11/11/2025
क्लिनिक मध्ये येणाऱ्या बहुतांश स्त्री रुग्णांमध्ये लघवीच्या जागी खाज, जळजळ, अधून मधून rashes किंवा पाण्यासारखा स्त्राव, दह्यासारखा स्त्राव, दुर्गंधी अशी बरीच लक्षणं आढळतात.
ही लक्षणं जंतू संसर्गामुळे (infection) मुळे दिसून येतात.
दोन पाळीच्या मध्ये साधारण 10 ते 15 दिवसाच्या मध्ये चिकट बुळबुळीत स्त्राव होणं हे नैसर्गिक असते. तसेच पाळी येण्यापूर्वी देखील स्त्राव होतो.
पण या व्यतिरिक्त जर अंगावरून पांढर जात असेल तर त्यावर लगेच उपाय करणे आवश्यक आहे.
Infection होण्याची काही महत्वाची कारणे:
1. प्रत्येक वेळा सू केल्यावर खूप वेळा पाण्याने धुणे. असं केल्याने तिथली त्वचा सतत ओलसर राहते व तिथे जंतू संसर्ग होतो.
2. अंघोळीच्यावेळी खूप गरम पाण्याचा किंवा साबणाचा वापर करणे. यामुळे त्या ठिकाणी असणारे पोषक जिवाणू (गुड bacteria) नष्ट होतात. साबणामध्ये असणाऱ्या harsh chemicals मुळे त्या जागेचा pH बिघडतो आणि त्वचा कोरडी पडते, खाज येते आणि infection होण्याचे प्रमाण वाढते.
3. ओलसर अंतर्वस्त्रे वापरण्यामुळे देखील फंगल infections होतात.
4. पाळी बंद होत येताना ( menopause), होणाऱ्या hormonal बदलामुळे ती जागा कोरडी पडते व तेथील pH बदलून संक्रमण होण्याची शक्यता वाढते.
5. सॅनिटरी पॅड — पाळीच्या वेळी कमी स्त्राव असल्यास किंवा बराच वेळ बाहेर राहावं लागल्यास एकच पॅड बराच वेळ वापरल्यास इन्फेक्शन होतात. यामुळे खाज येणे, rashes येणे अशी लक्षणं उद्भवतात किंवा काही वेळेस Cancer सारखा धोका संभवतो.
6. बऱ्याच वेळा infection झाल्यावर दिलेली औषधं ( antibiotics) मधेच बंद केली जातात. त्यामुळे resistance ( त्या औषधाचा शरीरावर उपयोग न होणे) निर्माण होते व परिणामतः infection अधिक बळावते.
अशी लक्षणं येऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी:
1. खूप जास्त पाणी वापरून सतत धुणे टाळावे. ती जागा धुतल्यावर स्वच्छ कापडाने किंवा tissue ने हलकेच पुसावी.
2. साबण, कडक गरम पाणी, कृत्रिम वासाचे किंवा रंगाचे रसायन यांचा वापर टाळावा.
3. पाळीच्या वेळी दर 3/4 तासाने पॅड बदलावे.
4. अंतर्वस्त्र स्वच्छ धुऊन वाळवून वापरावी.
5. त्या जागेचे केस काढण्यासाठी harsh chemicals वापरू नयेत. त्या ऐवजी कात्रीने ट्रिम करावे.
6. औषधी कषाय ( तुरट चवीच्या) काढ्याने ती जागा धुतल्यास अधिक फायदा होतो. तसेच अवगाह म्हणजे कषाय द्रव्याच्या काढ्यात बसल्याने देखील infection कमी व्हायला मदत होते.
7. योनी पिचू: औषधी तेलाने सिद्ध पिचू किंवा बोळा त्या जागेवर ठेवून देखील खूप आराम मिळतो.
(6/7) उपाय करण्यापूर्वी आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.
वै. प्रगती येरवणकर जगताप
9860120368