
13/07/2025
आमचे मार्गदर्शक, संकट समयी धावून येणारे भगवती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक व भावी नेतृत्व डॉक्टर अंकुश देवसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
#वाढदिवसाचे अभिष्टचिंतन ..!!
#डॉक्टरी पेशातले दिलदार व्यक्तिमत्व - डॉ. अंकुश देवसरकर …!!
#खा. अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू म्हणून राजकीय पटलावरील आशादायी युवा चेहरा ..!!
#अनेक गरीब रुग्णांना डॉ. अंकुश देवसरकर यांच्या रुपात सच्चा माणूस जेंव्हा जेंव्हा भेटतो तेंव्हा-तेंव्हा पैसा नव्हे, तर समाधानी आयुष्य हेच त्यांच्या जगण्याचे सूत्र आहे हे बऱ्याच जणांना पहील्यांदाच उमगते, आई-वडिलांनी बालपणापासून मनावर रुजवलेले संस्कारच त्यांना गरीब, सामान्य रुग्णांच्या सेवेसाठी बळ देत आहेत असे निरीक्षण त्यांच्या वैदयकीय सेवेतील वाटचालीवरून सहज नोंदवता येईल,
#डॉ. अंकुश देवसरकर यांचा देवसरी ता. उमरखेड जि. यवतमाळ या लहानशा खेडेगावातून सुरू झालेला प्रवास आज नांदेडातील नावाजलेल्या भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पर्यंत आलेला आहे आपल्या रुग्णसेवेतून अनेक रुग्णांना आधार वाटणारे डॉक्टर अशी त्यांची प्रतिमा दिवसेंदिवस अधिकच दृढ होत चाललेली आहे .
#अडल्या-नडल्या गरीब रुग्णांना त्यामुळेच या सर्वांचा नांदेडात मोठा आधार वाटत आहे. प्रत्येक रुग्ण हे माझे कुटुंब आहे. त्यात गरीब, श्रीमंत भेदाला कुठेच थारा नाही. पैसा नव्हे, तर समाधानी आयुष्य हेच त्यांच्या जगण्याचे सूत्र आहे. आई-वडिलांनी बालपणापासून मनावर रुजवलेले संस्कारच त्यांना गरीब, सामान्य रुग्णांच्या सेवेसाठी बळ देत आहेत…!
#‘मेडिकल आणि मिरॅकल’ या दोन्ही गोष्टींवर प्रचंड श्रद्धा असलेल्या भगवतीच्या सर्व टिमच्या या समाजसेवी उपक्रमाला त्यामुळेच दुर्लक्षित आणि गरीब, कष्टक-यांचे आशीर्वाद लाभत आहेत व ते लाभत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
#आपल्या डॉक्टरी पेशातील यशस्वी वाटचालीनंतर मागील दशकभरापासून ते समाजकारणातही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत खासदार अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू व निष्ठावान सहकारी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख नांदेड परभणी हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यात निर्माण केली आहे आज रोजी ते राजकीय पटलावरील युवा फळीतील उच्चशिक्षित आशावादी चेहरा आहेत
अशा अष्टपैलू व दिलदार व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर अंकुश देवसरकर साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढील दमदार वाटचालीसाठी भरभरून सदिच्छा...!
आपला स्नेहाकिंत ,
मारोती सवंडकर , दैनिक उद्याचा मराठवाडा, नांदेड…!
---