र करून सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास रक्तविकार दूर होऊन रक्त शुद्ध होते.

मनुका
25 ग्रॅम मनुका रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी भिजलेल्या मनुका बारीक करून एक कप पाण्यातून घेतल्यास रक्त शुद्ध होण्यास मदत होईल.

मेंदी
मेंदी रक्त शुद्ध करण्यास मदत करते. रात्री स्वच्छ पाण्यामध्ये मेंदी भिजवून ठेवा, सकाळी सुती कपड्यातून गाळून ते पाणी प्यावे.

कारले
60 ग्रॅम कारल्याचा रस कप पाण्यामध्ये मिसळून नियमितपणे काही दिवस घेतल्यास शरीरातील दुषित रक्त स्वच्छ होते.

टोमॅटो
लाल टोमॅटोचा रस सकाळ-संध्याकाळ एक एक ग्लास घेतल्यास रक्त शुद्ध होते. त्वचेवर येणारे पुरळ, खाज, त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर लाल चट्टे या सर्व समस्या दूर होतात.

रुइचे फुल
रुइचे ताजे फुल आणि काळे मिरे समान प्रमाणत घेऊन बारीक कुटून घ्या. या मिश्रणाच्या वाटण्याच्या दाण्याएवढ्या बारीक गोळ्या तयार करून वाळवून घ्या. एक एक गोळी दिवसातून चार वेळेस पाण्यासोबत दोन महिने घ्या.

Address

Plot No. 41, Gadge Nagar, Behind Jyoti School
Nagpur
440009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nobel Pathology Lab posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share