26/05/2025
लहान वयात होणारा आणि हालचालींना अतिशय बंधन आणणारा असा म्हणजे आमवात. आपण जे खातो ते पचत आणि त्याच्यापासून शरीराला लागणारे पोषण मिळते .
पण काही वेळा अन्नाच नीट पचन होत नाही आणि त्यातून शरीराला हानिकारक असा एक घटक तयार होतो ज्याला आम असं म्हटलं जातं .
आणि हा आम शरीराच्या वेगवेगळ्या संधीमध्ये म्हणजेच जॉइंट्स मध्ये जाऊन साचतो आणि सांध्यांमध्ये सूज ,विंचू चावल्यासारख्या वेदना ,लालसरपणा निर्माण करतो आणि हालचालींना बंधना आणतो .
सकाळी उठल्यावर हि लक्षणे जास्त स्वरूपात जाणवतात आणि तीव्रता दिवस भरात थोडी कमी जाणवते .
हा आमवात पचनाशी निगडित असल्याने अंगात कणकण असणे ,पोट नीट साफ न होणे ,आळस येणे, अंग जड होणे ,अन्न नीट न पचणे अशा तक्रारी जाणवतात .
हा आजार जुना झाल्यानंतर हातापायाची बोटे वाकडी होणे चालण्याची ढब बदलणे, सांधे काम करायचे बंद होणे असे त्रास होऊ लागतात .
तरुण स्त्रियांमध्ये प्रेग्नेंसी आणि मासिक पाळीच्या दिवसांमध्ये योग्य ती विश्रांती योग्य ती काळजी न घेतल्यामुळे आमवाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
याशिवाय आमवात होण्याची कोणती कारणे आहेत ती टाळणे खूप गरजेचे आहे कारण आमवात झाल्यानंतर त्याची चिकित्सा खूप वेळ घेणारी असते .
आता अशी कोणती कारण आहे की ज्याच्यामुळे आमवात होऊ शकतो आपण बघितलं की ज्याच्यामुळे पचनशक्ती मंद होते अशा प्रकारची सगळी कारण या आमवाताला आमंत्रण देणारी असतात.
भूक लागलेली नसताना जेवणे, पहिले अन्न पचलेले नसताना त्यावर पुन्हा खाणे ही काही कारण आहेत.
याचबरोबर विरुद्ध आहार म्हणजेच फ्रुट सलाड ,दूध किंवा चहा बरोबर पोळी, चहासोबत बिस्कीट टोस्ट अशा मीठ असणाऱ्या गोष्टी, विविध प्रकारचे मिल्क शेक ,चीज पनीर यापासून बनवलेल्या गोष्टीचे अतीसेवन या विरुद्ध आहाराची उदाहरणे आहेत.
सतत चिंता करणे ,विचार करणे यामुळे पण पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो.
थंड गोष्टींचा वारंवार सेवन, एसी फॅन खाली सतत बसणे यामुळे आमवाताची तक्रारी वाढतात .
याचबरोबर जेवल्यानंतर व्यायाम करणे जेवल्यानंतर झोपणे अशा गोष्टींमुळे आमवात होऊ शकतो
असा आमवात बरा होण्यासाठी काय करावे
ज्या गोष्टींमुळे पचनशक्ती मंद होऊ शकते ,पचनाला त्रास होऊ शकतो अशा गोष्टी टाळाव्यात .
पचनशक्ती वाढवणाऱ्या गोष्टी जसे सतत कोमट पाणी पिणे
भूक लागल्यावर खाणे अशा गोष्टींचा उपयोग करावा
रोज व्यायाम करावा जेणेकरून खाल्लेले अन्न पचेल.
आहार विहारांमध्ये वरील सांगितलेल्या कारणांचा त्याग करावा याच बरोबर लंघन म्हणजे उपवास हे आमवात कमी करण्यासाठी खूप मदत करते
आयुर्वेदामध्ये आमवातासाठी अनेक प्रकारची औषधे उपलब्ध असून अभ्यंग पोटली सेक ,बस्ती यासारख्या पंचक्रमांचाही खूप छान वापर होतो .
त्यामुळे त्यामुळे असा त्रास असताना आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.
दीर्घायु आयुर्वेद क्लिनिक
नालासोपारा वसई
7507856795/. 8530523295