
23/02/2023
आधीच्या यशस्वी हॉटेल व्यवसायाचा अनुभव त्यांच्या गाठीशी होताच , अजून एक नवीन रेस्टॉरंट चालू करायचे म्हणून त्यांचा फोन आला.
अर्थात आधीच्या हॉटेल ला सुद्धा कन्सल्टन्ट म्हणून मीच काम केले होते. आणि अगदी मी सांगितल्या प्रमाणे माझा सल्ला मानून त्यांनी यशस्वी हॉटेल व्यवसाय उभारला.
आता दोन अडीच वर्षांनी नविन कल्पना त्यांच्या डोक्यात आली. आणि अर्थातच माझ्या बरोबर चा आधीचा उत्तम कामाचा अनुभव गाठीशी असल्याने पुन्हा एकदा त्यांनी मलाच संपर्क केला.
या वेळेला
साऊथ इंडियन पदार्थांचे हॉटेल सुरु करायची कल्पना त्यांच्या मनात आली.
मी फक्त स्पेशालिटी मेनू साठी कन्सल्टिंग करत असल्यामुळे त्यांना खात्री होती कि आधीच्या मराठी स्पेशालिटी हॉटेल प्रमाणेच या नवीन हॉटेल साठी देखील मी त्यांना कन्सल्टिंग देऊ शकतो.
मग डिटेल मध्ये चर्चा झाली.
नंतर
काही विशिष्ठ खाद्य पदार्थ चाखून बघण्यासाठी अगदी बेंगलोर वारी देखील झाली.
मग प्रत्यक्ष कमला सुरुवात झाली सगळ्यात शेवटचा टप्पा होता रेसिपि ट्रेनिंग आणि ट्रायल्स चा.
आणि सरतेशेवटी अगदी जसा मनात होता तसाच खास असा मेनू तयार झाला,
फूड टेस्टिंग चा दिवस आला
आणि
खाद्य भ्रमंती करणाऱ्या जाणकारांनी अनेकानेक पसंतीची मोहोर उमटवली.
आणि आणखी एका भावी यशस्वी हॉटेल व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
पुण्यातील नविन हॉटेल चे लोकेशन पहिल्या कंमेंट मध्ये
यशस्वी हॉटेल / रेस्टॉरंट व्यवसाय कन्सल्टन्सी
बाबत अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा.
About Sattyendra Jog