08/04/2025
“माझा पहिला पॅराक्वेट विषबाधा झालेला रुग्ण जो वाचला"
पॅराक्वेटमध्ये जवळजवळ १००% मृत्युदर आहे. आम्ही आधीच्या रुग्णांमध्ये हेमोडायलिसिस आणि प्लाझ्मा एक्सचेंज केले पण अंतिम परिणाम तोच होता.
आम्ही मागच्या एक वर्षापासून HA230 फिल्टरने हेमोपरफ्यूजन सुरू केले. परंतु तरीही 2 रुग्णांना वाचवू शकलो नाही. एकाने सुमारे 150 मिली पेक्षा जास्त प्रमाणात विष घेतले होते आणि दुसरा रूग्ण तिसऱ्या~चौथ्या दिवशी रुग्णालयात पोहोचला . हेमोपरफ्यूजन किमान 24 तासांच्या आत केले पाहिजे आणि सर्वोत्तम म्हणजे 6 तासांच्या आत केले तर.
१ मार्च रोजी, त्याने संध्याकाळी ७ वाजता सुमारे ५० मिली विष घेतले. त्याचे आई वडील त्याला घेऊन रात्री १०.३० च्या सुमारास भगवती रुग्णालयात पोहोचले. डॉ. विठ्ठल फड ड्युटीवर होते. त्यांनी या प्रकरणावर उपचार करण्याच्या सर्वोत्तम मार्गाबद्दल डॉ. राहुल देशमुख यांच्याशी चर्चा केली आणि विशेष HA 230 फिल्टर हेमोपरफ्यूजनसाठी त्यांना स्टार किडनी सेंटरमध्ये हलविण्यात आले. ४५ मिनिटांत आम्ही हेमोपरफ्यूजन सुरू केले. रुग्णाच्या लघवीमधे पराक्वेट ची मात्रा तपासून पुढील २ दिवसांत आणखी २ वेळा हिमोपरफ्यूजन करण्यात आले. त्याला काही काळ कृत्रीम ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता भासली. त्याला एक्यूट किडनी फेल्यूर झाला आणि लिवर ला दुखापत झाली जे काही काळानंतर ठीक झाले.
My first Paraquet poisoning patient who survived”
Paraquet has almost 100% mortality. We did hemodialysis and plasma exchage in earlier patients but end result was same.
We started doing hemoperfusion with HA 230 filter since last year. But still could not save 2 patients one consumed large amount around 150 mL and other reached hospital on day 3/4. Hemoperfusion should be done at least within 24 hours and best when done within 6 hours.
On 1st march, he consumed around 50 mL at 7 pm. He reached Bhagwati hospital around 10.30 pm. Dr. Vitthal Phad was on duty. He discussed this case with Dr Rahul Deshmukh about the best possible way to treat and considering the golden hours for hemoperfusion with special HA 230 filter, he was shifted to Star Kidney Center. Within 45 minutes we started hemoperfusion. After urine Paraquet test, we repeated 2 more sessions on next 2 days. He required minimal oxygen support. There was Acute Kidney Injury and Hepatitis which recovered over a period of time.