Vishwa Vardhaman Ayurved & Panchakarma Clinic

Vishwa Vardhaman Ayurved & Panchakarma Clinic Vishwa Vardhaman Ayurved & Panchakarma clinic is established at 22nd August 2016, founded by Dr. Parag patani & Dr. Sonal patani.

Vishwa Vardhaman Ayurved & Panchakarma Clinic is ONE STOP solution to all you health problems.Our main aim is to provide excellent healthcare service / treatment to patients so as to help them to get rid of the problems which they are suffering from....!! Dr. Parag has completed graduation as well as post graduation from Rajiv gandhi university of health sciences, Banglore. Along with that he also

obtained DYA (Diploma in Yoga & Ayurved) from Tilak university pune. Dr. Sonal has completed graduation from Maharashtra University of Health Sciences, Nashik. We provides classical Ayurvedic & Panchakarma therapy based on the assessment of the patient by various means such as NAADI PARIKSHA, SHARIRIK PARIKSHA, MANASIK PARIKSHA etc....

Suvarnaprashan drops available at our clinic..... call 9767906676 / 7028333443 for more details.                        ...
27/06/2025

Suvarnaprashan drops available at our clinic..... call 9767906676 / 7028333443 for more details.

आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर - बस्ति पंचकर्म उपचार(वाताचे आजारासाठी आणि निरोगी राहण्यासाठी)आयुर्वेदाप्रमाणे वर्षाऋतु (June-J...
28/05/2025

आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर -

बस्ति पंचकर्म उपचार
(वाताचे आजारासाठी आणि निरोगी राहण्यासाठी)

आयुर्वेदाप्रमाणे वर्षाऋतु (June-July- August September) मध्ये शरीरातील वात दोषाची विकृती (वाढ) होत असते आणि आपल्या पचन शक्तीवर ही ताण येत असतो व ह्याचा परिणाम म्हणून आरोग्य बिघडू लागते. ह्या वातदोषामुळे शरीरामध्ये सांध्याचे किंवा मणक्याचे विकार, पोटाचे विकार, स्त्रिच्या पाळी संबंधी विकार इ. अनेक विकार उत्पन्न होऊ लागतात. ह्या वातदोषाला नियंत्रीत ठेवण्यासाठी आयुर्वेद मधील अभ्यंग-स्वेद (मालीश वाफारा) व बस्ति चिकित्सा (तेल व काढ्याचा एनिमा) हा पंचकर्म अत्यंत उपयोगी व फलदायी आहे. एवढेच नव्हे तर निरोगी माणसांनी देखील आपले स्वास्थ्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने या उपक्रमांचा अवलंब करणे गरजेचे आहे तर ह्याचा लाभ सर्वांनी करून घ्यावा.
नमुद पंचकर्म उपचार शिबिराच्या काळात (June-July-August-September) 20 % सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. ह्याची नोंद घ्यावी.

बस्ति पंचकर्म उपचार खालील आजारावर उपयोगी -

* संधिवात • गुडघेदुखी • कंबरदुखी • स्पॉडीलायटिस • पॅरालिसीस • पाठीच्या मणक्यात गॅप असणे • सायटिका • हातापायाला मुंग्या येणे • मणक्यात नस दबणे • वंध्यत्व • सर्व त्वचाविकार • सोरियासीस पोटाचे विकार • लठ्ठपणा • स्त्रियांचे पाळीचे विकार • जुनाट मलब्धदता • किडनी विकार • मुतखडा• उंची वाढवणे

डॉ सोनल पटणी 7028333443
डॉ पराग पटणी 9767906676
विश्ववर्धमान आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक
पहिला मजला, सिल्वर पॉईंट, माही डिझाईनर शॉपच्या वर, कुलकर्णी गार्डन समोर, शरणपूर रोड, नाशिक.





******** अच्छी आवाज के लिये घरेलु उपाय ********अच्छी आवाज हमारे व्यक्तित्व का एक अहम हिस्सा होती है। संचार के इस दौर में...
23/05/2025

******** अच्छी आवाज के लिये घरेलु उपाय ********

अच्छी आवाज हमारे व्यक्तित्व का एक अहम हिस्सा होती है। संचार के इस दौर में अच्छी आवाज सभी के लिए जरूरी है। आवाज को सदा जवां रखने के लिए उसकी देखभाल करना बहुत जरूरी है। खासकर व्यावसायिक दृष्टि से अपनी आवाज का इस्तमाल करने वालों को इस बात का खास ध्यान रखना चाहिए।

जो आवाज के प्रोफेशन से जुड़े हुए हैं और जो आवाज को अपना रोजगार बनाने की चाह रखते हैं, वे इन बातों पर अमल करें-

** खान-पान -

• खान-पान पर नियंत्रण रखें। गलत दिनचर्या एवं खान-पान की वजह से पेट का अम्ल गले में आने (रिप्लक्स) की शिकायत हो सकती है, जो गले के अंदर के स्राव को परिवर्तित करने के साथ स्वर यंत्र की हल्की सूजन का कारण भी हो
सकती है। रिप्लक्स के मरीजों को गले में कुछ अटकना, बार-बार गला साफ करना, लंबी मियाद की खाँसी, जीभ पर जमाव, बार-बार ब्रोंकाइटिस जैसी शिकायतें हो सकती हैं।

• जिन लोगों की आवाज ही व्यवसाय है, उन्हें सादा भोजन करना चाहिए और अधिक मिर्च-मसाले, तेलयुक्त खाना, अधिक चाय, कॉफी, शीतल पेय एवं शराब नहीं पीना चाहिए। साथ ही चॉकलेट, सूखे फल आदि भोजन के पहले नहीं लेना चाहिए।

• पान, पान मसाला, तंबाकू, गुटखा आदि न खाएं।

** श्वास -

• सामान्य रूप से श्वास लेना अच्छी आवाज के लिए जरूरी होता है, क्योंकि नाक में श्वास छनती है, गरम होती है एवं इसे उपयुक्त नमी मिलती है। नाक बंद रहने या साइनस की तकलीफ होने पर डॉक्टर को जरूर दिखाएं।

• ठंडी एवं गरम हवा दोनों ही नाक एवं गले को प्रभावित करती है, और आवाज ठीक से नहीं निकलती, साथ ही खाँसी की भी शिकायत हो सकती है। इसलिए इससे बचे।

• साथ ही मुंह से श्वास सांस लेना, तेज पंखे के सीधे नीचे या सामने सोना भी ठीक नहीं होता।

• वातानुकूलित वातावरण में रहना अच्छी आवाज के लिए फायदेमंद होता है। ठंडे वातावरण से गरम वातावरण में कुछ समय रुककर जाएँ।

** अन्य सावधानियाँ -

• धूल एवं धूलयुक्त वातावरण से बचें।

• धूम्रपान न करें।

• तेज सर्दी, एक्यूट एलर्जी, नाक-गले के संक्रमण के दौरान गायन कार्यक्रम न दें।

• नाक की एलर्जी से ग्रसित लोग धूल, धुएँ, माइट्स, फफूँद आदि एलर्जन्स से बचने की कोशिश करें।

• अधिक मेकअप, बालों के या अन्य प्रकार के स्प्रे बहुत साधवानी से एवं कम उपयोग करें।

• शारीरिक एवं मानसिक दोनों ही तनाव आवाज को दुष्प्रभावित करते हैं। इसलिए पूरी नींद एवं आराम जरूर करें।

• गायन, भजन, भाषन या बातचीत के दौरान गला न सूखने दें। बीच-बीच में पानी के घूंट पिएँ। हल्का, गुनगुना, शहदयुक्त पानी कार्यक्रम के दौरान निरंतर पीते रहें।

• लगातार 45 मिनट से ज्यादा ना बोले।

• गायकों या व्यावसायिक आवाज प्रयोग करने वालों को भी भीड़ भरी, शोरगुल वाली पार्टियों से बचना चाहिए, क्योंकि ऐसी जगहों पर जोर-जोर से बात करनी पड़ती है, जिससे स्वर यंत्र पर तनाव आता है।

• बार-बार गला साफ करने की आदत न डालें, उपयुक्त इलाज करवाएं।

• जोर-जोर से बोलने, चीखने-चिल्लाने एवं तनावपूर्ण ढंग से आवाज निकालने से बचें।

भोजन करने का सही तरीका अपनाएँ और हमेशा स्वस्थ रहें...!!●उष्ण अर्थात गरम आहार का सेवन करें●स्निग्ध आहार का सेवन करें●मात्...
21/05/2025

भोजन करने का सही तरीका अपनाएँ और हमेशा स्वस्थ रहें...!!

●उष्ण अर्थात गरम आहार का सेवन करें
●स्निग्ध आहार का सेवन करें
●मात्रा पूर्वक आहार लें
●जीर्ण होने पर यानि पहले का खाया हुआ पूरी तरह पचने के पश्चात ही भोजन करें
●वीर्य विरुद्ध, कार्य विरुद्ध भोजन न करें।
उदाहरण: पका हुआ तथा कच्चा भोजन एक साथ लेना वीर्य विरुद्ध भोजन है।
●मन के अनुकूल स्थान तथा मन के अनुकूल सामग्री का सेवन करें।
जैसे किसी स्थान पर अत्यधिक गर्मी/सर्दी लग रही हो या अधिक गीला हो तो वह स्थान मन के अनुकूल नहीं है।
●अति शीघ्रता तथा अत्यधिक धीरे-धीरे भोजन ना करें।
●बातें ना करते हुए तथा ना हँसते हुए यानि शांत रहकर तथा भोजन में पूरा मन लगाकर भोजन करें।
(आजकल के समय में टी वी ना देखते हुए भोजन करने का नियम भी इसी श्रेणी में आएगा )

Hello everyone, you can now follow our clinic page on Instagram for more updates.... stay healthy, stay fit🙏💐
15/05/2025

Hello everyone, you can now follow our clinic page on Instagram for more updates.... stay healthy, stay fit🙏💐

0 Followers, 0 Following, 3 Posts - See Instagram photos and videos from Vishwa Vardhaman Ayurved & Panchakarma Clinic ()

09/05/2025

तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही कितीही खाल्लं तरी वजन वाढू शकत नाहीये ?? जर तुम्ही हे वाचत असाल तर तुम्हीही अशाच लोकांपैकी एक असण्याची शक्यता आहे.
कमी वजन असणे हे जास्त वजन असण्याइतकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक आव्हानात्मक आहे आणि त्यामुळे कमकुवत रोगप्रतिकारक्षमता (Low Immunity) पासून ते अशक्तपणापर्यंतच्या समस्या उद्भवू शकतात. कालांतराने ह्या गोष्टी अनेक आजारांना आपल्या शरीरात आमंत्रण देतात.ह्या झाल्या आरोग्य विषयक गोष्टी पण त्याबरोबरच दुसरी महत्वाची बाजू म्हणजे सामाजिक गोष्टी. कमी वजनामुळे अनेकांना स्वतःमध्ये न्युनगंड जाणवतो, ज्यामुळे ते चारचौघात जाणे टाळतात.
पण काळजी करू नका, कारण आयुर्वेदात असे काही उपचार आहेत जे तुम्हाला निरोगी मार्गाने वजन वाढवण्यास मदत करू शकतात.
वजन वाढणे ही एक हळूहळू होणारी प्रक्रिया आहे ज्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक आहे. योग्य दृष्टिकोनाने, निरोगी वजन वाढवणे आणि एकूणच आरोग्य सुधारणे शक्य आहे.
आपल्या विश्ववर्धमान आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिकमध्ये आम्ही प्रत्येक रूग्णाच्या प्रकृतीनुसार आयुर्वेदिक औषधी व पंचकर्म यांच्या सहाय्याने अनेक रुग्णांचे वजन यशस्वीपणे दरमहा 3 ते 5 किलोने वाढवले आहे.

चला तर मग आजच संपर्क करा -
डॉ सोनल पटणी B.A.M.S.
डॉ पराग पटणी M.D.(Ayu)
विश्ववर्धमान आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक
माही शॉपच्यावर, कुलकर्णी गार्डन समोर, शरणपूर रोड, नाशिक - 02
9767906676, 7028333443

Vishwa Vardhaman Ayurved & Panchakarma Clinic is ONE STOP solution to all you health problems.Our main aim is to provide excellent healthcare service / treatment to patients so as to help them to get rid of the problems which they are suffering from....!!

आरोग्य संदेश - *19 एप्रिल* 2025*मी यकृत लिव्हर Liver*.....आज माझा दिवस...  ``````World Liver Day``````माझं *मनोगत* सांगत...
19/04/2025

आरोग्य संदेश -
*19 एप्रिल* 2025

*मी यकृत लिव्हर Liver*.....

आज माझा दिवस...
``````World Liver Day``````

माझं *मनोगत* सांगतोय... नीट वाचा हं...

एखाद्या ~biochemistry~ *लॅब* सारखं माझं शरीरातलं काम चालू असतं... तुम्ही शरीरात काहीही ढकललं तरी मला त्याच्यावर काम कराव लागतं... ते काम माझ्यातून पाझरणारा स्त्राव... ज्याला पित्त म्हणतात ते पाचक पित्त.. त्या ढकललेल्या घटकावर काम करून त्याला शरीररुपी योग्य असं बनवने.....
म्हणजे मी पहिला दरवाजा असतो पचनसंस्थेचा बरं का...

चुकीच्या वेळी जेवण, पुन्हा पुन्हा खाणं, मसालेदार,🔥 चमचमीत, झणझणीत मद्यपान, धूम्रपान अशा चुकीच्या सवयींमुळे माझ्यावर ताण निर्माण होतो. तुम्ही असा ताण दिला की मी तो काही काळ सहन करतो पण नंतर सहन होत नाही आणि मग ते खाल्लेले नीट पचत नाही मग वेगवेगळे आजार सुरू होतात.
मग अपचनाची लक्षणं दिसायला लागतात... आंबट करपट ढेकर येतात, पोट गच्च होतं, फुगलेल् वाटतं, मळमळतं, अस्वस्थ वाटतं, पोट साफ होत नाही...
तेवढ्यापुरती तेवढे तुम्ही उपचार करतात आणि एक दोन महिन्यांनी पुन्हा🔄 असंच होतं.. कारण मी पूर्ण रिपेअर झालेला नसतो ना... मग कसं काय माझं काम व्यवस्थित होईल...

योग्य वेळेला जेवण, शुद्ध सात्विक आहार, चांगलं वातावरण, चांगलं काम परिश्रम असं काही केलं आणि त्याला जोडी आयुर्वेदिक औषध मला फार लागू पडतात... हे जर काही तुम्ही केलं तर मी ठणठणीत बरा होतो आणि पचनाचा पहिला दरवाजा माझा व्यवस्थित चालू ठेवतो मी...
*माझ्यावर आयुर्वेदिक औषधे फार चांगली पद्धतीने काम करतात* आणि माझ्या पेशी पुन्हा नवीन निर्माण व्हायला मदत होते. माझ्या मोठ्या मोठ्या आजारांमध्ये आयुर्वेदाची लहान लहान औषधांची पुडी उत्तम काम करते.

पण तुम्ही माझ्याकडे लक्ष दिले नाही तर माझ्याकडे फार मोठी यादी आहे सांगू का.. बघा बरं...

*कावीळ* jaundice
अल्सर ulcer 🟡
*हिपॅटायटीस* hepatitis
पोटात पाणी होणं cirrhosis
फॅटी लीवर fatty liver 🟤
*मधुमेह diabetes*
यूरिक ऍसिड uric acid
*कोलेस्टेरॉल cholesterol* ⚫
चरबी चे सगळे प्रकार
ही अशी माझ्या आजाराची यादी वाढतच जाईल. काहिंची आवडती दारू आणि सगळ्यांच्या आवडत्या ॲलोपॅथीच्या गोळ्या मला फारच त्रास देतात... नको नको करून सोडतात मला... आख्या माझ्या शरीराची रवरव होते... फारच दुर्गंध😷 होतो बघा माझ्या शरीराचा...🤦🏻‍♂️

तेव्हा काळजी घ्या.. व्यवस्थितपणे आहार विहार करा आणि मला वाचवा तर मग मी तुम्हाला पण वाचवेल...!!

14/01/2025

मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परीवारास हार्दिक शुभेच्छा🙏🙏

*मकर संक्रांतीला तिळ-गुळाचे लाडु खाण्यामागचे आयुर्वेदिक महत्त्व* -

मकर संक्रांतीला उत्तरायणाला प्रारंभ होत असतो.म्हणजेच शिशिर ऋतुची सुरुवात झालेली असते.
या काळात वातावरणातील उष्णता कमी होऊन थंडपणा आणि रुक्षता वाढलेली असते. म्हणजे शरिरातील वात दोष वाढतो आणि परिणामस्वरूपी त्वचा कोरडी होणे, केस निस्तेज होणे, सांधेदुखी, सर्दी- खोकला, मलबद्धता अशा प्रकारचे त्रास सुरू होतात.
अशाप्रकारचे त्रास होऊ नये म्हणून या काळात आरोग्यासाठी तिळाचा वापर अत्यंत फायदेशीर आहे.
आयुर्वेदानुसार तीळ हे स्निग्ध, उष्ण गुणाचे असतात त्यामुळे ते या ऋतुत वाढणारी शीतलता आणि रुक्षता कमी करून वाताचे शमन करतात जे या ऋतुमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे.

मकर संक्रांतीला तिळ व गुळाचे लाडु, चिक्की बनविण्याची आणि नात्यातील स्नेह, गोडवा वाढविण्यासाठी एकमेकांना देण्याची परंपरा आहे. त्यानिमित्ताने तिळाचे सेवन केले जाते जे अत्यंत आरोग्यदायी आहे.

शिशिर ऋतुमध्ये तीळाच्या तेलाने अभ्यंग करण्याने त्वचेचा कोरडेपणा नाहिसा होतो. त्वचेची कांती सुधारते आणि त्वचा सुकुमार होते.

शिशिर ऋतुमध्ये दररोज १ चमचा तीळ खाण्याने केसांचे आरोग्य सुधारते, तीळाच्या सेवनाने शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊन थंडीची जाणीव कमी होते परिणामस्वरूप थंडीमुळे होणारे सांधेदुखी, सर्दी-खोकला, त्वचाविकार, दंत विकार कमी होतात.

हिवाळ्यात दररोज १ तिळाचा लाडु खाण्याने शारिरीक बळ वाढते, पचनशक्ती सुधारते आणि भुक चांगली लागते.

तिळा मध्ये Vit.B, Iron, Copper, Magnesium, Phosphorus, Zink, Calcium असे महत्वपूर्ण घटक असल्यामुळे तिळाच्या सेवनाने सांधे मजबूत होतात, रक्त वाढण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे मेंदू, ह्रदय आणि किडनी अशा शरिरातील अतिमहत्त्वाच्या अवयवांसाठी देखील फायदेशीर असते..!

🙏🙏
डॉ सोनल पटणी 7028333443
डॉ पराग पटणी 9767906676
विश्ववर्धमान आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक
पहिला मजला, सिल्वर पॉईंट, माही डिझाईनर शॉपच्या वर, कुलकर्णी गार्डन समोर, शरणपूर रोड, नाशिक.

29/10/2024
आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर - बस्ति पंचकर्म उपचार(वाताचे आजारासाठी आणि निरोगी राहण्यासाठी)आयुर्वेदाप्रमाणे वर्षाऋतु (June-J...
22/08/2024

आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर -

बस्ति पंचकर्म उपचार
(वाताचे आजारासाठी आणि निरोगी राहण्यासाठी)

आयुर्वेदाप्रमाणे वर्षाऋतु (June-July- August September) मध्ये शरीरातील वात दोषाची विकृती (वाढ) होत असते आणि आपल्या पचन शक्तीवर ही ताण येत असतो व ह्याचा परिणाम म्हणून आरोग्य बिघडू लागते. ह्या वातदोषामुळे शरीरामध्ये सांध्याचे किंवा मणक्याचे विकार, पोटाचे विकार, स्त्रिच्या पाळी संबंधी विकार इ. अनेक विकार उत्पन्न होऊ लागतात. ह्या वातदोषाला नियंत्रीत ठेवण्यासाठी आयुर्वेद मधील अभ्यंग-स्वेद (मालीश वाफारा) व बस्ति चिकित्सा (तेल व काढ्याचा एनिमा) हा पंचकर्म अत्यंत उपयोगी व फलदायी आहे. एवढेच नव्हे तर निरोगी माणसांनी देखील आपले स्वास्थ्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने या उपक्रमांचा अवलंब करणे गरजेचे आहे तर ह्याचा लाभ सर्वांनी करून घ्यावा.
नमुद पंचकर्म उपचार शिबिराच्या काळात (June-July-August-September) सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. ह्याची नोंद घ्यावी.

बस्ति पंचकर्म उपचार खालील आजारावर उपयोगी -

* संधिवात • गुडघेदुखी • कंबरदुखी • स्पॉडीलायटिस • पॅरालिसीस • पाठीच्या मणक्यात गॅप असणे • सायटिका • हातापायाला मुंग्या येणे • मणक्यात नस दबणे • वंध्यत्व • सर्व त्वचाविकार • सोरियासीस पोटाचे विकार • लठ्ठपणा • स्त्रियांचे पाळीचे विकार • जुनाट मलब्धदता • किडनी विकार • मुतखडा• उंची वाढवणे

डॉ सोनल पटणी 7028333443
डॉ पराग पटणी 9767906676
विश्ववर्धमान आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक
पहिला मजला, सिल्वर पॉईंट, माही डिझाईनर शॉपच्या वर, कुलकर्णी गार्डन समोर, शरणपूर रोड, नाशिक.

Address

Nashik

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+919767906676

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwa Vardhaman Ayurved & Panchakarma Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vishwa Vardhaman Ayurved & Panchakarma Clinic:

Share