04/02/2023
जागतिक कर्करोग दिन
सामाजिक जनजागृती - Public Awareness
https://drpandurangshrirame.blogspot.com/2019/12/oral-cancer.html
मुख आरोग्य आणि मुखकर्करोग(Oral Cancer)य़ांचा परस्पर घनिष्ट संबध- डॉ.पांडुरंग श्रीरामे (दंतरोग तज्ञ)
दात नियमित स्वच्छ न केल्यास फक्त दात किडणे किंवा तोंडातून दुर्गंधी येणे याच समस्या निर्माण होत नाहीत तर Oral Cancer सारख्या भयानक आजाराला देखील सामोरे जावे लागू शकते.
नियमित दातांची निगा न राखल्यामुळे दातदुखी,तोंड येणे,दात किडणे किंवा तोंडातून दुर्गंधी येणे यांच्या समस्या निर्माण होतात.मात्र एवढंच नाही तर हे तोंडाच्या कर्करोगाचेही लक्षण असु शकते. ‘तोंडाचा कर्करोग हा जबडयाच्या आतल्या बाजुला असलेली त्वचा स्नायु,नसा,हिरड्यांमध्ये होण्याची शक्यता असते.ओरल कॅन्सरवर उपचार असले तरी दुर्देवाने निष्काळजीपणा व अयोग्य मार्गदर्शनामुळे आत्तापर्यंत अनेकांचा यात मृत्यु झाला आहे.’
सामान्यत: तोंडामधील कर्करोग हा ५० वर्षांवरील लोकांमध्ये जास्त आढळतो पण काहीवेळा तरुणांमध्येही या रोगाची लक्षणे दिसुन आलेली आहेत. ‘धुम्रपान,मद्यपान,तंबाखु व सुपारीचे अतिसेवन,ओठांचा सतत सुर्यप्रकाशाशी सबंध आल्याने हा आजार अधिक बळावतो.तसेच तोंडातील अस्वच्छतेमुळेही तोंडातील कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते.’ त्यासोबतच जर पुर्वी कधी तुम्हाला डोक्याचा किंवा मानेचा कर्करोग झाला असेल,वारंवार तोंडातील इन्फेक्शन होत असेल किंवा मग घरातील कोणाला याचा त्रास असेल तर त्यांना हा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.
तोंडाच्या कर्करोगामुळे जबडयाच्या आतील भागात अनेक समस्या निर्माण होतात.या आजाराच्या उपचारा दरम्यान हिरडयांचे आजार,दात किडणे असे अनेक त्रास उद्धभवू शकतात.या आजारामुळे तोंडातील लाळ निर्माण करणा-या ग्रंथींना इजा होते ज्यांच्यामुळे खरंतर तोंडाच्या आतील भागाचे इनफेक्शन पासून संरक्षण होत असते.
ओरल कॅन्सरचा काय परिणाम दिसुन येतो.?
ओरल कॅन्सर होण्यासाठी कितीही गोष्टी कारणीभूत असल्या तरी तोंडांतील अस्वच्छतेमुळेच तो होतो हे मात्र नक्की.*
ओरल कॅन्सरमध्ये सुरुवातीच्या काळात तोंडातील आतल्या त्वचेवर फोड येतात किंवा गाठ येते.
ओरल कॅन्सरमुळे दात सैल होतात,दातांचे व हिरडयांचे खुप नुकसान होते.दात जबडयापासून सैल होऊ लागतात.
ओरल कॅन्सरमुळे अन्नपदार्थ चावण्यास त्रास होतो.घास गिळताना वेदना होतात.
कर्करोगाच्या या गाठीमुळे गिळता न आल्यामुळे पुरेसे अन्न खाल्ले जात नाही व त्यामुळे कुपोषण होते.
ओरल कॅन्सरची लक्षणे काय असतात.
हा ओरल कॅन्सर आहे का हे जाणून घेण्यासाठी काही महत्वाची लक्षणे--
१.दोन आठवडयापेक्षा जास्त दिवस तोंडामध्ये फोड येतात किंवा घसा दुखतो.
२.तोंड किंवा मानेवर गाठ येते.
३.घास चावण्यास व गिळण्यास त्रास होतो.
४.गालाची जाडी वाढते.
५.जबडा किंवा चेहरा बधीर होतो.
६.खुप दिवस आवाज घोगरा असतो.
७.तोंडात लाल किंवा पांढरे चट्टे पडतात.
८.जबडा किंवा जीभेची हालचाल करणे कठीण होते.
९.कवळी नीट बसत नाही.
१०.दात सैल होतात.
११.बोलताना त्रास होतो.
१२.तोंडावाटे किंवा ओठातून रक्त येते.
१३.तोंडात गाठीप्रमाणे छोटे फोड येतात.
अशी कोणतीही लक्षणे आढल्यास ताबडतोब तुमच्या डॉक्टर किंवा डेंटिस्टकडे तपासणीसाठी जा.घाबरु नका कारण प्रत्येक वेळी ही लक्षणे आढळल्यास कॅन्सर असेलच असे नाही पण ही कर्करोगाची लक्षणे आहेत तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
ओरल कॅन्सर पासुन बचावण्यासाठी काय कराल.??
काही महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला या आजारापासून दुर ठेऊ शकतात.त्यासाठी या गोष्टींचे जरुर पालन करा.
धुम्रपान व तंबाखुचे सेवन टाळा-
धुम्रपान व तंबाखुच्या सेवन हानिकारक आहे.कारण सिगार,तंबाखु,सिगारेट,पाईप या गोष्टी कर्करोगाला आमत्रंण देतात.दारुमुळे कर्करोगाचा धोका अधिक निर्माण होतो.या गोष्टींचे अतिसेवन करणा-यांना कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते.धुम्रपान व मद्यपानापासून दुर रहा.
जास्त वेळ सुर्यप्रकाशात राहाणे टाळा-
सुर्यप्रकाशांमुळे ओठांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.जो खालच्या ओठाला मोठ्या प्रमाणात झालेला आढळुन येतो.यापासुन स्वत:चे संरक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन लोशन व लीपबाम वापरा.
समतोल आहार घ्या-
सकस व समतोल आहार देखील तुम्हाला तोंडाच्या कर्करोग या आजारापासून दुर ठेवण्यास मदत करतो.
स्वत:ची नियमित तपासणी करा-
स्वत:ची नियमित तपासणी करणे तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरु शकते.
तुम्ही यासाठी स्वत:च स्वत:ची तपीसणी करु शकता.जीभ बाहेर काढा व सर्व बाजूने नीट तपासा.घशामध्ये आवाजात काही बदल जाणवतात का ते बघा.जर जबडयात किंवा मानेत कोणतीही गाठ आढल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डेंंटिस्टकडे नियमित जा-
जरी तुम्ही स्वत:ची नियमित तपासणी करीत असाल तरी देखील कधी कधी तोंडामधील डाग व फोड लहान असल्याने तुम्हाला समजण्यास कठीण जाऊ शकतात तेव्हा त्यासाठी नियमित दंतवैद्याचा सल्ला घ्या.
तुम्ही यासाठी स्वत:च स्वत:ची तपीसणी करु शकता.जीभ बाहेर काढा व सर्व बाजूने नीट तपासा.घश्यामध्ये आवाजात काही बदल जाणवतात का ते बघा.जर जबडयात किंवा मानेत कोणतीही गाठ आढळल्यास त्वरीत डेंंटिस्टचा सल्ला घ्या. जाणून घ्या लहान मुलांचे दात काढल्यानंतर कशी घ्याल काळजी ?
जर तुम्ही स्वत:ची नियमित तपासणी करत असाल तरी देखील कधी कधी तोंडामधील डाग व फोड लहान असल्याने तुम्हाला समजण्यास कठीण जाऊ शकतात तेव्हा त्यासाठी नियमित दंतवैद्याचा सल्ला घ्या.
योग्य वेळी निदान झाले तर तोंडातील कर्करोग पुर्ण बरा करता येऊ शकतो.जर तुम्ही धुम्रपान किंवा मद्यपानासारख्या वाईट सवयींचे बळी पडला असाल तर या लक्षणांना अजिबात दुर्लक्ष करू नये.
मुख आरोग्य आणि मुखकर्करोग(Oral Cancer)य़ांचा परस्पर घनिष्ट संबध- डॉ.पांडुरंग श्रीरामे (दंतरोग तज्ञ) दात नियमित स्वच्छ न के....