13/03/2026
श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सर्जिकल मायक्रोस्कोपचे उद्घाटन
श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियांसाठी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सर्जिकल ऑपरेटिंग मायक्रोस्कोपचे उद्घाटन गुरुवार, दिनांक 12 मार्च 2026 रोजी संपन्न झाले.
या अत्याधुनिक उपकरणाचे उद्घाटन मा. डॉ. संजीव सोनवणे (कुलगुरू, YCMOU नाशिक तसेच प्रभारी कुलगुरू, MUHS) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. शेखर चिरमाडे, सौ. नीलम नरेश पाटील (नगरसेविका), डॉ. अनिल जाधव, डॉ. सुमित हिरे हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ऐश्वर्या धर्माधिकारी यांनी केले. या प्रसंगी बोलताना डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी सांगितले की, ऑपरेटिंग मायक्रोस्कोपच्या सहाय्याने मेंदू, मणके व कानाची मायक्रोसर्जरी अधिक अचूक, सुरक्षित आणि परिणामकारक पद्धतीने करता येते. त्यामुळे रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर — डॉ. पल्लवी धर्माधिकारी, डॉ. राहुल नाईक, डॉ. अजिंक्य देसले, डॉ. सचिन पाटील, डॉ. दुर्गेश ठाकूर, डॉ. गौरव गुजराती, डॉ. अमेय पाटील, डॉ. कुणाल निकम, डॉ. सौरव बोरगावकर, डॉ. गणेश मोटवानी डॉ. स्वप्नांजली आव्हाड — उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. पल्लवी धर्माधिकारी यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, भविष्यातही अशा आधुनिक व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा समावेश करून रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवा देण्याचा श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा नेहमीच प्रयत्न राहील.