27/07/2023
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सततबदल होत असल्याने, अनेक ठिकाणी डोळ्यांची साथ पहायला मिळते आहे. डोळयातुन पाणी व घाण येने, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यपणे प्रथम एकाच डोळयाला होता. मात्र एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळयालाही संसर्ग होतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
अशी घ्या काळजी-
१) डोळे आल्यास डोळयांना सतत हात लावू नये.
२) डोळे सतत स्वच्छ पाण्याने धुवावेत.
३) डोळे येणे हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रवास कींवा बाहेर फिरने टाळावे.
४) कुटुंबातील सदस्यां पासुन दुर रहावे.
५) डोळे आल्यास अस्वच्छ हाताने डोळे चोळू नयेत. तसेच डोळयांना स्पर्श केल्यास लगेच हात धुवून घेणे.
६) डोळे आलेल्या व्यक्तीचे कपडे, टाॅवेल इतरांनी वापरू नयेत.
७) डोळयांची जळजळ व त्रास काही ठराविक दिवसांनंतरही कमी होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.