19/06/2019
Diet tips 4
आज आपण थायरॉईड आणि वेट लॉस बद्दल जाणून घेणार आहोत.
थायरॉईड म्हणजे काय हे आधी जाणून घेणे महत्त्वाचे आणि गरजेचे आहे.खरतर "मला थायरॉईड आहे".हे वाक्यच चुकीचे आहे. "थायरॉईड" नावाची एक ग्रंथी (gland) ही आपल्या घशात असते.या ग्रंथीच्या कार्यात काही कारणाने बिघाड झाल्यास त्यामुळे निघणारे संप्रेरक(हार्मोन्स) (T3 आणि T4 )कमी अधिक प्रमाणात स्त्रावतात.
त्यामुळे दोन प्रकारच्या परिस्थिती शरीरात निर्माण होऊ शकतात.
1) hypothyroidism (हैपोथयरॉईडीझम) -म्हणजे थायरॉईड ग्रंथिकडून कमी प्रमाणात संप्रेरक स्त्रावले जाणे.(ह्याने वजन वाढते)
2) Hyperthyroidism ( हैपेरथयरॉईडीझम)
म्हणजे थायरॉईड ग्रंथिकडून जास्त प्रमाणात संप्रेरक स्त्रावले जाणे.(ह्याने वजन झपाट्याने कमी होते).
या सर्व गोष्टी या साठी जाणून घेणे आवश्यक आहे कारण शरीरातील या संप्रेरकांच्या बदलांमुळे शरीरामध्ये किंवा चयापचय प्रक्रिया यात काय बदल झाला आहे हे लक्षात येईल.
आज आपण हैपोथयरॉईडीझम बद्दल जाणून घेऊ.(हैपेरथयरॉईडीझम बद्दल वजन वाढवण्यासाठी टिप्स या सदरात जाणून घेऊया)
लक्षणे,
* थकवा येणे
*वजन वाढणे
*थंडी वजने
*जॉईंट पेन
*उदासीनता
*घशात काहीतरी अडकले आहे असे वाटणे
*केस गळणे
*ड्राय स्किन
अशी लक्षणे दिसून आल्यास लगेच dr ना दाखवावे.
जर तुम्हाला हैपोथयरॉईडीझम आहे हे कळले तर dr तुम्हाला गोळी लिहून देतील जी तुम्हाला सकाळी उपाशीपोटी घायची असेल.अगदी न चुकता ही गोळी घेणे गरजेचे आहे.ही गोळी तुम्हाला तुमच्या हॉर्मोन लेव्हल नॉर्मल आणायला मदत करेल.एकदा जर हॉर्मोन नॉर्मल व्हायला लागले की वजन कमी करणे सोपी होईल.
हैपोथयरॉईडीझम मध्ये शरीराचा BMR (Besal metabolic rate) हा कमी होतो. BMR म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शरीराकडून वापरली जाणारी ऊर्जा. म्हणजेच तुमच्या शरीराकडून फार कमी प्रमाणात ऊर्जा वापरली जात आहे.जेणेकरून तुमचे वजन वाढते.
आता,हैपोथयरॉईडीझम मुळे वेट का वाढते हे आपल्याला कळले,म्हणजे यावर उपाय काय असेल यावर विचार केला तर असे लक्षात येईल की जर BMR वाढवला तर वजन कमी होईल, म्हणजे तुमचे शरीर हे कमी ऊर्जा खर्च करत आहे आणि आपल्याला त्याला जास्त ऊर्जा खर्च करायला भाग पडायचे आहे.
BMR दोन प्रकारे वाढवता येऊ शकतो
1) व्यायाम. व्यायाम करताना आपल्या शरीरातील ऊर्जा वापरली जाते.हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. BMR वाढवण्याचा हा सगळ्यात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे
2)दुसरा मार्ग म्हणजे diet. तुम्ही विचार करा जर तुमच्या शरीराला आतून ऊर्जा खर्च करायला भाग पडले तर? म्हणजे असे पदार्थ खाणे आणि अश्या पद्धतीने खाणे जेणेकरून शरीरात ते पदार्थ पचवण्यासाठी ऊर्जा खर्च केली जाईल.हे पदार्थ कोणते आणि ते कसे खावे हे पुढील टिप्स मध्ये दिले आहे
ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन तुमच्यासाठी काही टिप्स
1) dr नी लिहून दिलेली गोळी अगदी न चुकता उपाशीपोटी घेणे,लक्षात राहण्यासाठी तुम्ही पदराला गाठ मारा किंवा टॉप ला गाठ मारा किंवा ओढणीला गाठ मारा किंवा गॅस ओट्यावर लिहून ठेवा काहीही करा पण ही गोळी एकही दिवस मिस झाली नाही पाहिजे.मी 4-5 दिवस गावला गेली होती किंवा गोळ्या विकत आणायच्या राहिल्या,मी विसरतेच असे कुठलेही कारण स्वतःला देऊ नका. एक लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत dr नी सांगितल्याशिवाय गोळी बंद करायची नाही. कितीही योग्य diet follow केला किंवा व्यायाम केला तरीही.diet आणि व्यायाम वजन कमी करायला मदत करतील पण हॉर्मोन नॉर्मल करायला एकच पर्याय आहे "गोळी" हे नेहमी लक्षात ठेवा.
दर 3 महिन्यांनी dr ना दाखवावे,तुमचे हॉर्मोन चे लेवल नॉर्मल आल्यास dr तुम्हाला गोळी बंद करायचा सल्ला देखिल देऊ शकतात पण तोपर्यंत मात्र गोळी रेग्युलर घेणे आवश्यक आहे. तुम्ही जितकी गोळी रेग्युलर घ्याल तितक्या लवकर गोळी बंदही होऊ शकते.
2)व्यायाम अत्यावश्यक-व्यायामाला पर्याय नाही हे जेवढ्या लवकर तुम्ही स्वीकाराल तेवढे लवकर तुम्ही वजन कमी करू शकाल.आता वैदेही मॅडमनी सांगितलं म्हणून उद्याच सकाळ पासून मी व्यायाम सुरू करणार,खूप व्यायाम करणार असा जर निश्चय तुम्ही करत असाल तर थोडे थांबा. तावतावत येऊन जर तुम्ही असा व्यायाम सुरु केला तर तुम्हालाच प्रॉब्लेम होऊ शकतो. एक तर एकंदर परिस्थिती मूळे तुम्हाला थकवा आलेला असू शकतो किंवा जॉईंट पेन पण असू शकते आशा वेळी सुरुवात कमी व्यायामाने करावी.आणि नंतर परिस्थिती सुधारल्यास व्यायाम वाढवू शकता.व्यायामात देखील थोड्या थोड्या दिवसांनंतर बदल करत राहावे,त्यामुळे सुरवातीला जर तुम्ही खूप व्यायाम केला तर नंतर बदल करण्यासाठी काहीच उरणार नाही, म्हणून सुरुवात कमी व्यायामाने करावी
3)आहार
आहार घेतांना तुम्हाला हे लक्षात घ्यायचे आहे की प्रत्येक 2-3 तासांनी असे पदार्थ खाणे जेणेकरून तुमचा BMR ही वाढले पण त्या पदार्थापासून तुम्हाला जास्त कॅलरीज पण नाही मिळणार,आता हे पदार्थ कोणते तर हे पदार्थ,
कडधान्ये,(कमी तेलात शिजवलेले
एखादे फळ (सालासकट खाण्याचे फळ सालासकट खावे,फ्रुट juice टाळावा,( का टाळावा याचे कारण diet tips 2 मध्ये दिले आहे)केळी,आंबा अननस टाळावे).
फुटाणे,
सलाड
ताक
कच्चा चिवडा
नारळाचे पाणी (रोज पिल्यास उत्तम)
Green tea
बिना साईचे बिना साखरेचे दूध
ओट्स
या प्रकारचे कमी तेलात तयार केलेले कोणतेही पदार्थ खाऊ शकता.लक्षात घ्या वरील पदार्थ हे नाश्ता,जेवण,रात्रीचे जेवण यातील मधल्या काळात घ्यायचे आहे, केवळ हेच पदार्थ खा असे माझे बिलकुल म्हणणे नाही.
Dr Pawar's Homeopathic Clinic chandwad