Swasth Clinic

Swasth Clinic "PURE ESSENCE" - Complete Cure Clinic..

सुखी वही इस जिवन में,
हो रोग न जिसके तन-मन में.॥

Dealing in chronic as well all acute cases..

20/11/2020
"अच्छाई  की बुराई पर विजय"        ईस संकल्पना का प्रतीक, यह "उत्सव" आपको "समृद्धीमय-मंगलमय-आरोग्यमय" हो, यही शुभकामनाये....
25/10/2020

"अच्छाई की बुराई पर विजय"

ईस संकल्पना का प्रतीक, यह "उत्सव" आपको "समृद्धीमय-मंगलमय-आरोग्यमय" हो, यही शुभकामनाये....

"शुभ दशेहरा"

Republic means the establishment of a uniform system and law for all the citizens in the country. In our country, all re...
26/01/2019

Republic means the establishment of a uniform system and law for all the citizens in the country. In our country, all religions, sects have been given equal rights and space.
For all of us 26 January is a proud full day.

Happy 70th Republic Day..

Regards,

"SWASTH CLINIC"
( A Complete Cure Clinic )
Helps You To Rejuvenate Your Life..

☎️ - 9028533914
💻 - swasthclinic@gmail.com
🏩 - Tapovan Road, Nashik, Maharashtra.

तुमचेही हात थरथरत असतील तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या कारणे!  जेव्हा वृद्ध लोक कशाचा आधार घेण्याचा किंवा काही पकडण्याचा...
23/01/2019

तुमचेही हात थरथरत असतील तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या कारणे!

जेव्हा वृद्ध लोक कशाचा आधार घेण्याचा किंवा काही पकडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचे हात थरथरायला लागतात. वाढत्या वयात होणारी ही एक मोठी समस्या आहे. पण जर वय जास्त नसतानाही ही हात थरथरण्याची समस्या होत असेल त्या व्यक्तीसाठी चिंतेची बाब ठरु शकते. कारण हात थरथरणे काही वेळ गंभीर आजाराचंही लक्षण असू शकतं. चला जाणून घेऊ हात थरथरण्याची समस्या होण्याची काही कारणे....

ब्लड प्रेशर -
ब्लड प्रेशर कमी झाल्याने किंवा वाढल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन प्रभावित होतं. याकारणाने हात थरथरायला लागतात. शरीरात ब्लड शुगर स्तर कमी होत असल्याने स्ट्रेस वाढू लागतो, त्यामुळे हात थरथरण्याची समस्या सुरु होते.

शुगरही आहे कारण -
शुगरची समस्या असणाऱ्या रुग्णांमध्येही हात थरथरण्याची समस्या बघायला मिळते. कारण जेव्हा व्यक्तीच्या शरीरात शुगर कमी होते तेव्हा स्ट्रेस वाढतो. त्यामुळे हात थरथरतात. जर तुमचेही हात थरथरत असतील आणि तुम्हाला शुगर नाहीये, तर एकदा चेकअप नक्की करा.

एनिमिया -
ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते, त्यांना एनिमियाची समस्या होते. या आजारात हात थरथरणे फार सामान्य बाब आहे. एनिमियाच्या रुग्णांमध्ये कमजोरी येते, ज्या कारणाने त्यांचे हात थरथरतात.

कॉर्टिसोल हार्मोन्स -
शरीरात कॉर्टिसोल हार्मोन्स वाढल्या कारणानेही स्ट्रेसचा स्तर वाढतो. त्यासोबतच व्यक्तीमध्ये चिडचिडपणा वाढतो, गोष्टी विसरु लागतो आणि हात थरथरु लागतात. त्यामुळे ब्लड सर्कुलेशन बिघडतं आणि हात थरथर करु लागतात.

या दुखण्यापासून सुटका करून घेण्यासाठी व प्रभावी उपचार आणी मार्गदर्शना साठी आजच भेट द्या :

"SWASTH CLINIC"
( A Complete Cure Clinic )
Helps You To Rejuvenate Your Life..

☎️ - 9028533914
💻 - swasthclinic@gmail.com
🏩 - Tapovan Road, Nashik, Maharashtra.

'या' 5 एक्सरसाइज करा आणि हाय ब्लड प्रेशरपासून सुटका मिळवा!  हाय ब्लड प्रेशर सध्या लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना ...
22/01/2019

'या' 5 एक्सरसाइज करा आणि हाय ब्लड प्रेशरपासून सुटका मिळवा!

हाय ब्लड प्रेशर सध्या लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना सतावणारी समस्या आहे. सततची धावपळ, कामाचा ताण आणि सतत जंक फूडचं सेवन यांमुळे सर्व वयोगटातील लोकांना त्रास होण्याची शक्यता असते. तसेच शरीराच्या अनेक समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो. याव्यतिरिक्त लठ्ठपणामुळेही तुम्हाला हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना कराव लागू शकतो. एवढचं नव्हे तर यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोकाही वाढतो. अनेक लोकांना हार्ट अटॅकही येतो. हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी थंडीमध्ये आपली विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. अन्यथा अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी सध्या बाजारामध्ये अनेक औषधं उपलब्ध आहेत. परंतु याऐवजी तुम्हाला काही व्यायामही मदत करतील. त्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना डॉक्टरही हे व्यायाम करण्याचा सल्ला देत असून दररोज कमीत कमीत 45 मिनिटं व्यायम करण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो.

वॉक करणं

तुम्हालाही हाय ब्लड प्रेशरचा त्रास सहन करावा लागत असेल तर दररोज वॉक करण्याची सवय लावून घ्या. यामुळे फक्त ब्लड प्रेशरच कमी होत नाही तर शरीराचं अनेक प्रकारच्या गंभीर समस्यांपासून बचाव होतो. सकाळी आपल्या क्षमतेनुसार वेगाने चालत वॉक करा आणि दररोज कमीत कमी 10 ते 15 मिनिटं न थांबता वॉक करा. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीजची समस्याही दूर होते.

सायकलिंग

सायकलिंग करणं सर्वात उत्तम कार्डियोवॅस्कुलर एक्सरसाइज मानली जाते. जेव्हा तुम्ही पॅडल मारत तुमच्या पायांना वरती आणि खालती करता त्यावेळी संपूर्ण शरीरामध्ये ब्लड फ्लो वाढतो. जो हृदयासाठी फायदेशीर ठरतो. हाय ब्लड प्रेशर आणि हायपरटेन्शनच्या रूग्णांसाठी दररोज कमीतकमी 20 मिनिटं सायकलिंग करणं गरजेचं असतं.

स्विमिंग करणं

तुम्ही कोणत्याही वयामध्ये स्विमिंग शिकत असाल तर शिकल्यानंतर दररोज स्विमिंग करा. वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी स्विमिंग बेस्ट ऑप्शन आहे. स्विमिंग केल्यामुळे ब्लड फ्लो वाढतो आणि शरीराची रचना उत्तम होते. वयोवृद्ध लोकांनाही स्विमिंग करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे शरीर ऊर्जा तयार होण्यास मदत होते.

डांस

तुम्हाला माहीत आहे का? डांन्सिगही एक प्रकारची एरोबिक्स एक्सरसाइज आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. डांस केल्यामुळे स्ट्रेस फार कमी होतो. ज्यामुळे हायपरटेंशन आणि हाय ब्लड प्रेशर यांसारख्या लक्षणांमध्ये आराम मिळतो. वयोवृद्ध लोकांनाबी आपल्या क्षमतेनुसार डांस करणं गरजेचं असतं. ज्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं.

सोप्या एक्सरसाइझ

फिट राहण्यासाठी आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही सोप्या एक्सरसाइजही करू शकता. जसं की, दिवसातून एक ते दोन वेळा घराच्या पायऱ्या चढा. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि मांसपेशी मजबूत होतात.

प्रभावी उपचार आणी मार्गदर्शना साठी आजच भेट द्या :

"SWASTH CLINIC"
( A Complete Cure Clinic )
Helps You To Rejuvenate Your Life..

☎️ - 9028533914
💻 - swasthclinic@gmail.com
🏩 - Tapovan Road, Nashik, Maharashtra.

अ‍ॅपेंडिक्स होण्याची खरी कारणं माहीत आहेत का? जाणून घेऊया अ‍ॅपेंडिक्स होण्यामागील कारणं, लक्षणं आणि त्यावर करण्यात येणाऱ...
21/01/2019

अ‍ॅपेंडिक्स होण्याची खरी कारणं माहीत आहेत का?

जाणून घेऊया अ‍ॅपेंडिक्स होण्यामागील कारणं, लक्षणं आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांबाबत...

अपेंडिक्स एक अशी समस्या आहे, जी 10 ते 30 वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. याचा त्रास पोटाच्या डाव्या बाजूला होतो. जर यामध्ये इन्फेक्शन झालं असेल तर हात लावला तरिही वेदनांचा त्रास होतो. अ‍ॅपेंडिक्स आतड्यांचाच एक हिस्सा असतो. ज्याचं काम शरीरातील सेलूलोज पचवणं असतं.

कसा होतो हा आजार?

अ‍ॅपेंडिक्सची नाडी छोटं आतडं आणि मोठं आतडं एकत्र येणाऱ्या ठिकाणी असते. या नाडीचा एक भाग बंद आणि एक भाग तसाच ओपन असतो. जेव्हा यामध्ये कण जमा होण्यास सुरुवात होत जाते. त्यावेळी दुसरीबाजू बंद असल्यामुळे ते कण बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे अ‍ॅपेंडिक्सला सुरुवात होते.

या कारणांमुळेही होतो अ‍ॅपेंडिक्सचा त्रास

अ‍ॅपेंडिक्सचं इन्फेक्शन होण्याची अनेक कारणं असतात. जसं फायबर असणाऱ्या पदार्थांच्या कमतरतेमुळे, फळांच्या बीयांच्या सेवनाने आणि बद्धकोष्ठाच्या त्रासामुळे होतो.

या आजाराची लक्षणं :

विष्ठेतून कफ येणं
पोट आणि नाभिमध्ये सतत वेदना जानवणं
पोटात सूज येणं
भूक न लागणं
बद्धकोष्ठाची समस्या
अस्वस्थ वाटणं

या दुखण्यापासून सुटका करून घेण्यासाठी व प्रभावी उपचार आणी मार्गदर्शना साठी आजच भेट द्या :

"SWASTH CLINIC"
( A Complete Cure Clinic )
Helps You To Rejuvenate Your Life..

☎️ - 9028533914
💻 - swasthclinic@gmail.com
🏩 - Tapovan Road, Nashik, Maharashtra.

वजन वाढण्यामुळे या गोष्टींचाही करावा लागू शकतो सामना !    वजन वाढणे ही आजची  सर्वात मोठी समस्या आहे. वजन वाढल्याने केवळ ...
20/01/2019

वजन वाढण्यामुळे या गोष्टींचाही करावा लागू शकतो सामना !

वजन वाढणे ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. वजन वाढल्याने केवळ अनेक आजारच होत नाही तर तुमच्या सुंदतेवरही वाईट प्रभाव पडतो. तसे तर वजन वाढण्याची अनेत कारणे आहेत. पण लाईफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव इत्यादी कारणांनीही वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. वजन कमी करणं हे एक आव्हानच आहे. अनेकांना शॉर्टकटने वजन कमी करायचं असतं. त्यामुळे अनेकजण चुकीचे डाएट फॉलो करतात. अनेकजण उपाशी राहून शरीराला नुकसान पोहोचवतात. चला जाणून घेऊया वाढलेल्या वजनामुळे कोणत्या गोष्टींता सामना करावा लागू शकतो.

1) तणाव

इंटरनेशनल जर्नल ऑफ ऑबेसिटीमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, जाडपणा मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. जाडपणामुळे तुम्हाला तणावाचा आणि डिप्रेशनचा सामना करावा लागू शकतो.

2) स्लीप एपनिया

जेव्हा तुम्ही वाकता तेव्हा छातीत, मानेत आणि चेहऱ्यावरील जास्तीच्या मांसामुळे तुमची श्वासनलिका दबली जातेय त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. झोपताना शरीरात योग्य प्रमाणात हवा न पोहचल्याने तुम्हाला अस्वस्थ होतं. त्यामुळे तुमची झोप उडू शकते.

3) डायबिटीज

मध्यम जाडेपणामुळेही टाईप 2 चा डायबिटीज होण्याचा धोका असतो.

4) कोलेस्ट्रॉल

तुमच्या शरीरात असलेल्या अतिरीक्त फॅटमुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकतं. यामुळे तुम्हाला हृदयरोग आणि स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.

5) त्वचा रोग

जाडेपणामुळे तुमच्यातील हार्सोन्सचं संतुलन बिघडू शकतं. यामुळे तुमची त्वचा प्रभावित होऊ शकते. याचकारणाने त्वचेवर काळे निशाण तयार होतात.

प्रभावी उपचार आणी मार्गदर्शन :

"SWASTH CLINIC"
( A Complete Cure Clinic )
Helps You To Rejuvenate Your Life..

☎️ - 9028533914
💻 - swasthclinic@gmail.com
🏩 - Tapovan Road, Nashik, Maharashtra.

Address

Hpt Colege Road
Nashik
422004

Opening Hours

Monday 2pm - 5pm
Tuesday 2pm - 5pm
Wednesday 2pm - 5pm
Thursday 2pm - 5pm
Friday 2pm - 5pm

Telephone

9960846008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swasth Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category