03/10/2024
*डांडिया आणि हृदय आरोग्य*
शीर्षक वाचून थोडे नवल वाटू शकते परंतु गेल्या काही वर्षात भारतात विविध वयोगटातील स्त्री पुरुष यांचा गरबा खेळताना किंवा खेळून झाल्यावर अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी आहे.
गरबा हृदय कार्यात नेमका काय अडथळा निर्माण करतो यावर थोडा विचार केला व थोडी काळजी घेतली तर अश्या दुःखद घटना आपण नक्कीच टाळू शकतो.
गरबा खेळताना तेथील वातावरण पवित्र, उत्साह वर्धक असतो, उच्च स्वरातील संगीत साथीने शेकडो प्रसंगी हजारो भाविक गरबा नृत्य करत असतात.त्याची एकसारखी लय प्रसंगी वाढत जाते व भाविक न थांबता बेभान होवून नृत्य करतात यात प्रमुख्याने गिरक्या व उद्या याचा समावेश असतो यात प्रचंड ऊर्जा खर्च होत असते.अश्या वेळी जर त्या भाविकाला आधीच काही हृद्यासंबधी काही समस्या असतील ,बी पी सारखा त्रास असेल तर त्याचा हार्ट अटॅक शक्यता खूप पटीने वाढते कारण या प्रचंड ऊर्जा खाणाऱ्या कृतीने हृदयाला खूप काम करावे लागते.त्यामुळे त्याचे ठोके वाढतात,बी पी वाढते व जास्तीचा ऑक्सीजनची मागणी निर्माण होते.एवढ्या गर्दीत तो पुरेसा मिळत नाही व त्यातून दुर्घटना घडू शकते.
गरबा नृत्यातून आरोग्यसंपन्न व्यक्तीसाठी एक प्रकारचा खूप छान व्यायाम होतो पण तीच कृती हृदयासबंधी आजार असणाऱ्याला गंभीर समस्येत टाकू शकते प्रसंगी जीव गमावण्यापर्यंत वेळ येते.
*हे टाळता येण्या साठी काय करावे*
1- भरपूर पाणी पिणे
गरबा नृत्य करताना घाम येतो, शरीरातील पाणी कमी होते या मुळे अररिथमिस (हृदयाच्या ठोक्याची नियमित असलेली लय बदलने)होण्याची शक्यता खूप जास्त निर्माण होते व हृदयाचे कार्य अचानक थांबू शकते व कर्डिएक अरेस्ट होवून उपचार मिळे पर्यंत व्यक्ती दगावू शकतो.हे सर्व टाळण्यासाठी स्वच्छ पाण्याची बाटली जवळ ठेवावी व थोड्या थोड्या वेळाने पाणी पित रहावे, शक्य असेल तर लिंबू पाणी,O R S किंवा इलेक्ट्रोलाइट्स ड्रिंक अधिक उपयुक्त ठरू शकते परंतु सोडा , कॉल्ड ड्रिंक अगदी टाळावे.
*विश्रांतीचे मध्यांतर*
नवरात्र उत्सवात भाविक मित्र मंडळी, कुटुंबासह जात असतात.तेथे नृत्याचा आग्रह धरला जातो.पण जर व्यक्ती दिवसभराच्या कामाने थकला असेल, घाम येत असेल शारीरिक ,मानसिक अस्वस्थता जाणवत असेल, चक्कर येत असेल तर गरबा नृत्य प्रकार अगदी टाळावा व उपचार व विश्रांती घ्यावी.
*पुरेशी विश्रांती व झोप*
नवरात्र काळ हा महिला वर्गाचा खूप गडबडचा असतो, घराची स्वच्छ्ता, नवरात्र स्थापना, कुमारिका पूजन ,अखंड दिवा ,फुलोरा ई पारंपरिक गोष्टी करायचा व पुन्हा उपास, ई मुळे शरीर थकते व त्यात गरबा या मुळे प्रचंड थकवा येवू शकतो म्हणून वेळेचे नीट नियोजन करून पुरेशी झोप व विश्रांती या कडे गंभीर पणें पाहिले पाहिजे.
*काही टिप्स*
-नवरात्र सुरू होण्याआधी काही दिवस गरबा सराव सुर करवा म्हणजे शरीराला सवय होईल.
-उत्सव सुरू होण्या आधी आरोग्य तपासणी करावी व आपल्या नियमित गोळ्या घेण्यात खंड पडू नये.
-उपास फराळ किंवा जेवणाच्या वेळा नियमित पाळाव्यात.
-गरबा ठिकाणी जाताना आपली वैद्यकीय फाइल व गोळ्या सोबत ठेवाव्यात.
वरील सर्व गोष्टी सांगण्यामागचा उद्देश एकच आहे की नवरात्र उत्सवात खास करून महिला वर्ग खूप उत्साहात असतात त्या देवीचा शृंगार, नैवेद्य , भजन, गरबा ई जास्तीत जास्त लक्ष घालून व्यवस्थित करतात तसेच त्यांनी थोडे आपल्या आरोग्याकडे पण लक्ष द्यावे म्हणजे हा उत्सव अधिक छान व निर्विघ्न होवू शकतो.
सर्व भाविकांना माता कालिकेने आरोग्याचे वरदान द्यावे ही प्रार्थना
*डॉ प्रसाद अंधारे*
M D,DNB Cardiology
नासिक व नंदुरबार
7972889611
Instagram — andhare_heartclinic
App No
नासिक 8484984133
नंदुरबार 9209474633