15/11/2015
केरला विरेचन पंचकम॔
दोषांना गुदाद्वारे बाहेर काढून टाकण्याच्या शोधन क्रियेला विरेचन असे म्हणतात.विरेचन हा पित्तदोषासाठी श्रेष्ठ असा उपक्रम आहे.
ऋतुचर्येतील पंचकर्मशुद्धी आयुर्वेदानुसार माघपासून पौषापर्यंत दोन दोन महिन्यांचे सहा ऋतू आहेत.ते अनुक्रमे शिशिर, वसंत,ग्रीष्म ,वर्षा,शरद व हेमंत होय. .
*शरद ऋतु - साधारणतः २२ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर
आभ्यंतर स्नेहन-विरेचन, अभ्यंतर स्नेहन-रक्तमोक्षण
ऋतूनुसार शरीरात असणार्या वात ,पित्त,कफ़ाचे प्रमाण बदलते.उदा. वायूचा संचय शरीरात ग्रीष्म ऋतूत ,प्रकोप वर्षा ऋतूत ,तर प्रशम शरद च होतो.याचप्रमाणे पित्ताचा संचय शरीरात वर्षाऋतूत ,प्रकोप शरद ऋतूत व प्रशम हेमंत ऋतूत होतो.कफ़ाचा चय शरीरात शिशिर ऋतूत ,प्रकोप वसंत ऋतूत व प्रशम ग्रीष्म ऋतूत होतो.
ऋतूनुसार होणार्याप दोष्प्रकोपापासून वाचण्यासाठी पंचकर्मे करण्याचा करावीत. वसंत ऋतूत कफ़ाचा प्रकोप होत असल्याने कफ़ावरील श्रेष्ठ उपक्रम वमन या ऋतूत घ्यावे.वर्षा ऋतूत वाताचा प्रकोप होत असल्याने श्रेष्ठ उपक्रम बस्ती घ्यावी. तसेच पित्ताचा प्रकोप शरद ऋतूत होत असल्याने विरेचन घ्यावे व रक्तमोक्षण करावे. त्यातही दोषांच्या शोधनासाठी श्रावण ,कार्तिक व चैत्र महिने सांगितले आहेत.म्हणजे श्रावणात बस्ती, कार्तिकात विरेचन व रक्तमोक्षण आणि चैत्रात वमन घ्यावे. श्रावण ,कार्तिक व चैत्र हे महिने शीतोष्ण्कटिबंधाच्या संबंधाने साधारण आहेत.म्हणजेच या ऋतूत उष्मादिकांची स्थिती समान असते.या तीन महिन्यांमध्ये पाऊस, थंडी ,उष्मा फ़ारसा नसल्याने पंचकर्मे सहन होतात. वरील जो शोधनकाल सांगितला तो निरोगी मनुष्याला लागू आहे.व्याधी असल्यास त्या त्या व्याधीप्रमाणे पंचकर्मे करावीत.वरील कालनियम त्यास लागू नाही.
ऋतूचर्येनुसार पंचकर्मे केल्याने ऋतूनुसार होणार्यान दोषप्रकोपामुळे होणारे विकार होत नाहीत
विरेचनास योग्य (विरेच्य) :-
* ताप (ज्वर), अॅलजीर्चा त्रास असलेले.
* कुष्ठ (त्वचा विकार, पिंपल्स, सोरायसिस, डार्क सर्कल्स)
* प्रमेह, मधुमेह, रक्तदाब वाढणे
* अर्ध्वग रक्तपित्त (नाक, कान, घसा इ. वरच्या भागातून रक्तस्त्राव होत असलेले)
* भगंदर (फिस्ट्युला)
* मूळव्याध (अर्श)
* प्लीहा दोष (रक्तासंबंधीच्या व्याधी)
* गळवं, गाठी, ट्युमर इ. (अर्बुद)
* थॉयरॉईड्सचा (ग्रंथी) त्रास असलेले
* लघवी अडणे (मूत्राघात)
* पोटात जंत होणे (कृमीकोष्ठ, वॉर्म इन्फेक्शन)
* नागीण (विसर्प)
* पांडूरोगी (अॅनेमिया)
* डोकेदुखी (शिर:शूल, मायग्रेन)
* डोळे व तोंडाची आग, वारंवार तोंड येणं
* पिंपल्स, त्वचा काळवंडणे, डार्क सर्कल्स, अकाली सुरकुत्या पडणे
* हृदयविकार
* दमा, जुनी सदीर्-खोकला
* कावीळ, पित्ताशयात खडे होणं
* वातरक्त, सांधेदुखी (गाऊट, युरिक अॅसिड वाढणे) * योनीरोग, मासिक पाळीच्या तक्रारी, वंध्यत्त्व.
* शुक्रजंतू अल्पता, हालचाल कमी असणे.
* डोळ्यांभोवती अंधारी येणे (पॅरालिसीसचे रुग्ण)
* गुद, योनी, लिंग, मूत्र अथवा त्वचेची आग होणे.
* स्तन्यदोष, काचबिंदू
* केस गळणे, केस पांढरे होणे.
* हॉमोर्न्सच्या तक्रारी आणि
* मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी विरेचन करणं, तसेच भविष्यात उष्णतेचा त्रास न होता, निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने शरद ऋतु (ऑक्टोबर) दरम्यान विरेचन घेणं लाभदायक ठरतं.
विरेचन लाभ :-
* मलभाग, रोगकारक तत्त्वाला शरीरातून काढून टाकले जाते. * शरीर बल, मानसिक शक्ती वाढते.
* वर्ण सुधारतो. तेज वाढते, शुक्रवर्धन होते.
* आयुष्यवर्धन होते, वृद्धावस्था लांबते.
* भुक वाढते, मनप्रसन्नता लाभते.
* पित्तज विकारांचा नाश होतो. तरुणपणात पित्ताचे प्राबल्य असते. तसेच आजकालच्या ताणतणावाखाली राहणाऱ्या, अनियमित आहारविहार सेवन करणाऱ्या काळात पित्तदोषांचे आजार प्रत्येकात हमखास दिसून येतात. म्हणूनच प्रत्येकाने वर्षातून एकदा विरेचन केल्यास 'खवळलेले पित्त' प्राकृत होऊन शरीर-मनाची प्रसन्नता अनुभवास येईल. थोडक्यात 'आजच्या बदललेल्या जीवनशैलीत विरेचन अत्यंत महत्त्वाचा उपचार आहे.
धन्यवाद !!!
"संजींवनी हब॔ल"
लक्ष्मी थिएटरजवळ 2रा मजला
8421775269/71
by appointment only.