Agasti Healthcare

Agasti Healthcare serving excellent quality Ayurvedic products in the marketplace which are highly reliable to boost better nutrients for a healthy body

ग्रहणी / IBS / Colitis                                      ENGLISH  अमाशयाच्या सुषिर स्नायू पासून पुढील उंडुकापर्यंतचा ...
07/01/2023

ग्रहणी / IBS / Colitis ENGLISH





अमाशयाच्या सुषिर स्नायू पासून पुढील उंडुकापर्यंतचा भाग म्हणजे ग्रहणी(small intestine) हा अवयव होय

ग्रहणी या व्याधी मध्ये ग्रहणी(small intestine ) या अवयवाची व त्याच्या प्राकृत कर्माची ही हानी होत असते

अपक्व आहाराचे ग्रहण करणे, योग्य पचन होईपर्यंत तो पदार्थ ग्रहणीतुन पुढील या वयात जाऊ न देणे, सार किट्ट भागाचे विभाजन करणे, पक्व आहार रसाचे शोषण करणे, भाग मल स्वरूपात पक्वाशया कडे ढकलणे या क्रिया ग्रहणी (intestine)या अवयवाकडून होत असतात

अग्निमांद्य यामुळे (digestive power) कमी झाल्याने खाल्लेल्या अन्नाचे पचन योग्यप्रकारे होत नाही परिणामीअन्नाला विदग्ध अवस्था आम्लपाक (ऍसिडिटी) प्राप्त होते हीच स्थिती वारंवार कायम राहिल्यास ग्रहणी अवयवाची

( intestine) विकृती घडते व ग्रहणी (intestine) प्राकृत कार्यात बिघाड होतो व ग्रहनी रोगाची उत्पत्ती होते .



हेतू

♦योग्य वेळी भोजन न होण,

♦अजीर्ण झाले असता पुन्हा भोजन करणे,

♦अधिक मात्रेत खाणे,

♦गुरु ,शीत ,रुक्ष, आहार घेणे,

♦मलमूत्र आदी वेगांचे धारण करणे( रोखून धरणे)

♦अग्निमांद्य (डायजेस्टिव पावर )कमी होणे



पूर्वरूप



♦आळस , फ्रेश न वाटणे,

♦पचन उशिरा होणे,

♦अंग जड वाटणे,

♦जेवणाची इच्छा न होणे,

♦डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे,

♦पोटात गॅसेस ( आध्मान), तोंडाला पाणी सुटणे , करपट ढेकर, उलटी मळमळ सारखे वाटणे, कडू -आंबट पाणी येणे,

♦तोंडाला चव नसणे,

♦चक्कर, डोळ्यासमोर अंधारी येणे,

सर्व प्रकारच्या पचनक्रिया बिघडल्याने आहार रस योग्य प्रकारे निर्माण होत नाही साहजिकच शरीराच्या सर्व घटकांची सप्तधातूंची उत्पत्ती योग्य प्रकारे होऊ शकत नाही व बलक्षय उत्पन्न होतो आम अधिक प्रमाणात आल्याने अंग गौरव( अंग जड वाटणे) हे लक्षण आढळते अन्न अन्नाचे चल नीट न झाल्याने सार किट्ट विभाजनही योग्य प्रकारे होत नाही



लक्षणे

♦द्रमल प्रवृत्ती

♦साम मलप्रवृत्ती

♦दुर्गंधीयुक्त मलप्रवृत्ती

♦सशुल मलप्रवृत्ती

♦मलप्रवृत्ती ही अपक्व आम्ही युक्त असते तेव्हा ती द्रव व दुर्गंधीयुक्त असते



औषधी चिकित्सा



♦हरितकी , अमलकी, त्रिफला आरग्वध गंधर्व हरीतकी, सुंठ, नागरमोथा, शंख भस्म कपर्दीक भस्म

♦तक्र (ताक )हे ग्रहणी रोगामध्ये अन्न व औषध या दोन्ही दृष्टीने श्रेष्ठ ठरते

♦ग्रहणीच्या रुग्णास द्यावयाचे ताक हे ताजे फार अम्लता नसलेले पण पूर्ण विरजलेले असावे.

♦पिपल्यादि चूर्ण, पंचमुलादी चूर्ण अतिविषा, मुस्ता, लसूनादि वटी चित्रकादिवटी

आम्लपित्त / अजीर्ण / Hyperacidity                            आम्ल गुणाने पित्त वाढते म्हणून या व्याधीस आम्लपित्त असे म्ह...
06/01/2023

आम्लपित्त / अजीर्ण / Hyperacidity



आम्ल गुणाने पित्त वाढते म्हणून या व्याधीस आम्लपित्त असे म्हणतात

पित्त हे दोन प्रकारचे असते प्राकृत व विदग्ध . प्राकृत पित्त हे अन्नपदार्थ पचनास मदत करते तर विदग्ध पित्त आम ( toxins )उत्पत्ती

करते.

जसे दही लागलेल्या पातेल्यात चांगले दूध टाकल्यास दूध सुद्धा आंबट होते तसेच आम्लपित्त असलेल्या रुग्णाने चांगले अन्न खाल्ले

असता त्या अन्नाचा कडू आंबटपणा ( आम्लपित्त) वाढतो.

या व्याधीमध्ये अम्लगुना मुळे पित्त वाढते



आम्लपित्ताचे कारणे / हेतू

♦अति आंबट, अति तिखट, मसाल्याचे पदार्थ व पित्त वाढवणारे खानपानाचे सेवन केल्याने शरीरातील प्राकृत (natural) पित्त हे विदग्ध

(highly acidic ) होते.

♦नासलेले, विषयुक्त , तिखट, आंबट, मसालेदार , अतिउष्ण , अतिद्रव, पिष्टमय , पचण्यास जड पदार्थ . अशा पदार्थांचे अति सेवन करणे .

♦आंबवलेले पदार्थ, ब्रेड, इडली , डोसा, खमंग , ढोकळा, जलेबी

♦बेसन भजी समोसा इत्यादी चणाडाळ पासून बनवलेले पदार्थ सेवन करणे,

♦मलमूत्रांचा वेग रोखून धरणे,

♦अध्यशन (वारंवार खाणे) ,

♦उपवास करणे ,

♦शिळे अन्न खाणे इत्यादीमुळे पित्ताला विदग्धता येते तसेच

♦जेवणा च्या वेळा न पाळण / जेवणाच्या चुकीच्या वेळा,

♦भूक नसताना जेवण करणे ,

♦फास्ट फूड अधिक खाणे,

♦अधिक चहा कॉफी पिणे,

♦अति जागरण,

♦तंबाखू दारू गुटखा पान सुपारी इत्यादी व्यसन करणे.



संप्राप्ती

वरील सर्व कारणांमुळे पित्ताचा आम्लगुण वाढतो परिणामी खाल्लेले अन्न आंबते व आमलेल्या अन्नामुळे अधिक विदग्धता येऊन

अधिक पित्त प्रकोप (वाढ ) होते. तसेच

नेहमीच्या आम्लपित्तामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही अपचनामुळे शरीरात आम ( अपाचित आहार रस/ toxins) तयार

होतात. हे toxins पुढे असंख्य आजारांना कारणीभूत होतात



पूर्वरूप

♦पित्ताची उलटी होणे , पोट दुखणे , डोकं दुखणे,

♦अन्न न पचने,

♦करपट आंबट ढेकर,

♦छातीत जळजळणे,

♦कंठ दाह( घशाच्या ठिकाणी जळजळ)

♦जेवणाची इच्छा न होणे

♦पोट जड होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे ,पोट दुखणे डोकेदुखी पोटात गॅस तयार होणे शौचास पातळ होणे, दीर्घकाळ ऍसिडिटी मुळे

पोटात व्रण ( gastric ulcer ) तयार होतात



उपद्रव / complications

♦Gastritis , Gastric ulcer ,

♦इंटरेस्टीनल अल्सर

♦ॲनिमिया

♦विकनेस

ऍसिडिटी नेहमी होत राहिल्यास त्याचे रूपांतर वरील आजारात होते



चिकित्सा

♦गुडूची, त्रिफळा, कपर्दीक भस्म प्रवाळ पंचामृत

♦मोरावळा अमलकी यष्टी मधु

♦डाळिंब

♦औदुंबरवलेह भूनिंबादि काढा पटोलादी काढा



वरील औषधांचा रुग्णांमधील लक्षणे, प्रकृती, दोष, बल, नुसार योग्य तो वापर करावा

मधुमेह / डायबिटिस                          मधुमेहाची कारणे/ हेतू♦दूध दह्या सारखी पदार्थ जास्त प्रमाणात किंवा वारंवार खाण...
06/01/2023

मधुमेह / डायबिटिस



मधुमेहाची कारणे/ हेतू

♦दूध दह्या सारखी पदार्थ जास्त प्रमाणात किंवा वारंवार खाणे.

♦गोड पदार्थ जास्त खाणे,

♦चिंता न करणे (हॅपी गो लकी असणे)

♦अनुवंशिकता( hereditary)

♦कफाशी संबंधित आजार तसेच

♦कफ वाढवणारी सर्व कारण मधुमेह उत्पन्न करतात.

♦नवधान्य ( उत्पादित झाल्यानंतर लगेच वापरात आलेले) खाणे

♦शीत (cold), स्निग्ध (oily), मधुर (sweet), मेद्य( पिष्टमय), द्रव पदार्थ, इत्यादी प्रकारचे अन्न अति प्रमाणात किंवा वारंवार सेवन करणे

♦बैठे काम /व्यायाम न करणे

♦sedentery लाइफस्टाइल (शरीराची हालचाल कमी ) असणे

♦जलचर(sea food) प्राण्यांचे मांस अधिक प्रमाणात खाणे .

♦1.pancreas योग्य मात्रेत इन्सुलीन तयार करू न शकणे type 1diabetes

♦2. इन्शुलिन resistance मुळे पेशीद्वारे ग्लुकोज utilise केले जाऊ शकत नाही परिणामी रक्तातील ब्लड ग्लुकोज लेवल वाढते



पूर्वरूप

दात , मुख, डोळे ,कान, जननेंद्रिय. इत्यादी ठिकाणी अधिक प्रमाणात मल उत्पन्न होणे व साठुन राहणे, अंगवर ओलसर वाटणे शरीराचा दाह व्हायला लागतो /हात पायाची आग होणे

अंगास चिकटपणा यायला लागतो जननेंद्रियाच्या इथे कंडू ( खाज )हे लक्षण दिसायला लागते

वेगवेगळी इन्फेक्शन्स लवकर बरी होत नाही शरीरास घाम जास्त यायला लागतो. जरासं चालल्याने थकवा वाटणे, नख व केसांची वाढ लवकर लवकर होणे



सामान्य लक्षणे

मूत्राचे अधिक उत्पत्ती होणे अविल गढूळ रंगाचे उत्पन्न होणे,

तहान व भूक जास्त जास्त लागणे.



चिकित्सा

1. मेथी, जांभूळ ,दारूहरिद्रा ,हरिद्रा ,गुळवेल, निंब, गोक्षुर, मेषशृंगी, बिल्व ,मुस्ता ,इत्यादी वनस्पतींचा वैद्याच्या सल्ल्याने दोष दुश्य प्रकृती इ. चा योग्य विचार करून वापर करावा

2. चंद्रप्रभा वटी

3.गोक्षुरादी गुगळ



आहार

♦मधुर (sweet)रसात्मक पदार्थ नवधान्य, गुरु (पचावयास जड) पिष्टमय पदार्थ, स्निग्ध (तेलकट ) वर्ज

♦एक वर्षाच्या नंतरचे (जुने )गहू तांदूळ जे सेवन करणे.

♦साखर, गूळ ,केळी, बटाटा, रताळी ,साबुदाणा वर्ज.

♦लोणची मुळा वर्ज

♦सर्व प्रकारचे मद्य वर्ज

♦फक्त रक्तातील शुगर वाढलेली असेल परंतु लघवीला गढूळपणा नसेल, (अविल मूत्रता ) खूप वेळा

लघवीला जाणे (प्रभुतमुत्रता) ही लक्षणं नसेल तर डायबिटीस हा आजार हा अजून प्राथमिक अवस्थेत

आहे असे समजावे पूर्णपणे मधुमेह या आजारात रूपांतर झाले नसून आपण प्री डायबिटिक रुग्ण आहात .

खूप वेळा लघवीला जाणे गढूळ लघवी होणे आणि रात्री लघवीला उठावे लागणे ही मधुमेहाची प्रामुख्याने

लक्षणे आढळून येतात

मधुमेहा शास्त्रीयदृष्ट्या प्रमेहा ची शेवटची अवस्था होय



विहार

चिंता ताण तणाव स्ट्रेस मुक्त आयुष्य जगणे,

व्यायाम दररोज 45 मिनिटे चालणे रनिंग जॉगिंग करणे,

दिनचर्याचे पालन करणे,

मलमूत्र आदी वेग रोखून ठेवू नये,

भूक असेल त्याच वेळी खाणे/ वारंवार खाण्याची सवय सोडावी

जेवणाच्या व झोपेच्या वेळा पाळणं,

सिगरेट गुटखा तंबाखू आदी व्यसनांचा त्याग करणे



विहार

चिंता ताण तणाव स्ट्रेस मुक्त आयुष्य जगणे

व्यायाम दररोज 45 मिनिटे चालणे रनिंग जॉगिंग करणे

दिनचर्याचे पालन करणे

मलमूत्र आदी वेग रोखून ठेवू नये

भूक असेल त्याच वेळी खाणे/ वारंवार खाण्याची सवय सोडावी

जेवणाच्या व झोपेच्या वेळा पाळणं

सिगरेट गुटखा तंबाखू आदी व्यसनांचा त्याग करणे

Increased frequency of urine(Polyuria)

2. Increased appetite (Polyphagia)

3. Excessive thirst (polydyspia)

4. Turbidity in urine

5. Debility/ tiredness

6. Weight loss

7. Non-healing ulcer

8. Visual disturbances

Obesity किंवा लठ्ठपणा हा आजकाल खूप कॉमन प्रॉब्लेम होत चाललेला आहेआपल्या शरीराला daily functions ( कार्य करण्यासाठी) fat ...
11/10/2022

Obesity किंवा लठ्ठपणा हा आजकाल खूप कॉमन प्रॉब्लेम होत चाललेला आहे
आपल्या शरीराला daily functions ( कार्य करण्यासाठी) fat ची आवश्यकता असते परंतु काही कारणास्तव या fat चे प्रमाण वाढले जाते ते एवढ्या प्रमाणात वाढते की त्यामुळे अनेक वेगवेगळे आजार शरीरास जडायला लागतात. हे वाढलेले अतिरिक्त fat आजारास कारणीभूत ठरत असते.

Obesity किंवा लठ्ठपणा हा सुरुवातीला western countries चा आजार मानला जायचा परंतु हा आजार आता भारतात सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढायला लागला आहे
एक अनुमानानुसार भारतात सध्या 13 करोड लोकसंख्या obesity ग्रस्त आहे
तर ओबेसिटीमुळे आपण चिंतित का आहोत तर ओबेसिटीमुळे खूप सारे दीर्घआजार जसे की blood pressure, cholesterol ,infertility ,sleep apnea, heart problems , joint pain ,स्त्रियांमध्ये pcod. इत्यादी आजार शरीरात जडतात

Obesity मध्ये सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स कडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं परंतु ओबेसिटीच्या रुग्णांमध्ये डिप्रेशन (नैराश्य )लॅक ऑफ कॉन्फिडन्स , लॅक ऑफ सेल्फ इस्टीम आढळते

obese लोक publicly जाणं पसंत करत नाही
Obesity ला measure कसे कसे करतात तर commonly use करतात ती method म्हणजे body mass index (BMI)
18 - 24.9 normal BMI समजला जातो

25- 29.9 overweight या कॅटेगरीत मोडतो
30 पासून पुढे बीएमआय असणे obesity समजले जाते

Obesity ( स्थौल्य ) ची कारणे / हेतू

अति प्रमाणात दूध ,दही, श्रीखंड, तूप, मिठाई, गुलाबजाम, लाडू ,बर्फी इत्यादी मिठाईचे पदार्थ तसेच बटर, चीज ,लोणी, दुग्धजन्य, पदार्थ अति प्रमाणात सेवन करणे
स्निग्ध- तेलकट ,बटर, चीज, जिलेबी, बालुशाही, समोसा, पिझ्झा, बर्गर,french fries इत्यादी तळलेले पदार्थ. डोनट क्रीम युक्त पदार्थ
मधुर पदार्थ - आईस्क्रीम ,चॉकलेट्स ,जॅम, जेली, क्रीम युक्त केक ,कॅडबरी,
थंड पदार्थ - कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम ,थंड पाणी (चिल्ड वॉटर) इतर फ्रीजमधील थंड पदार्थ.
मांसाचे अति प्रमाणात सेवन करणे
आंबट पदार्थ ,मीठ ,इत्यादींच्या अति प्रमाणात किंवा वारंवार सेवन
करणे

उत्साह नसणे अल्प हलचाल केली तरी श्वास लागतो.

आहारच हेतू
अति मात्रेत खाणे
भूक नसताना खाणे
अति मात्रेत गुरु जड मधुर गोड स्निग्ध अन्न खाणे
व्यायाम व मैथुन न करणे
बीज दोष अनुवांशिक

नवन्न उत्पादित झाल्यानंतरत लवकर वापरण्यात आलेले गहू व तांदूळ
अध्यशन वारंवार जेवण करणे,
अनुप मौंस सेवन अति मद्यपान, अतिनिद्रा.

मेदोरोग (स्थ़ौल्य ) चे पूर्वरूप
आलस्य अति घाम,झोप जास्त प्रमाणात येणे,
शरीर जड वाटणे, थोड्याशा श्रमाने श्वास लागणे,
सामान्यत: मेदाचे(fat) प्रमाण इतर शरीरापेक्षा उदरावर थोडें अधिक असते मेदाची(fat) संचितीही तेथेंच होऊं लागते. त्यामुळें पोट सुटतें, आळस वाढतो, घाम जास्त येतो, थोडासा दम लागतो.

संप्राप्ती / pathophysiology

आपल्या शरीराचे पचन दोन ठिकाणी होत असते पहिले म्हणजे stomach व intestine येथे अन्नद्रव्याचे पचन होऊन आहार रस शरीराकडे पाठवला जातो. तेव्हा या आहार रसाचे शरीराचे कंपोनेंट्स ( रस ,रक्त,मांस, मेद, मज्जा, अस्थी, शुक्र )या ठिकाणी आहार रसाचे दुसऱ्यांदा पचन व्हावे लागते तेव्हा संबंधित कंपोनेंटस चांगला बनतो परंतु मेदधातू-अग्निमांद्य मुळे मेदधातूच्या इथे व्यवस्थित पचन न होता विकृत गुणांचा व अति प्रमाणात असा मेदधातू उत्पन्न होतो

तसेच मेदो रोगासाठी जी कारणं सांगितली आहे अति स्निग्ध, गुरु ,शित,
मधुर आहारामुळे ,अतिप्रमाणात भोजनामुळे सुरुवातीला शरीराचे स्रोतच बॉडी न्यूट्रिशन अल सर्क्युलटरी चैनल ब्लॉक होतात तसेच शरीरातील वायू (मरुत,डायनामिक्स ) मुळे जाठराग्नी (डायजेस्टिव पावर) देखील वाढते त्यामुळे खालेल्या अन्नाचे पचन (digestion )पटकन होते.त्यामुळेच जास्त भूक लागते परिणामी वजन वाढते.

Obesity मध्ये असलेले शैथिल्य ( flabbiness) due to excess of water elements मुळे येते

Obesity लक्षणे

शरीर दुर्गंधी,
स्वेद (घाम ) जास्त प्रमाणात येणे,
अति भूक ,अति तहान,
दौर्बल्य ,व्यायाम असहाय्यता,
म्हातारपण लवकर येणे

मैथुन शक्ती कमी होणे,
आयुष्य कमी होणे,

उपद्रव (complication)
Stroke diabetes ,cardiovascular disease

Obesity (स्थौल्य )उपचार-
जेवणापूर्वी दहा मिनिटात शवासन करणे किंवा इसबगोल जेवणापूर्वी घेणे,
पाणी उकळून गार केलेले पाणी पिणे,

कपालभाती 20min रोज करणे, सूर्यनमस्कार, ब्रिस्क( jogging)वॉकिंग करणे
स्थौल्य रोगहर काढा ,

चिकित्सा करताना आजार कशामुळे उत्पन्न झाला हे बघणं महत्त्वाचं असतं

मृदु विरेचन
लेखन
निरूह बस्ती
शिलाजतू
गुगुळ
त्रिफळा गुगुळ
ताम्र गुगुळ
हरितकी

(बिल्व ,शोनक, पाटला ,अग्निमंथ, गंभारी) मधासह किंवा त्रिफला काढा सह घेणे
मुस्ता ,पाठा, देवदार, त्रिफला, गोक्षुर, निंब, खदिर ,दारवी तिक्ता, रजनी )

रुग्णाचे बल काल प्रकृती वय सत्व सात्म्य आहार निद्रा इत्यादीनुसार वेगवेगळी चिकित्सा उपयोगी ठरते ठरते

(बिल्व ,शोनक, पाटला ,अग्निमंथ, गंभारी) मधासह किंवा त्रिफला काढा सह घेणे
मुस्ता ,पाठा, देवदार, त्रिफला, गोक्षुर, निंब, खदिर ,दारवी तिक्ता, रजनी

Obesity -

BMI

18.5 to 24.9 normal

25 To29.9 overweight

30 To higher obesity

Asian with BMI above 23 May have increase risk of health problem

Causes of obesity
Genetic,
Metabolic,
Hormonal influence,
Obesity occurs when you take more calories than you burn.
Unhealthy diet
High calorie diet and salty diet ,fast food Inactivity (Sedentary Lifestyle) intake more calories versus burn through exercise and daily physical activity.
Sleep not getting too much can cause change in hormone,
Stress.

22/09/2022
15/05/2022

Address

H No 610A Main Road Adgaon Nashik
Nashik
422003

Opening Hours

2pm - 8pm

Telephone

+919022063274

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agasti Healthcare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Agasti Healthcare:

Share