23/08/2023
बी बी एन जी
तर्फे *फ्री डेंटल चेकअप कॅम्प*
खरंतर, शरीराच्या फूड प्रोसेसिंग फॅक्टरीची, दात ही स्टेज अगदी *पहिली* ...
पण या दाताकडे आपण लक्ष देतो सगळ्यात *शेवटी*... दुखायला लागल्यावर किंवा काही त्रास उद्भवल्यावर!!
आपण हृदयाची तपासणी रेगुलरली करतो , रक्ताची करतो... तशीच दाताची देखील केली पाहिजे ना!
हीच संधी बीबीएनजी आपल्यासाठी घेऊन येत आहे👍👍
बालदंतचिकित्सक डॉ स्वाती करकरे आणि दंतचिकित्सक डॉ मृण्मयी रानडे
यांनी एकत्रित रित्या बीबीएनजी साठी फ्री डेंटल चेकअप कॅम्प ठेवलेला आहे👏👏
डॉ स्वाती करकरे या लहान मुलांसाठी ( वय. एक ते सोळा. ) डेंटल चेकअप कॅम्प घेणार आहेत.
*चाईल्ड स्माईल केअर*,
जुना गंगापूर नाका,
*गंगापूर रोड*
या ठिकाणी- शनिवार 26/08/2023
सकाळी 11 ते 1
या वेळेत फ्री चेकअप होणार आहे
तर
डॉ मृण्मयी रानडे यांचा डेंटल चेकअप कॅम्प,
रविवार, सोमवार, मंगळवार, (27, 28, 29 ऑगस्ट)
या दिवशी
*डेंटक्युअर डेंटल क्लिनिक, मुरकुटे लेन १, पंडित कॉलनी, गंगापूर रोड*
येथे होणार आहे.
सदर डेंटल चेकअप कॅम्प फ्री असला, तरी येथील विजिट *फक्त पूर्व नोंदणी द्वारेच*
आपली नोंदणी करण्यासाठी खालील प्रमाणे क्रमांक आहेत
1
लहान मुलांचे डेंटल चेकअप
फोन..0253-2578768
आणि सोळा वर्षावरील सर्व व्यक्तींचे फ्री डेंटल चेकअप साठी
फोन... 91-7558338529 , 0253-4059079
कृपया या संधीचा अवश्य लाभ घ्यावा आणि अधिकाधिक संख्येने आपल्या दातांचे आरोग्य तपासून घ्यावे🙏🙏
भविष्यात दातासंबंधी काही दोष होणार असतील, तर ते आजच कळतील... उद्याच्या उपचाराचा खर्चही वाचेल... आणि महत्त्वाचं म्हणजे "अतिशय मोलाचा *दात* वाचेल"
या सगळ्यासाठी *कोणताही खर्च नाही* फक्त अपॉइंटमेंट घेणे आणि भेट देणे इतकेच करायचे आहे👍👍
टीम
*बी बी एन जी* नाशिक