03/09/2025
वणी ता. दिंडोरी येथील कु. रविना विजय गायकवाड हिने ६४ वी राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धा – २०२५ मध्ये ३,००० मीटरमध्ये रौप्य पदक आणि १०,००० मीटरमध्ये सुवर्ण पदक जिंकून नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशाचा अभिमान वाढविला आहे.
आदिवासी समाजातील मुलीने कठीण परिस्थितीवर मात करून गाठलेले हे यश केवळ कौतुकास्पदच नाही, तर हजारो ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
आज तिचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
माननीय पंतप्रधान श्री Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री Mansukh Mandaviya यांच्या मार्गदर्शनाखाली
भारताचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नवनवे यश संपादन करत आहेत!