28/02/2026
हरवलेले शब्द पुन्हा शोधूया... 'श्रवणालय' उपक्रमात सहभागी होऊया ! धकाधकीच्या जीवनात आपण एकमेकांच्या संपर्कात आहोतच पण मनापासून आपण संवाद साधतोय का ? हा प्रश्न तुम्ही एकदा स्वत:ला विचारा. उत्तर जरा नकारार्थी येतयं ना ? तुमच्यातल्या हरवत चाललेल्या माणसाला पुन्हा तुमच्यात आणण्यासाठी अन् करपलेली नाती पुनरुज्जीवीत करण्यासाठी नाशिकमध्ये एक अनोखा उपक्रम आकाराला येतो आहे... 'श्रवणालय'! कोवळे किरण, श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था, मराठा विद्या प्रसारक समाज व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष उपक्रमाचे लोकार्पण होत आहे,या कार्यक्रमास नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहराच्या प्रथम नागरीक या नात्याने महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी केले आहे. लोकार्पण सोहळा : स्थळ : गुरुदक्षिणा शर्मन हॉल वेळ : शुक्रवार दि 6 मार्च सायं 4:30 ते 8चला, पुन्हा एकदा एकमेकांना ऐकून घेऊया ! संजीवन नात्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया ....