13/04/2025
जेवण झालं की काहीतरी गोड खावंसं वाटतं?
जेवण झालं की काहीतरी गोड खावसं वाटतं अशी तुमची तक्रार आहे का? आणि गोड खाल्ले की वजन सुद्धा वाढणार! जर तुम्हाला गोड खावेसे वाटले तर तुम्ही काय खातात?
आज आपण बघणार आहोत:
१) गोड खाण्याची तीव्र इच्छा का होते?
२) ती टाळण्यासाठी उपाय काय?
गोड खाण्याची इच्छा का होते?
१) फक्त कार्बोहायड्रेट्सचं जेवण: तुमचं जेवण किंवा तुम्ही जे खाताय त्याचं कॉम्पोझिशन बरोबर नाही म्हणजे जेवणामध्ये तुम्ही फक्त कार्बोदकं जास्ती खाताय किंवा त्यातल्या त्यात पचायला हलकी अशी कार्बोदकं म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तांदळाचा भात, ब्रेड किंवा उपमा ,पोहे असे पदार्थ जे पटकन पचणारे आहेत आणि पटकन रक्तातली साखर ज्यांची बनणार आहे अशांचं प्रमाण जर तुमच्या जेवणामध्ये जास्त असेल तर पोट भरण्याचं सेन्सेशन छान पैकी मिळत नाही आणि ते टिकूनही राहत नाही . अशा केसेस मध्ये पण जेवण झाल्यावर काही वेळातच पुन्हा भूक लागणं किंवा गोड खावसं वाटणं हे सुद्धा साहजिक आहे
२. घाईघाईत जेवण: काहीजण खूप घाई घाई मध्ये जेवतात . म्हणजे अगदी पाच-दहा मिनिटांमध्येच त्यांचं जेवण उरकलेलं असतं. अशा केसेस मध्ये सुद्धा तुमच्या मेंदूपर्यंत सिग्नल जातच नाही की माझं पोट आता भरलं आहे आणि आता आपण खाणं थांबवायला पाहिजे . त्यामुळे जरी तुमच्या ताटातलं सगळं संपलं असलं तरी सुद्धा तुम्हाला अजून खायची इच्छा होणं किंवा गोड खावसं वाटणं शक्य आहे .
३. B12, मॅग्नेशियम, कॅल्शियमची कमतरता मध्ये काही वेळा गोड खाण्याची इच्छा होते.
४. खारट/मीठ जास्त असलेलं जेवण: जर तुम्ही जेवणामध्ये खूप मीठ घातलेले किंवा processed food किंवा खारवलेले पदार्थ खात असाल तरी सुद्धा जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होणं हे शक्य आहे.
५. ताण, झोपेची कमतरता, पाण्याची कमतरता: याशिवाय जर तुम्ही खूप स्ट्रेस मध्ये असाल किंवा ताण तणावात असाल ,झोप पुरेशी होत नसेल , पाणी पुरेसं पीत नसाल तरीसुद्धा गोड खायचे क्रेविंग्स होऊ शकतात .
यावर उपाय काय ?
१. खूप गोड खायची अशी तीव्र इच्छा तुम्हाला होत असेल तेव्हा रक्तातली साखर तपासा जर ती खूप कमी किंवा खूप जास्ती असू शकते.
२. जर तुमच्या खाण्यामध्ये कुठले फायबर्स नसतील किंवा कुठलेच प्रोटीन्स नसतील तरी जेवणानंतर काहीतरी पुन्हा खाणं किंवा गोड खावसं वाटणं साहजिक आहे. तेव्हा अशावेळी तुमच्या जेवणामध्ये सॅलेड्सचं ,डाळींचं ,दही , ताकाच प्रमाण थोडंसं वाढवा जेणेकरून तुमचं पोट भरेल लवकर आणि ते भरलेलं राहील .
३. जेवणाच्या शेवटी एक ग्लासभर ताक घेणे , जेवण झाल्यावर गुळाचा तुकडा खाणं हे सुद्धा क्रेविंस कमी करण्याचे काही उपाय आहेत .
४. तुम्ही खूप घाईघाईत खात असाल तर ते सावकाश खायला सुरुवात करा . साधारण जेवण संपायला पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी लागायला पाहिजे .
५. जेवणानंतर सुद्धा तुमच्या दृष्टीस जर का खाण्याचे पदार्थ पडले आणि स्पेशली तुम्ही जर का घरी गोड पदार्थ आणून ठेवले असतील कॅडबरीज् , चॉकलेट्स किंवा लाडू , काही मिठाई सारखे पदार्थ तर तुम्हाला निश्चितच ते खावेसे वाटणार आहे .
६. जेवण झाल्यावर तुम्ही बडीशेप खाल्ली तर नंतर फार खायची काही इच्छा होत नाही.
७. जेवण झाल्यानंतर ब्रश करणं ,एकदा तोंड स्वच्छ झालं की पुन्हा काही लवकर खायची आपली इच्छा होत नाही .त्यामुळे गोडाचे क्रेवींगज् टाळता येतील.
गोडावर नियंत्रण ठेवणं म्हणजे ‘गोड’ आयुष्याचं पहिलं पाऊल!
ही माहिती उपयोगी वाटली का?
Instagram Page: https://www.instagram.com/dietricks.smita?igsh=MXRsNjBxNnY2ZDQzcw==
Dt. Smita Kale
M.Sc. in Food & Nutrition, P.G.D. in Dietetics (Symbiosis-Pune)
9823049877
https://wa.me/message/YXQ3UYLQPTMQM1
709 Followers, 244 Following, 150 Posts - See Instagram photos and videos from Dietricks (.smita)