02/08/2025
हसत-खेळत बालविकास
आपण सर्व पालक आपल्या बाळासाठी एकच स्वप्न पहातो ते म्हणजे मुल सर्वात हुशार, बुद्धीमंत, उत्कृष्ट व्यक्तीमत्वाचे असावे. यासाठी आपले आपल्या बाळाचे वय २ ते ६ वर्षे असतानाच खऱ्या प्रयत्नांची आवश्यकता असते. याच वयात बाळाच्या मेंदुची जास्तीत जास्त वेगात वाढ होत असते.
Remember- "There is only one child in the world who is beautiful & intelligent, every parent wants it."
ज्याप्रमाणे हातांच्या स्नायुंना रोज व्यायाम देऊन आपण ताकदवान बनवतो त्याचप्रमाणे या वयात बाळाच्या मेंदुला वारंवार उत्तेजना देऊन जास्तीत जास्त विकसीत करता येते. या प्रकारच्या मेंदुच्या विकासासाठी आवश्यकता असते फक्त आपल्या वेळेची. आपण आपला योग्य वेळ मुलांसाठी राखून ठेवावा. या वेळात मुलांसोबत खेळणे, खेळता खेळता शिकवणे करीत रहावे. मेंदुचा विकास जरी नैसर्गीकरित्या होत असला तरी पालकांच्या मदतीने हा विकास दोन किंवा तिन पटीने वाढवता येतो.
Remember- In this age a child needs your presence (Time), They never demand presents (gift)".
🔸 उपरोक्त कार्यासाठी लक्षात ठेवण्याचे मुद्दे
१. प्रथम मुला सोबत खेळतांना किंवा शिकविताना त्याची इच्छा आहे की नाही हे निश्चित करावे. आपण कितीही व्यस्त असाल तरीही मुलासाठी आपला वेळ राखून ठेवावा.
२. या कार्याला अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून पूर्ण करण्याचा प्रयत्न करु नये.
३. आपण दिलेली माहिती किंवा शिकविलेली एखादी कृती मुलाने जशीच्या तशी आत्मसात करावी अशी अपेक्षा करु नये. आपले काम फक्त मुलाला वारंवार माहिती देणे किंवा सांगणे आहे. त्यामुळे मेंदुच्या पेशीत वाढ होते.
४. ही सर्व कृती एक खेळ आहे. ती आपल्या मुला सोबत फक्त खेळायची आहे. ज्यामुळे त्याचा मानसिक, शारीरिक, सामाजिक विकास होईल.
५. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मेंदुचा विकास हाच आपला सर्वात महत्वाचा उद्देश आहे. परंतु या सर्व कृतीत जर आपल्याला वाटत असेल की आपल्या मुलाला चिडचिड, उदासीनता, एकाकीपणा जानवत आहे तर हे सर्व प्रयत्न काही दिवसासाठी बंद करावेत. परत जेव्हा मुल आनंदी असेल किंवा सामान्य असेल त्यावेळेस थोड्या प्रयत्नाने सुरुवात करता येईल.
Remember- लक्ष्य न ओझल होने पाये, कदम मिलाकर चल । सफलता तेरे कदम चुमेगी, आज नही तो कल
- श्री मुरारी बापू आपण वारंवार प्रयत्न करत असताना बऱ्याचदा आपले मुल प्रतिसाद देत नाही. कोणतेही काम करत असताना फक्त संयम आवश्यक आहे.
🔸 मुलभुत आवश्यकता
खालील मुलभुत गोष्टींमध्ये जर उणीव (Error) असेल तर मुलाच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. या मुद्यांकडे पालकांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
1. पालकांनी सर्व गोष्टींचे पालन करुन आदर्श मुलांसमोर ठेवावा.
२. मुलाला पुर्ण झोप किमान ८ ते १० तास मिळावी. झोप जरी तासामध्ये कमी अधिक झाली तरी मुल शारीरिक रित्या थकलेले नसावे.
३. मुलाला खेळण्यासाठी भरपूर वेळ द्यावा.
४. मुलाच्या प्रत्येक भावना समजणे त्याने सांगितलेले सर्वकाही मनःपूर्वक ऐकणे आवश्यक आहे.
५. आपल्या घरातील वातावरण प्रसन्न असावे.
६. पालकांकडून मुलांना नेहमी भरपूर प्रेम, भावनीक स्थैर्य, स्तुती व प्रशंसा करत सकारात्मक प्रोत्साहन मिळावे.
७. मुलांना हे सर्व करताना योग्य शिस्त लावावी.
Remember- Your children are the most precious gift of the God
🔸 असे करु नये
१. अति जास्त संरक्षण देऊ नये.
२. अति जास्त अपेक्षा ठेवू नये..
३. घरातील वाद विवाद, तणाव मुलांसमोर आणू नये.
Remember- ।। आपके होनहार बच्चे ही आपकी सर्वश्रेष्ठ संपत्ती है ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻 Please write your comment on your comment box and share with your near & dear.
*If you wish to receive such articles or videos, send Hi message on WhatsApp number 8888126037*
Join us on
*Youtube- Dr Ashish Agrawal*
*Instagram- drgunjan12*
*Facebook- Ishwar multispecality*
👍 Dr Ashish Agrawal, Child specialist & expert in parenting, education & behaviour problems.
👍 Dr Gunjan Agrawal, Dental surgeon.