
23/05/2025
दिलासा, गेल्या 20 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना, ज्यांच्या नातेवाईकांना त्यांना सांभाळणे काही कारणास्तव शक्य नाही, वा जे पूर्णपणे निराधार आहेत, जे पोलिसांकडून दिलासात दाखल झाले आहे, अशा शारिरीक व मानसिक व्याधिग्रस्त रुग्णांना सांभाळतो.
अर्थात, सर्वस्व वाहून घेतलेले कर्मचारीवर्ग आणि समाजातील काही दानशूर व्यक्तिमत्त्व यांच्या सहकार्यातून दिलासा आपले कार्य इनामेइतबारे पार पाडत आहे.
अशात जर, एखाद्या प्रतिष्ठित संस्थेकडून ज्यावेळेस पुरस्कृत केले जाते, तो दुग्धशर्करा योग ठरतो.
दि. 21 मे 2025 रोजी, "दिलासा केअर सेंटरचे" संस्थापक सदस्य, श्री. सतिश जगताप यांना, "कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था" यांच्यामार्फत "राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.
असे पुरस्कार म्हणजे, आतापर्यंत केलेल्या कामाची पावती असते. तसेच ह्या पुरस्कारांसोबत आपले कार्य अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची जबाबदारीही वाढते.
कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे मनापासून आभार.