Chandraprabha ,Herbal Skin,Beauty, Hair Clinic Nanded

Chandraprabha ,Herbal Skin,Beauty, Hair Clinic Nanded Hair Skin Beauty Health And Herbs

केशकाया सौंदर्य क्लिनिक,कैलास नगर, नांदेड (जूने चंद्रप्रभा/आरोग्यसंपदा क्लिनिक)  विस्तारित , नूतनीकृत व आधुनिक सौंदर्य च...
06/03/2026

केशकाया सौंदर्य क्लिनिक,कैलास नगर, नांदेड (जूने चंद्रप्रभा/आरोग्यसंपदा क्लिनिक) विस्तारित , नूतनीकृत व आधुनिक सौंदर्य चिकित्सा सूविधांसह

04/05/2023
Cleopatra ascended the throne at the age of 17 and died at the age of 39. She spoke 9 languages. She knew the language o...
08/03/2023

Cleopatra ascended the throne at the age of 17 and died at the age of 39. She spoke 9 languages. She knew the language of Ancient Egypt and had learned to read hieroglyphics, a unique case in her dynasty. Apart from this, she knew Greek and the languages ​​of the Parthians, Hebrews, Medes, Troglodytes, Syrians, Ethiopians, and Arabs.
With this knowledge, any book in the world was open to her. In addition to languages, she studied geography, history, astronomy, international diplomacy, mathematics, alchemy, medicine, zoology, economics, and other disciplines. She tried to access all the knowledge of her time.
Cleopatra spent a lot of time in a kind of ancient laboratory. She wrote some works related to herbs and cosmetics. Unfortunately, all her books were destroyed in the fire of the great Library of Alexandria in 391 AD. C. The famous physicist Galen studied her work, and was able to transcribe some of the recipes devised by Cleopatra.
One of these remedies, which Galen also recommended to her patients, was a special cream that could help bald men regain their hair. Cleopatra's books also included beauty tips, but none of them have come down to us.
The queen of Egypt was also interested in herbal healing, and thanks to her knowledge of languages, she had access to numerous papyri that are lost today. Her influence on the sciences and medicine was well known in the early centuries of Christianity. She, without a doubt, is a unique figure in the history of humanity.

07/10/2022
*आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल व विठ्ठल भक्त वारकऱ्यांना प्रिय ( आयुषकाढ्यामधील महत्त्वाची औषधी) तुळशीचे महत्त्व जाणून घ...
01/07/2020

*आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल व विठ्ठल भक्त वारकऱ्यांना प्रिय ( आयुषकाढ्यामधील महत्त्वाची औषधी) तुळशीचे महत्त्व जाणून घेऊयात.* तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे, तेवढेच वैज्ञानिक, शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे.
*तुळशीचे महत्त्व*

तुळस सात्विकतेचं प्रतीक आहे.
नियमित तुळशीच्या दर्शनाने सुख-समृद्धी प्राप्त होते.
तुळशीचा स्पर्श प्रचंड ऊर्जा देतो.
ज्या ठिकाणी तुळस असते तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते.
तुळशीमुळे मन प्रसन्न आणि आनंदी राहते.हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. अनेकजण,विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य-नेमाने तुळशीची पूजा करतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. वारकरी भक्ताने गळ्यात तुळशीचीच माळ का घालायची?
रूद्राक्षाची का नको? सोने, रूपे, स्फटिक, पोवळे, मोती,
पुत्रवंती, अशा आणखीही अनेक प्रकारच्या माळा,
वेगवेगळ्या कामनापूर्तीसाठी वापरण्याची पद्धती असते;
परंतु वारकरी संप्रदाय केवळ तुळशीच्या माळेलाच प्राधान्य
देतो. त्याचे कारण काय असावे?
तुळस म्हणजे मूर्तिमंत सात्त्विकता. तिचे दर्शनही सुखावह
असते. तिचा स्पर्शसुद्धा प्रचंड ऊर्जा देतो. तिच्या नुसत्या
अस्तित्वानेही वातावरणात शुद्धतेचा प्रवाह वेगाने प्रवाहित
होऊन मन प्रसन्न व आनंदित होते
भारतीय संस्कृतीने तुळशीशिवाय इतर कोणत्याही लहान-
मोठय़ा वनस्पतीला दैनंदिन पूजेचे-देवतेचे स्थान दिलेले
नाही.
वड, पिंपळ व औदुंबर
हे वृक्षही देवतुल्य मानले जात असले तरी, तुळशीचा दर्जा
त्यांना नसतो. शिवाय तुळस, तिचे रोप, तिचे दर्शन हे
'सर्वजनसुलभ' व कोठेही सहज उपलब्ध असणे, हा
आणखी एक तिचा विशेष.हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते.त्याचा अर्थ सर्वस्वी त्याग करणे असा होतो. तुळशीचं वैशिष्टय
म्हणजे तुळशीला कधीही कीड लागत नाही. तिला
आयुर्वेदात संजीवन वनस्पती अशासाठी म्हटलंय की,
तुळशीचं झाड मेलं असं कधीच होत नाही. तिच्या
मंजिर्या पडून अनेक रोपं येत राहतात. तुळस ही
अशी वनस्पती आहे की, जी दिवस-रात्र प्राणवायू
उत्सर्जित करते. साहजिकच तुळशीभोवतालचं
वातावरण स्वच्छ, निर्मळ, आरोग्यपूर्ण आणि पवित्र
राहतं. अशी तुळस परमेश्वराला प्रिय झाल्याशिवाय
कशी राहील?
तुळशीचं हे परमेश्वराला, विशेषतः श्रीकृष्णाला आणि
विठ्ठलाला प्रिय असणं हे भक्तांचं गौरवस्थान आहे
**आयुर्वेदाप्रमाणे-तुळशीच्या जाती* *
औषधी तुळस - Fever plant of Sierra Leone (Ocimum viride)
कापूर तुळस - Camphor basil (Ocimum kilimandscharicum)
काळी तुळस/सब्जा/पंजाबी तुळस- Hoary basil (Ocimum americanum)
कृष्ण तुळस - Sacred basil (Ocumum sanctum/tenuiflorum)
रान तुळस - Sweet basil (Ocimum basilicum)
राम तुळस - Shrubby basil (Ocimum gratissimum)

तुळशीच्या रोपाच्या ५० मीटर परीघातील हवा अत्यंत शुद्ध राहते.
सकाळीच या तुळशीसमोर काही वेळ बसल्यामुळे सर्वाधिक शुद्ध हवा श्वासोच्छ्वासाद्वारे शरीरात जाते.

ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा शरीराला होतो.
या क्षेत्रात ऑक्सिजनचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने घरात पिसवा, हिवतापाचे जंतू, अन्य साथीच्या रोगांचे जंतू शिरत नाहीत.

मन आणि शरीर दोन्ही एकाग्र करणे शक्य होते. *तुळशीपत्राचे महत्त्व*
आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी तुळशीचे उपयोग
सर्वज्ञात आहेत. त्या दृष्टीनेही दारात-अंगणात
तुळशीचे झाड असणे महत्त्वाचे ठरते. अन्नावर
तुळशीचे पान ठेवण्याने त्या ठिकाणी दुष्ट शक्तींचे
तरंग व जीवजंतू येत नाहीत. म्हणून प्रसादावर
तुळशीचे पान ठेवले जाते. दान देताना वर तुळशीपत्र
ठेवण्याची पद्धत त्यातूनच रूढ झालेलाआहे.
श्रीकृष्णांची सुवर्ण व रत्न यांच्या वजनाने तुला करत
असताना तुळशीच्या पानाचे महत्त्व संपत्तीपेक्षा
अधिक असते हे सिद्ध झाले. विष्णू ही देवता
शरीरातील चेतासंस्थेशी संबंधित असते आणि
म्हणूनच तुळशी विष्णूला व श्रीकृष्णांना प्रिय
समजली जाते. शास्त्रीयदृष्टया तुळशीचे लग्न लावून
हिंदुस्थानी संस्कृतीने लोककल्याण व आरोग्यशास्त्र
यात आपले श्रेष्ठत्व अबाधित राखले आहे. *पुढील दहा आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी तुळस वनस्पती हे उत्तम औषध ठरते..*
१. ताप- तुळशीच्या पानांचा रस तापाचे प्रमाण कमी करण्यास मदतगार ठरतो.
२. सर्दी- रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्याने सर्दी दूर होऊ शकते.
३. घसा खवखवणे- गरम पाण्यात तुळशीची पाने टाकून गुळणी करावी. दमा आणि ब्राँकायटिस असणाऱयांनाही हे लाभदायक ठरते.
४. डोकेदुखी- अतिउष्णतेने डोकेदुखीची समस्या निर्माण होणे ही सामान्य गोष्ट आहे. अशावेळी तुळशीची पाने आणि चंदनाची पेस्ट करून कपाळावर लावावी. यामुळे नक्कीच डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
५. डोळ्यांची समस्या- डोळ्यांच्या समस्यांवर तुळशीच्या काळ्या पानांचा रस महत्त्वाची भूमिका निभावतो. तुळशीच्या काळ्या पानांच्या (कृष्ण तुळस) रसाचे काही थेंब डोळ्यात टाकल्याने दाहकात कमी होण्यास मदत होते.
६. दातांची समस्या- तुळशीच्या पानांची पावडर मोहरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करून या पेस्टने दात घासावेत. यामुळे हिरड्या, दात दुखणे यावर तात्काळ उपचार होतो.
७. त्वचेच्या समस्या- त्वचेच्या समस्यांवरही तुळशीच्या पानांचा रस गुणाकारी आहे.
८. कीटक चावणे- डास आणि इतर कीटकांचे चावणे मुख्यत: मान्सूनच्या महिन्यात अशा समस्या वाढतात. अशावेळी ज्या ठिकाणी किटक चावला आहे तेथे तुळशीच्या मुळांची पेस्ट लावावी.
९. किडनी स्टोन- किडनी स्टोनच्या समस्येला सामोरे जाणाऱयांनी मध आणि तुळशीच्या पानांच्या रस मिश्रित मिश्रण प्यावे.
१०. मानसिक तणाव- रोजच्या धाकाधकीच्या जीवनात मानसिक तणाव निर्माण होणे हेही रोजचे झाले आहे. तणाव विरहीत जीवन जगण्यासाठी रोज १० ते १२ तुळशी पाने रोज खावीत. तुळशीची पाने तणावावर मात करणारे शस्त्र म्हणून काम करतात. डॉ. संतोष व्यवहारे,
डॉ. सौ. प्रीती व्यवहारे, चंद्रप्रभा स्किन, ब्युटी अँड हेअर क्लिनिक,(त्वचारोग, अ‍ॅलर्जी,केश,नख, सौंदर्य समस्या उपचार-इ. स. 2005 पासून अखंड रुग्णसेवा) कत्रुवार हॉस्पिटल च्या बाजूला,डॉक्टर्स प्लाझा , डॉक्टर लेन, नांदेड 9226960648

24/05/2020

Address

Doctor's Lane
Nanded

Telephone

9226960648

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandraprabha ,Herbal Skin,Beauty, Hair Clinic Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category