
22/11/2022
अर्चना 11 वर्षाची चिमुकली होती. डोके दुखत असल्यामुळे वडिलांनी दीड वर्षापूर्वी तिला धुळे येथे डॉक्टरांना दाखवले होते, अर्चनाच्या छोट्या मेंदूत गाठ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले वय व गाठीचा आकार बघता ऑपरेशन अत्यंत अवघड व जोखीम असलेले आहे असे सांगून पेशंटला नाशिक येथे पाठविण्यात आले, ऑपरेशनचा खर्च दोन ते अडीच लाख असल्याचे सांगण्यात आले, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पालकांनी तिला घरी आणले, दरम्यान अपघातात अर्चनाच्या बहिणीचा व वडिलांचा मृत्यू झाला.
त्या दरम्यान नंदुरबार येथे yash neurocare centre सुरु करण्यात आल. अर्चनाच्या काकांनी तिला नंदुरबार ला माझ्याकडे आणले. तिचा मेंदूचा एम आर आय परत करण्यात आला असता गाठ अजून मोठी झाली असल्याचे समजले, अर्चनाचा आता चालताना तोल जायला लागला होता, डोळ्यांची दृष्टी कमी झाली होती.
अत्यल्प दरात मेंदूचे ऑपरेशन यशस्वीपणे करण्यात आले, गाठीमुळे मेंदुतील पाण्याचा रस्ता बंद झाल्यामुळे मेंदूमध्ये पाणी जमा होत होते त्यासाठी मेंदूत नळी टाकून मेंदूतील पाण्याला वाट मोकळी करण्याचे ऑपरेशन देखील करण्यात आले दोन्ही ऑपरेशन यशस्वी झाले व अर्चना पुन्हा चालायला लागली......