22/05/2024
*शाळेत पाठविण्यापुर्वीची तयारी*
सर्व पालकांना आपला मुलगा स्वच्छ, सुंदर असा शाळेचा गणवेश, स्कूल बॅग, शुज, सॉक्स परिधान केलेला पहावा वाटतो. तसेच त्याने शाळेत व घरी आनंदी मनाने व प्रसन्नपणे आभ्यास करावा असे ही वाटते. पालकांना मुल अभ्यासात सर्वात हुशार असावे अशीही अपेक्षा असतेच. वरिल सर्व अपेक्षा असाव्यात पण त्याला लिहीता व वाचता यावे असे दडपण कधीही असु नये. या तयारी मध्ये आपला मुख्य उद्देश असावा की,
१. आपले मुल शाळेत जाण्यासाठी उत्साही असावे
२. त्याचा शब्द संग्रह चांगला असावा.
३. तो लिहणे व वाचणे शिकण्यासाठी तयार असावा.
*Remember*... Proper preparation prevents lot of problems.
ही तयारी मुलांसोबत अगदी सहजपणे व खेळता खेळता करता येते. या पूर्ण चर्चेत आपण काय व कसे करावे हे स्पष्ट केले आहे. आपण जी तयारी मुलांकडून करुन घेणार आहोत ती सर्व तयारी Playgroup, Nursery, LKG, UKG मध्ये केली जाते पण जर हे सर्व शाळेत व घरी केल्यास घरचे प्रयोग मुलांसाठी खेळाप्रमाणे वाटतील व मुलांना चांगल्या प्रकारे आत्मसात होतील.
त्याचा फायदा मुलांना पहिल्या वर्गात शिक्षण घेताना खुप चांगल्याप्रकारे होईल.
*Remember*.... "A child educated at school only is an uneducated child "
🔹 मुलाची मानसिक तयारी
१. स्वतःच्या भावना स्थिर ठेवणे
आपले मुल शाळेत जायचे असले की आपल्याला चिंता सरु होते. जसे- आपले मुल जाईल की नाही ? रडेल का ? तिथे काय होईल ? शाळा कशी आहे काय माहित? याला मध्येच शि-सु झाली तर कसे ? अशाप्रकारे असंख्य प्रश्न आपल्या मनात फिरु लागतात. एवढेच नव्हे तर याप्रश्नांची चर्चा आपण घरामध्ये, इतरांसोबत विषेश म्हणजे मुलांसमोरच करतो. जरी आपण चर्चा केली नाही तरी आपल्या देहबोलीतुन आपली चिंता मुले समजु शकतात. आपण जर मुलांसमोर अशी चर्चा टाळली तर मुले कोणतीही भीती मनात ठेवणार नाहीत. उलट त्यांच्यासमोर काही सकारात्मक गोष्टींची चर्चा केल्यास
जसे - “आपले मुल शाळेत खुप मजा करेल, खुप मस्ती करेल."
'तुला तेथे सर्व नविन मित्र भेटतील. "
'तुझ्यासाठी मस्त नविन बॅग, टिफिन बॉक्स, कपडे घेऊ या. "
"शाळेमध्ये जेवणे, खेळणे यामध्ये खुप आनंद होतो. आम्ही लहान आसताना खुप खेळत होतो.”
अशाप्रकारचे वाक्य मुलांसमोर इतरांशी व मुलांसोबत वारंवार बोलल्यास मुलांचा उत्साह वाढेल.
२. शाळेमध्ये भेट देणे
मुलाला जेव्हा शाळेमध्ये पाठवायचे असते,