22/03/2022
आला कडक उन्हाळा - तब्येतीला सांभाळा
जाणुन घ्या उन्हाळ्यामधील योग्य- अयोग्य आहार-जीवनशैली
होळी झाली आणि कडक उन्हाळा सुरु झाला आहे. सुर्य अक्षरशः आग ओकत आहे.बहूतांश ठिकाणी तापमान 40°C च्या वर पोहचले आहे. अशा असह्य ऋतु मधे "कुल" राहण्यासाठी आजच्या लेखात जाणुन घेऊया ऊन्हाळ्यामधे आपली दिनचर्या आणि ऋतुचर्या कशी असावी त्याविषयी.
उन्हाळ्यातील उष्ण, कोरड्या वातावरणामुळे स्वाभाविकपणे शरीरामधेही उष्णता,कोरडेपणा वाढू लागतो. शरीरातील आर्द्रता, जलीय , स्निग्ध अंश कमी होऊ लागतो व शरीर बल , पचनशक्ती हिवाळ्याच्या मानाने कमी झालेली असते. शरीराला जलीय व शीत गुणयुक्त आहाराची गरज भासू लागते.
उन्हाळ्यातील योग्य आहार-
1) या ऋतूत पचनशक्ती थोडी कमी असल्यामुळे आहार हा पचण्यास हलका असावा.
2) उष्णता व कोरडेपणा कमी करण्यासाठी थंड,मधुर ,स्निग्ध, द्रव आहार असावा.
3) सर्व प्रकारची फळे - विशेषकरून- डाळिंब,नारळ,द्राक्ष,आंबा,टरबूज, चिक्कू यांचा आवश्य समावेश करावा.
4) विविध प्रकारचे शरबते - कोकम , खजूर, लिंबू, पन्हे .
5) ताजे ताक, गाईचे दूध, तुप व गरजेप्रमाणे पाणी हे शरीरास हितकारक.
6) फळभाज्या- दोडके,भोपळा,कारले,कद्दू, पडवळ या जलीय अंश जास्त असणारया भाज्याचा आहारात समावेश असावा.
उन्हाळ्यातील अयोग्य आहार-
1) उष्ण,तिखट, खारट, आंबट, कोरडे,पचण्यास जड पदार्थ टाळणे
2) आंबट दही, शिळे अन्न, मांसाहार,मैदा पासून तयार केलेले फास्टफूड वर्ज्य करावे.
उन्हाळ्यातील जीवनशैली-
दिवस मोठा व रात्र कमी तासाची असल्याकारणाने तसेच शरीर बल या ऋतुत कमी असल्यामुळे दुपारी अल्प प्रमाणात झोप घेणे या ऋतुत हितकारक आहे.
अतिप्रमाणात व्यायाम, मैथुन आणि शारीरीक कष्ट टाळावे.
विशेषकरून पित्त प्रकृतीच्या लोकांनी या काळात योग्य काळजी घ्यावी.
विशेषत: ऊन्हाळ्यात होण्यारया आजारासाठी( शरीरात आग,तळपाय आग होणे,अम्लपित्त,लघवीला आग होणे, कमी प्रमाणात लघवी होणे, नाकातून रक्त येणे, खुप तहान लागणे, कोरडेपणा, शारीरीक थकवा कमजोरी,खुप घाम येणे व त्याला दुर्गंध) उपचार करायचे असल्यास खालील पत्यावर संपर्क साधावा.
धन्यवाद,
डॉ. उमेश जोशी,
स्वास्थ्य संवर्धिनी आयुर्वेद क्लिनिक,
लोकसेवा मेडिकल समोर, माणिकनगर कमान,
चैतन्यनगर रोड, नांदेड.
9599730371.