
05/12/2022
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🙏🙏
महाराज म्हणतात "आपल्या देहाला होणारे रोग व मनाला होणारे दुखः हे आपल्याच कर्माचे फळ असते पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्याने आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो् आयुष्यातील सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात ,आपल्यावर येणाऱ्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात त्या भगवंताच्या नसतात, संताना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते पण ते देहाला विसरलेले असल्याने देहाचे भोग भोगणे आणि न भोगणे या दोन्हीची त्यांना फिकीर नसते म्हणून ते भोग टाळीत नाहीत. महाभारताचे युद्ध संपल्यावर कृष्ण पांडवांचा निरोप घ्यायला येतो व प्रत्येकाला हवे ते वरदान मागायला सांगतो सर्वांचे मागून झाल्यावर कृष्णाने कुंतीला काय हवे ते विचारल्यावर कुंती म्हणाली " भगवंता प्रारब्धाने आलेल्या दुखाचा दोष तुझ्याकडे नाही,पण जर त्या दुःखात मला सारखी तुझी आठवण येवून तुझे अनुसंधान टिकत असेल, तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेव " असे म्हणून कुंतीने तिला देवाची आठवण सतत व्हावी; म्हणून देवाकडे केवळ दुःखच मागितले होते. सर्व सामान्य माणसाची एक प्रवृत्ती असते कि जेव्हा आपण दुखःद स्थितीत असतो तेव्हा तळमळीने व आर्ततेने देवाची प्रार्थना करतो याउलट सुखाच्या व आनंदाच्या स्थितीत आपल्याला देवाचा विसर पडतो ,म्हणून सुखात अनावधानाने देवाचा विसर पडू नये म्हणून कुंतीने देवाकडे असीम दुखः मागितले होते आपली योग्यता तशी नाही हे खरे, म्हणून आपण भगवंताला अशी प्रार्थना करावी की, "भगवंता प्रारब्धाने आलेले भोग येवू देत पण त्यामध्ये तुझा विसर कधीही पडू देवू नकोस" .आणि काहीही करून भगवंताच्या अनुसंधानात राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा.