
07/09/2025
निरोप तरी कसा घ्यावा?
बाप्पा हे १०दिवस तुझ्या सान्निध्यात कसे गेले कळलेच नाही. तुझ्या आगमनाने सर्व चिंता, आजार, दुःखे, निराशा कोठे पळून गेले ते कळलेच नाही. प्रत्येक क्षण हा अगदी चैतन्याने - उत्साहाने भारलेला होता. रोज सकाळ - संध्याकाळ तुझी आरती म्हणतांनाची तल्लीनता आता परत एका वर्षानेच@@ #@ अनुभवायला मिळणार.
प्रत्येक वर्षी तुला निरोप देतांना अंतःकरण जड होते. आपल्या लाडक्याच्या हातात निरोपेवेळी दही देतांना आणि
तहान लाडू व भूकलाडू बांधून देतांना काळीज हेलावते..
आणि परत ओढ लागते ती, पुढील वर्षीच्या तुझ्या आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या.