26/06/2018
I HAVE VITILIGO.... BUT IT IS OK.....IT DOESN'T TAKE AWAY MY HAPPINESS
25 JUNE , WORLD VITILIGO DAY: LETS UNDERSTAND VITILIGO
आज जागतिक पांढरा कोड दिन : होमीयोपॅथीक उपचार ठरत आहे संजीवनी
त्वचेवरील पांढरे चट्टे अर्थात पांढरा कोड ( Vitiligo) ह्या आजाराबद्दल अनेक गैरसमजुती समाजात आहेत. या गैरसमजुतींमुळे व सामाजिक दृष्टिकोनामुळे, खरंतर वैद्यकीयदृष्ट्या सामान्य असणारा हा आजार, त्या रुग्णाच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ करतो. मुलीला जर लहान वयात हा आजार आढळून आला तर मग विचारायलाच नको, तिच्या लग्नाची चिंता हा आजार आईवडिलांची झोपच पळवतो.
शास्त्रीय दृष्टिकोनाने बघितल्यास व्हिटीलीगो हा एक जनुकीय विकृतीतून होणार आजार असून, त्वचेचा रंग तयार करणाऱ्या पेशी नष्ट
झाल्याने त्वचेवर पांढरे डाग उत्पन्न होतात, आणि जरी हा दीर्घकालीन व थोडासा असाध्य आजार असला तरी योग्य उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते.
जागतिक आरोग्य संघटनेने ( World Health Organization) २५ जून हा दिन World Vitiligo Day अर्थात जागतिक पांढरे कोड दिन घोषित केला असून ह्या दिवशी ह्या आजाराबद्दल जनजागृती करणे हे आम्हां डॉक्टरांचे कर्तव्यच आहे.
पांढरा कोड म्हणजे त्वचेवरील रंग नष्ट होऊन त्वचेचा रंग पांढरा होणे होय. रंग तयार करणाºया पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ म्हणतात. या पेशी काही कारणाने नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यास अडथळे येऊन त्वचेच्या भागात रंग तयार होत नाही. तिथे पांढरा डाग अर्थात कोड निर्माण होतो. अशा डागांचे शरीरावरील स्थान निश्चित नसते. पांढरे डाग कोणत्याही व्यक्तीस होऊ शकतात. अगदी लहान बालकासही कोड होऊ शकतो.
होमीयोपॅथीक उपचार पद्धती हि लक्षणांवर खूप जास्त भर देते म्हणून होमिओपॅथिक उपचार पद्धतीत तर पांढऱ्या डागांची सुरुवात शरीराच्या कोणत्या भागांपासून व कोणत्या बाजूने झाली, सुरुवात होताना काही घटना घडल्यानंतर आजाराची गती वाढली का, आपल्या ताणतणावांचा आजाराच्या वाढण्यामागे काहि संबंध लक्षात येतोय का , ह्या बाबींचा व्यक्तिनुरूप खूप अभ्यास केला जातो व त्यानंतरच त्या व्यक्तिनुरूप औषधोपचार केले जातात.
या रोगाला काही जेनेटिक दोषाची कारणे असू शकतात. या विकारात जनुकामधील त्वचेतील मेलॅनिन तयार करणाºया पेशी नष्ट होतात. मेलेनिनमुळे त्वचा व केसांचा रंग ठरत असतो. सुमारे ३० टक्के रुग्णांमध्ये हा रोग आनुवांशिकतेने झाल्याचे आढळून येते. पण अनुवंशिकतेने रुग्णामध्ये हा आजार होण्याची क्षमता जरी असली तरी खरी आजाराची सुरुवात व आजार वाढण्याची प्रक्रिया हि होते जेंव्हा ती ती व्यक्ती , सभोवतालच्या ताणतणावांना किंवा इतर घटकांना बळी पडते व स्वतःचे अनुकूलन करू शकत नाही. सगळ्या दीर्घकालीन आजारांमध्ये आपल्याला हेच दिसून येते कि जरी अनुवंशिकतेने रुग्णांच्या भावाबहिणींमध्ये आईवडिलांचा आजार होण्याची संभाव्यता असली तरीही सर्वांना तो आजार होत नाही, व झाला तरी त्याची तीव्रता वेगवेगळ्या प्रमाणात असते. होमीयोपॅथीक उपचार अशा दीर्घकालीन आजारांसाठी खूप उपयुक्त ठरत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.
कोडाचे विविध प्रकार:
पांढºया कोडाचे प्रकार अनेक असून, जर कोडाचे चट्टे संपूर्ण शरीरावर असतील तर त्याला व्हिटिलिगो वल्गारीस असे म्हणतात.
फक्त ओठावर, बोटांच्या टोकावर वा गुप्तांगावर चट्टे असतील तर त्याला ‘लीप टीप व्हिटिलिगो’ म्हणतात.
एकाच ठिकाणी चट्टा असेल तर त्याला ‘लोकलाइजड व्हिटिलिगो’ म्हणतात
जर चट्टे वेगाने उमटत असतील तर त्याला ‘अन्स्टेबल व्हिटिलिगो’ म्हणतात.
व्हिटीलीगो या आजाराबद्दल असलेल्या काही गैरसमजुती :
बऱ्याचशा रुग्णांबरोबर साधल्यानंतर एक लक्षात आले कि ह्या आजाराबद्दल बऱ्याचशा गैरसमजुतीदेखील आहेत. व बरेचशे रुग्न ह्या गोष्टींच्या मागे बराच वेळ वाया घालवतात व नंतर आजाराची तीव्रता वाढल्यानंतर उपचारांकडे वळतात. त्यातल्या
काही गैरसमजुती खालीलप्रमाणे.
१. रक्त अशुद्ध झाल्यामुळे पांढरे डाग होतात
२. नशिबाच्या किंवा पूर्वजन्मीच्या किंवा पूर्वजांच्या दोषांमुळे हा आजार होतो.
३. ह्या आजारासाठी उपचार नाहीत.
४. कुठल्याही पांढऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास किंवा त्यांना स्पर्श झाल्यास हा आजार वाढतो.
( माझ्याकडे उपचार घेणाऱ्या एका मुलीला शेजाऱ्यांनी सांगितले कि हा आजरा असताना काहीही पांढरा रंग असलेले खायच नाही, नंतर एका नातेवाईकाने सांगितले कि पांढऱ्या पदार्थाना स्पर्शही होता काम नये. पण त्या मुलीचा घरी आईवडिलांचा व्यवसाय दुधाचा असल्याने त्यांनी काय केले असेल, तर त्यांनी त्या मुलीला आजार वाढू नये म्हणून तिच्या मामांच्या कडे ठेवले, आजाराबध्दलच्या गैसमजुती तुमचे तुमच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ करतात म्हणून सर्वांच्या सर्व गोष्टी अगदी अंधविश्वासाने अनुसरण्यापेक्षा जर थोडा शास्त्रीय दृष्टिकोन ठेवला तर निश्चित रुग्णांचा फायदा होईल.
होमीयोपॅथीक उपचार :
इतर दीर्घकालीन आजारांसारख्या पद्धतीने पांढऱ्या डागांच्या उपचारात सुद्धा , ह्या आजाराच्या लक्षणांसोबत, त्या रुग्णाची प्रकृती पूर्णपणे समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरते. हि सर्व माहिती त्या रुग्णाचे शारीरिक व मानसिक पॅटर्न समजावून देतात व त्यानुसार असणारे आजार हे कमी किंवा पूर्णपणे बरे करण्यासाठी महत्वाचे ठरतात.
पांढऱ्या डागांसाठी होमीयोपॅथीक उपचारांची उपयुक्तता ही त्या आजाराच्या अवस्थेवर व तीव्रतेवर अवलंबून असते. आजाराच्या सुरवातीच्या काळात जर योग्य उपचार झाले तर आजार पूर्णपणे बारा होऊ शकतो व भविष्यातही परत नंतर नवीन डाग येत नाही.
काही रुग्णांमध्ये आजाराची तीव्रता खूप कमी असते व काहीही उपचार नसताना देखील आजार काही डागांपुरता मर्यादित असतो , पण तरी अशा रुग्णानीसुद्धा होमीयोपॅथीक उपचार नक्की घ्यावा, कारण आजाराची तीव्रता हि नंतर ताणतणाव वाढल्याने वाढत जाते व खूप नंतर आजार कमी किंवा समूळ नाहीसा करणे अवघड जाते.
( मध्यमवयीन रुग्णांमध्ये एकतर उपचारांना कंटाळून किंवा इतर कारणांमुळे उपचार घेतले जात नाहीत व जेंव्हा मुलांच्या लग्नाची वेळ येते तेंव्हा किंवा डागांचे प्रमाण चेहऱ्यावर वाढायला लागते तेंव्हा पालक परत एकदा तर उपचारांकडे वळतात. पण आधीच्या अवस्थेमध्ये जितका फायदा होऊ शकतो तितका नंतर होत नाही)
आजाराची तीव्रता खूप जास्त असेल किंवा खूप वर्षांपासून असेल तरी अशा रुग्णांनी होमिओपॅथिक उपचार घ्यायला हवेत कारण ट्रीटमेंट घेतल्याने जरी पांढऱ्या डागांवर नवीन नॉर्मल रंग आला नाही तरी आजाराचे प्रमाण कमी होते,आजार आहे त्या स्थितीत राहतो व नवीन डाग तयार होण्याचे प्रमाण खूपच कमी होते.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे , तुम्ही उपचार घ्या अथवा नाही पण आजारामुळे तयार होणार न्यूनगंड तयार होऊ देता काम नये. खूप रुग्णांमध्ये बघितल तर समजेल कि रुग्ण ह्या आजारामुळे आयुष्यात खूप जास्त संकुचित करून घेतो. बरेच रुग्ण तर कधीकधी त्यामुळे येणारे आत्महत्येचे विचार सुद्धा बोलून दाखवतात. खरं तर व्हिटीलीगो हा वारंवार फक्त त्वचेला होणार एक छोटासा आजार आहे पण चुकीच्या विचारसरणीमुळे तो आपली मानसिक अवस्था सुद्धा पोखरून टाकतो.
बरेच रुग्ण असेही बघितले कि जे खूप जास्त पांढरे डाग असताना सुद्धा त्याचा विचार करत नाही आणि अगदी आनंदी आयुष्य जगतात, आपणही संकल्प करूया कि हा आजार जरी आह्माला आहे , तरी काही फरक पडत नाही, आणि तो माझा आनंद तर अजिबातच हिरावून घेऊ शकत नाही.
धन्यवाद
Happy Healing.
डॉ प्रशांत सोनवणे
स्वास्थ्य होमीयोपॅथीक क्लिनिक व मानसिक स्वास्थ्य सेंटर
ऑक्सिजन प्लाझा , चांडक सर्कल शेजारी
मुंबई नाका
नाशिक
फोन. 9766561513