Dr Mahesh Mangulkar - MBBS, MD Medicine, DNB Gastro

Dr Mahesh Mangulkar - MBBS, MD Medicine, DNB Gastro Complete health care solutions under one roof for Liver, Gastro and pancreatic diseases with advanced training in various procedures.

19th May …..Wort IBD dayEat healthy stay healthy
06/06/2025

19th May …..Wort IBD day
Eat healthy stay healthy

We're upgrading our space and our services to bring you better Liver, Digestive & Nutrition Care
01/03/2025

We're upgrading our space and our services to bring you better
Liver, Digestive & Nutrition Care

Big Announcement 📢 Big changes for your well being are on the way...
28/02/2025

Big Announcement 📢
Big changes for your well being are on the way...

HAPPY MAHASHIVRATRI ☘️
26/02/2025

HAPPY MAHASHIVRATRI ☘️

08/05/2024

आजकाल अनेक लोकांना यकृत आणि पोटाशी संबंधित आजारांनी पछाडलेले आहे. चुकीची जीवनपध्दती, (Lifestyle) सकस आहाराचा अभाव, व्यसन, व्यायामाचा अभाव, फास्ट फूडचा अतिरेक आदी विविध कारणांमुळे पोटाच्या विकारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्याच सोबत चुकीच्या सवयींमुळे यकृतावर ताण निर्माण होउन ते अकार्यक्षम होण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत.
अति मद्यपान केल्याने यकृत खराब होण्याचा धोका वाढतो. हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का? की लठ्ठपणा आणि टाइप-2 मधुमेहामुळेही यकृताचे नुकसान होऊ शकते? होय, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजमुळे अल्कोहोलचे सेवन न करताही तुमच्या यकृत संबधित समस्या निर्माण होऊ शकतात.

परंतु अशात जर यकृतामध्ये इन्फेक्शन/डिकॉम्पेनसशन आढळल्यास त्यावर उपचार करणे अत्यंत कठीण असते. अशा वेळी यकृत प्रत्यारोपणाशिवाय (liver transplants) पर्याय नसतो. दरम्यान, यकृत निकामी झाल्यावर ते बदलण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो व शस्त्रक्रियेव्दारे ते बदलले जाते. यासाठी यकृतदाता(डोनर) शोधने आवश्‍यक असते. यकृतदाता(डोनर) जीवंतपणी (living donor) अथवा ब्रेन डेड (deceased donor) असू शकतात. अशा वेळी यकृताची आवश्‍यकता असलेल्यांना यकृत दान केले जात असते.

महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक आणि नागपूर या शहरांमध्ये दोन्ही पद्धतीचे लिव्हर ट्रान्सप्लांट केल्या जाते
एकदा डोनर ठरला कि त्याची कंपॅटीबिली साठी विविध टेस्ट केल्या जातात. बऱ्याच केसेस मध्ये इच्छा असून हि लिव्हर मिसमॅच झाल्या मुळे डोनेट करता येत नाही. रेसिपीएंट आणि डोनर फिक्स झाल्यानंतर शासनाने नेमलेल्या समितीकडे (ZTCC) संमतीसाठी अर्ज करावा लागतो. या मंजुरी नंतर डॉक्टरांना प्रत्यक्ष ऑपेरेशन ची परवानगी मिळते. ऑपेरेशन नंतर साधारण ७ दिवसांमध्ये डोनरचा तर रेसिपीएंट पेशंट चा २ आत्ते ३ आठवड्यात डिस्चार्ज होतो

सरासरी, यकृत प्रत्यारोपण प्राप्त करणारे बहुतेक लोक 10 वर्षांपेक्षा जास्त जगतात. प्रत्यारोपणानंतर बरेच लोक 20 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगू शकतात.
एका अभ्यासानुसार प्रत्यारोपण झालेले 90% लोक किमान 1 वर्ष जगतात आणि 70% लोक प्रत्यारोपणानंतर किमान 5 वर्षे जगू शकतात.
यकृत प्रत्यारोपण न करणाऱ्यांच्या तुलनेत जीवनाची चांगली गुणवत्ता, शालेय शिक्षण आणि नोकऱ्या पुन्हा सुरू करणे आणि हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण कमी होणे असे फायदे दिसतात .
यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ‘फेल’ होण्याचीही शक्यता असते. परंतु आताच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट फेल्यूर चे प्रमाण कमी होत आहे.

Complete health care solutions under one roof for Liver, Gastro and pancreatic diseases with advanced training in various procedures.

30/05/2023

अल्सरेटिव्ह कोलायटिस समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये काही बिघाड होऊ लागतो. साधारणपणे आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला रोगांपासून वाचवते, परंतु जेव्हा हा रोग होतो तेव्हा रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य बिघडते. या आजारानंतर आपले संरक्षण करणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशी आतड्यांवर हल्ला करतात आणि त्यामुळे अल्सर होतात. कधीकधी ही समस्या कौटुंबिक इतिहासामुळे असू शकते. हा मोठ्या आतड्याचा आजार आहे. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी असा समज होता की, अल्सरेटिव्ह कोलायटिस हा आजार फक्त पाश्चात्त्य देशांतील लोकांनाच होऊ शकतो. भारतात हा आजार होऊ शकत नाही. परंतु मागील काही वर्षांपासून हा समज खोटा ठरू लागला आहे. भारतातसुद्धा हा आजार जोमाने पसरत चालला आहे.
मोठ्या आतड्याचे कार्य काय?
मोठ्या आतड्याचे मुख्य कार्य म्हणजे आतड्याच्या मलातील पाणी शोषून त्याला घट्ट करणे. पूर्ण मल एकत्र करणे (जोपर्यंत शौचाला जाण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत)
अल्सरेटिव्ह कोलायटिसचा मोठ्या आतड्याच्या कार्यावर काय परिणाम होतो?
अल्सरेटिव्ह कोलायटिसचा आजार सुरू झाल्यावर आतड्यातील मलामधून पाणी शोषण करण्यावर परिणाम होतो. आतड्यात मल जमा करून ठेवण्यावरसुद्धा परिणाम होतो. त्यामुळे रुग्णाला अगदी लवकर शौचाला जावे लागते.
हा आजार संपूर्ण मोठ्या आतड्याला होतो का?
होऊ शकतो. डाव्या बाजूच्या मोठ्या आतड्यात आजार झाल्यास त्याला डाव्या बाजूकडील कोलायटिस म्हणतात. संपूर्ण मोठ्या आतड्यात झाल्यास त्याला पॅन - कोलायटिस म्हणतात.
हा सर्वसामान्य आजार आहे का?
तसा हा आजार सामान्य आजार म्हणता येणार नाही. यातील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या आजाराचे अधिकतम रुग्ण 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात.
लक्षणे -पातळ शौच होणे, पोट पूर्ण साफ न होणे, शौचाद्वारे रक्त - आव जाणे, पोटात दुखणे, काळ्या रंगाची शौच होणे, रक्त
कमतरतेमुळे अशक्तपणा येणे, धाप लागणे, थकवा येणे, भूक न लागणे, पायावर चेहºयावर सूज येणे. या आजाराचे मुख्य लक्षण - रुग्ण एकदम ठीक असतो तर कधी आजाराची तीव्रता वाढते.
उपचार
रुग्णांची मोठ्या आतड्यात दुर्बीण टाकून तपासणी करावी लागते. शिवाय बायोप्सीद्वारेही कॅन्सरचे निदान करता येते. या आजारावर खूप चांगली औषधे उपलब्ध आहेत. हा रोग टाळण्यासाठी, आपण योग्य वेळी डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्या

Complete health care solutions under one roof for Liver, Gastro and pancreatic diseases with advanced training in various procedures.

World Liver DayRed FM interview
19/04/2023

World Liver Day
Red FM interview

फैटी लिव्हर - एक समस्या
19/04/2023

फैटी लिव्हर - एक समस्या

Address

Kaushalya Liver Gastro And Nutrition Clinic, 601, Sixth Floor, One Gangapur Apartment, Above Reliance Digital, Jehan Cicle
Nashik
422005

Opening Hours

Monday 8:30am - 3:30pm
Tuesday 8:30am - 3:30pm
Wednesday 8:30am - 3:30pm
Thursday 8:30am - 3:30pm
Friday 8:30am - 3:30pm
Saturday 8:30am - 3:30pm

Telephone

+918087537224

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Mahesh Mangulkar - MBBS, MD Medicine, DNB Gastro posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Mahesh Mangulkar - MBBS, MD Medicine, DNB Gastro:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram