29/11/2021
*वेळेत हिमोडायलीसीस केल्याने जीव वाचला !!
१५ वर्षाची गुंजन हिस चढ उतरीचा ताप, पोटात दुखणे,रक्ताच्या उलटया होणे व कमजोरी असल्याने; आळे फाटा ता.जुन्नर जि.पुणे येथुन अतिशय गंभीर परिस्थितीत साफल्य हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. *डॉ.अनिरुद्ध भांडारकर (बालरोग तज्ञ) व डॉ.अभिजीत सांगळे (अतिदक्षता तज्ञ)* यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. तिचा रक्तदाब कमी (Hypotensive shock) झाल्यामुळे शरीरातील विविध अवयवांना रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्याने त्यांचे काम सुरळीत होत नव्हते. फुफ्फुसांवर सुज आल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यासाठी तिला Ventilator वर घेण्यात आले. तसेच यकृताला सुज आल्यामुळे तिला रक्ताचे घटक दयावे लागले. किडनी काम करत नसल्याने तिला लघवी होत नव्हती. त्यासाठी *डॉ.पवन देवरे (किडनी विकार तज्ञ)* यांच्या सल्ल्या प्रमाणे डायलीसीस करावे लागले. Ventilator व रक्तदाब वाढवण्यासाठी लागणार्या विशिष्ट औषधांवर (ionotropes) असलेल्या रुग्णाचे डायलीसीस करणे हे अतिशय अवघड असते. तरी साफल्य हॉस्पिटलचे संपुर्ण टिमने डॉ. भांडारकर, डॉ. सांगळे व डॉ.देवरे यांच्या मार्गदर्शना खाली प्रथमच नाशिक मध्ये बेडसाईड हिमो डायलीसीस केले. दोन्ही किडण्या काम करत नसल्याने तिला डायलीसीस ची गरज सुरूवातीला दररोज लागली व नंतर हळु हळु जसजसे तिच्या किडण्या काम करू लागल्या डायलीसीस एक आणि नंतर दोन ते तीन दिवसा आड असे करण्यात आले. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला ventilator वरुन काढण्यात आले. तसेच रक्तदाब सुरळीत झाल्याने औषधेही बंद करण्यात यश आले.
सध्या गुंजन ही एकदम सुखरूप असून तिला आता डायलीसीस ची सुद्धा गरज पडत नाही, कारण तिच्या दोन्ही किडण्या पूर्ववत काम करीत आहेत.
विशेष आभार
*डॉ.आरती पवारीया* (यकृत विकार तज्ञ ) ,
*डॉ.नागेश अघोर*(किडनी विकार तज्ञ) , *डॉ.संजय देसले* (क्ष किरण व सोनोग्राफी तज्ञ) आणि *डॉ.नितीन बिर्ला*(बालरोग तज्ञ) नाशिक.
ह्या रुग्णाचा उल्लेख करण्यामागचा खालील उद्देश
1) पूर्वी लहान मुलांच्या डायलीसीस साठी लोकांना मुंबई गाठावी लागायची ते आता आपल्या *नाशिक मध्ये साफल्य हॉस्पिटल ला होऊ शकते.
2) एकदा डायलीसीस चालू केले की आयुष्यभर करावे लागते हा असलेला लोकांचा गैरसमज दुर करणे.
3) वेळेत व योग्य मार्गदर्शनाने केलेले डायलीसीस हे जिवदान देऊ शकते जसे गुंजन ला भेटले.
*Hemodialysis done timely can Save Lives*
15 yrs old Gunjan was admitted under *Dr Aniruddha Bhandarkar* in Safalya hospital; with complaints of fever on & off, pain in abdomen, hematemesis & generalized weakness. As she was in hypotensive shock, *Paediatric intensivist Dr Abhijeet Sangale started her on ionotropic support n in view impending respiratory failure due to pulmonary edema & MODS, she was intubated and put on ventilator with settings requirements as high as PEEP of 21 for oxygenation. She had Acute liver & acute kidney failure with tota shut down; hence *Paediatric Nephrologist Dr Pawan Deore* was involved. As it was not possible to shift patient, decision of portable hemodialysis was taken. It was very difficult task with high ventilatory & ionotropic support to do Hemodialysis but team work of all doctors & staff of Safalya hospital, made it possible. It was first case in Nashik for portable hemodialysis in children. Child required hemodialysis daily initially n as she improved her dialysis requirements decreased to alternate day initially n then twice weekly n later once weekly. Her condition improved, she was weanned of all ionotrops support & also from Ventilator extubated uneventfully.
Now she is absolutely fine, she doesn't need any dialysis anymore as her kidneys functioning well.
Special thanks to
Dr Aarti Pawaria (Hepatologist),
Dr Nagesh Aghor (Nephrologist),
Dr Sanjay Desale (Radiologist) &
Dr Nitin Birla (Paediatrician).
Purpose of sharing this case is
1) Previously for children dialysis people has to refer to Mumbai but now it can happen in Nashik.
2) To remove misconception of people that once dialysis started its needed lifelong, which is not true.
3) Timely & properly guided dialysis can give new life to children.
4) Team work can do wonders as on this case.