Shree Vishwa-Ganesh Ayurveda & Panchakarma Clinic

Shree Vishwa-Ganesh Ayurveda & Panchakarma Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Vishwa-Ganesh Ayurveda & Panchakarma Clinic, NAVI MUMBAI.

*गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !*         *गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया ......!*🙏🏻🙏🏻🙏🏻
31/08/2022

*गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !*
*गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया ......!*🙏🏻🙏🏻🙏🏻

*"रेमडिसिव्हरची/टोसिलीझुमब  साठी वाट कशाला बघता?* "आयुर्वेद फॉर एनी डिझास्टर" अशी मानसिकता ठेवा.**Let's break the Chain*...
17/04/2021

*"रेमडिसिव्हरची/टोसिलीझुमब साठी वाट कशाला बघता?*
"आयुर्वेद फॉर एनी डिझास्टर" अशी मानसिकता ठेवा.*
*Let's break the Chain*
*"मृत्यूची चेन ब्रेक करूया".*

कोणताही आजार, मग तो कोव्हिड असो की चालताना लागलेली ठेच असो, ती मृत्यूसाठी कारणीभूत असू शकते हे निश्चित आहे. कोणत्याही क्षतीतून बाहेर येण्यासाठी आत्मविश्वास, आपला सकारात्मक दृष्टिकोन, उपचारासाठी तात्काळ ऍप्रोच, डॉक्टरांना इलाजासाठी प्रतिसाद आणि त्यानी दिलेल्या सूचनांचे पालन, पथ्य तसेच नियमित औषध घेणं गरजेचं आहे. तरंच आणि तेंव्हाच आपण त्या आजारातून किंवा धक्क्यातून स्वतःला सावरू शकतो. अश्या क्षतीग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांनी देखील या बाबतीत मॉरल सपोर्ट द्यायला हवा.
आयुर्वेदाचा उपयोग हा आजार टाळण्यासाठी, आजार स्वल्प स्वरूपात असताना आणि गंभीर अवस्थेतही होतो, हे समजून तात्काळ जवळच्या आयुर्वेदिक पदवीधारक डॉक्टरांची मदत घ्या, ते ही न जमल्यास दिलेल्या फोन क्रमांकवर संपर्क करा(डॉ.कल्याणकर किरण 8898630831)।
कोव्हिडच्या आजाराची लक्षणं सर्वश्रुत असताना, मी कोणाच्या संपर्कात आलो नाही, त्यामुळे मी पॉझिटिव्ह नसेनच, मला काही होणार नाही, माझी प्रतिकार क्षमता खूप जबरदस्त आहे, ईलाज महाग आहे, घरच्या घरी मी बरा होईन, असा कित्येकदा ताप आलाय मात्र त्यावेळी मेडिकल शॉप मधून गोळ्या घेवून बरा झालोय, अशी अनेक कारणं घरच्या घरी किंवा थातुरमातुर ईलाज करून सहाजिकच कोव्हिडचा प्रसार आपल्या फुफ्फुसात कफ भरेपर्यंत पुरेसा असतो. मात्र तोवर वेळ गेलेली असते. शेवटी हतबलता आली आणि शेवटी श्वासोश्वास फुलू लागला की मग धावपळ होते. तोवर बेड अव्हेलेबल होत नाहीत, व्हँटिलेलेटर भेटत नाही, रुग्णवाहिका, मेडिसिन, इंजेक्शने सहजपणे मिळत नाहीत. तेंव्हा आपल्यात वावरणारा माणूस कधी उपचाराविना किंवा मनाने खचून गेल्याने आपल्याला सोडून जातो. जाताना मात्र खूप काही बाकी ठेवून, खूप जणांना पोरकं आणि दुःखी करून जातो. आपण फक्त वाहतो ती चार ओळीची श्रद्धांजली.

आता श्रद्धांजलीच्या पोस्ट कराव्या लागू नयेत म्हणून आणि ही मृत्यूची चेन ब्रेक करणेसाठी असे आवाहन करताना नियतीला आव्हान देण्याची तयारी ठेवा .
आयुर्वेदाचा अवलंब करा।

"सेंट्रल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूट कॅन्सर" या केंद्र सरकारच्या संस्थेने घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पारितोषिक प्...
12/11/2018

"सेंट्रल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूट कॅन्सर" या केंद्र सरकारच्या संस्थेने घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त:

कालचा धन्वंतरी जयंती व राष्ट्रीय आयुर्वेद दिवस हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने साजरा झाला.
आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की, "सेंट्रल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूट कॅन्सर" या मिनिस्ट्री ऑफ आयुष च्या अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारच्या संस्थेने घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त झाले आहे.सदर स्पर्धेचा विषय : Ayurved: Scopes Challenges & Strategy असा होता.
हे यश माझे आई वडील, आपण सर्व गुरुजन, माझे मित्र डॉ शिशिर परतणे तसेच ईतर सर्व वैद्यमित्र सहकारी व माझे विद्यार्थी यांच्या योगदानाशिवाय शक्य झाले नसते.
पुनःश्च एकवार धन्वंतरी जयंतीच्या शुभेच्छा.

"A Healthy child, a Healthy Nation" Children are vital to the nations present and future, with this motto in mind, a fre...
14/06/2018

"A Healthy child, a Healthy Nation"
Children are vital to the nations present and future, with this motto in mind, a free medical camp was organized at "Rosebud Playzone School" by us.
The main purpose was to screen kids for any disorders as well as to maintain good health. Thorough Physical Examination was carried out around 143 kids.
After examining the students, necessary medical advice was given which helped parents in understanding the health of their ward. As usual our enthusiastic students Akshara, Anagha, Komal, Nikhil, Divya, Shailaja, Harshala, akshada & Ratnamala gave there best contribution towards camp.

The school authorities and teachers were impressed by the professionalism of the doctors and appreciated and thanked them for their valuable service to the students.

We would like to thank the School Principal Mrs. Sulekha Sinharay and teachers for their cooperation to make this possible.

18/04/2018

🙏🏻🍃🙏🏻🌱🙏🏻☘🙏🏻🌿

वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतिया असे म्हणतात. या दिवशी जें जें पुण्य करावे. ते अक्षय - चिरकाल टिकणारे होते असे म्हणतात.
अक्षय तृतिया हा साडेतीन मुहूर्तातला अर्धा मुहूर्त आहे. पण हा अर्धा असला तरी पूर्णत्व देणारा बिंदू आहे.
*अशा या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो, ही अक्षयतृतीया आपल्या जीवनात सुख, समृध्दी, समाधान, आरोग्य आणि चिरंतन आनंद घेउन येणारी ठरो हीच प्रार्थना.*
अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा !!

डॉ. कल्याणकर किरण
-श्री विश्वगणेश आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक
-स्वायु कॅन्सर केयर क्लिनिक

' उन्हाळा आणि आरोग्य ' भाग १©लेखक: डॉ कल्याणकर किरणभारतीय नव वर्षाचा पहिला सण म्हणजे म्हणजे पाडवा. पाडव्याच्या सणा पासून...
12/04/2018

' उन्हाळा आणि आरोग्य ' भाग १
©लेखक: डॉ कल्याणकर किरण

भारतीय नव वर्षाचा पहिला सण म्हणजे म्हणजे पाडवा. पाडव्याच्या सणा पासून थंडी बऱ्यापैकी कमी होत जाते आणि आणि काही दिवसांवर आलेल्या अक्षय तृतीये पर्यंत सूर्य संपूर्ण जोराने आपले तेजोकिरण पृथ्वीवर फेकत असतो. अर्थातच उन्हाळ्याने संपूर्ण ताकदीने मन आणि शरीराची लाहीलाही करायला सुरुवात केली की, कवी सौमित्र यांच्या 'ऊन जरा जास्त आहे, दरवर्षी वाटत' या ओळी आपसूक ओठांवर येतात.
उन्हाळा मनाला जसा त्रासदायक वाटतो तसाच आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही उन्हाळा त्रासदायक ठरू शकतो. उन्हाळा येतानाच मुळी आरोग्याच्या अनेक समस्या आणि विविध आजारांच्या हातात हात घालून येतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्य सांभाळणे तितकेच आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार उन्हाळा अर्थात ग्रीष्म हा आदानकाळातील सर्वात बलहानी करणारा ऋतू आहे. उन्हाळ्यात सूर्यकिरणे लंबरुप झाल्याने पृथ्वीची उष्णता वाढते. उष्मा वाढल्याने जलीय अंशाचे शोषण होते. पर्यायाने सर्व शरीर धातू क्षीण होतात. यामुळे शरीर श्रान्त (थकलेले) तसेच बलान्त (बलहीन) होते. त्यामुळे अल्पश्रमानेही थकवा जाणवतो. तसेच उन्हाळ्याच्या काळात शरीरातून घामावाटे जीवनावश्यक सोडियम पोटॅशियम, पाणी बाहेर टाकलं जातं आणि जीवनघटकांचा नाश होतो. यामुळे बलक्षय होऊन क्षयरोग, गोवर, कांजण्या, नागिणसारखे विकार होण्याचा धोका निर्माण होतो. विशेषत: शरीरातील जलद्रव्यांचा नाश झाल्याने उष्माघाताचाही धोका संभवतो.
उन्हाळ्याच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने सर्वांगाचा दाह होणे, अतिसार, लघवीला जळजळ होणं, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात. सतत घाम येण्यामुळे शरीराला दुर्गंधी तसेच विविध त्वचारोग होण्याची शक्यता असते. अंगावर घामोळ्या तसेच फोड्या येतात. कडक उन्हात जास्तकाळ काम केल्याने तसेच कडक उन्हात फिरण्याने शरीरात उष्णता वाढते आणि चेहरा तसेच अंगावरची त्वचा लाल किंवा काळसर होते. उष्माघात झाल्यास व्यक्ती मुर्छित होण्याची शक्यता असते.

*सर्वांगदाह-* या व्याधीत संपूर्ण शरीराची आग होते. आणि चेहरा तसेच त्वचा निस्तेज होते. उत्साह कमी होतो. सर्वांगदाहाचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त थंड वातावरणात ठेवावं. एसी तसेच फॅन खाली ठेवावं. उन्हात जास्तकाळ फिरू नये. शरीर वरचेवर थंड पाण्याने पुसून घ्यावं.
( *©लेखक: डॉ कल्याणकर किरण* )
*उष्माघात-* शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने व्यक्तीला ग्लानी तसेच चक्कर येते. डोळ्यासमोर अंधाऱ्या येतात. अशावेळी रुग्णाला थंड वातावरणात शांत झोपवावं. शरीर थंड पाण्यावे पुसून घ्यावं. डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी. उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रुग्णाला जास्तीतजास्त द्रव आहार द्यावा. अशा रुग्णांनी कडक उन्हाच्या वेळी घरातून बाहेर पडू नये. तसेच उष्माघात होत असलेल्या रुग्णाला घरात एकटे सोडू नये.
उष्माघाताची लक्षणे
1)ताप येतो
2)डोके दुखणे
3)डोळ्यांची आग
4)तहान लागते

उष्माघातामध्ये तात्काळ करावयाचे उपचार,
कांद्याचा रस तळपायाला लावणे.
लिंबू-साखर-पाणी पिणे.
उन्हात घराबाहेर पडू नये.
अंगावर साधारण थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्यात, आणि लवकरात लवकर डॉक्टरांना बोलवून घ्यावे.

*उष्माघात टाळण्यासाठी*
शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यासाठी द्रव पदार्थ जास्त प्रमाणात घ्यावेत.
डोक्‍यास पांढरा रुमाल बांधून किंवा छत्री घेऊन बाहेर पडा.
उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नका.
ताप असल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषध घ्या
टरबूज, कांदा, कलिंगड ई. यांचा जास्त वापर करा.
(भाग 2 लवकरच प्रसिद्ध करू)

आरोग्य विषयक लेख मिळवण्यासाठी आपले नाव आणि व्हाट्सअप्प क्रमांक पुढील फोन क्रमांक वर पाठवा.
8898630831

डॉ कल्याणकर किरण
M.D.(mum)
Consulting Ayurvedic Physician
संपर्क- 8898630831
श्री विश्व-गणेश आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सालय
स्वायु कॅन्सर केयर सेन्टर.
खारघर, नवी मुंबई

Topic : 'Prevention of Cardiac Diseases in Females' Place: Classic Stripes CompanyDate : 17 march 2017CardioVascular dis...
19/03/2018

Topic : 'Prevention of Cardiac Diseases in Females'
Place: Classic Stripes Company
Date : 17 march 2017
CardioVascular diseases Awareness programme was conducted successfully at classic stripes company vasai on 17 march 2017.
Lecture delivered on Cardiac diseases and its Prevention along with Demonstration & group activity of CPR(Cardio Pulmonary Resuscitation) is shown to all participants.
Mr. Sontakke who are president of K.M.C.Trust, Ms.Bakhita and Social Worker Mr. Manoj Kamble took efforts for arranging this programme.
Thanks to Our team (Akshara, Anagha, Harshala, Vrushali, Ratnamala, Akshada, Komal & Divya) who demonstrated CPR activity beautifully as well as helped participants to perform and learn it scientifically.

8 March : International Women's Day.Health check up camp for females was organised by us in collaboration with LIC Of In...
11/03/2018

8 March : International Women's Day.
Health check up camp for females was organised by us in collaboration with LIC Of India Kharghar branch.
Fun sports and activities were arranged for women to actively participate at Vasudev balavant fadke udyan, kharghar.
Total number of female patients examined were 90, of which 15 new finding of prehypertension and hypertension were consulted. Guidance regarding PCOD & Cancer (cervix and breast) was conveyed to
all patients.
Thanks to development officer Dr. Smita Gholap, Lic of India Kharghar branch and her team for arranging such beautiful programme.
Thanks to akshara, vrushali, komal, ratnamala, anagha, akshada, harshala, anushri for the sincere efforts.

"National Ayurvedic conference: Vishwa Vyakhyan Mala"Winner: 2nd prize. We are happy to announce that 'Swaayu Cancer Car...
27/02/2018

"National Ayurvedic conference: Vishwa Vyakhyan Mala"
Winner: 2nd prize.

We are happy to announce that 'Swaayu Cancer Care Centre' achieved 2nd prize for Research Paper Presentation in "NATIONAL AYURVEDA CONFERENCE : Shree Vishwa Vyakhyan Mala" on 25 February 2018 at Kalidas Natyagruh, Mulund.

Topic of our Research Paper was "Cancer: Comprehensive Ayurvedic perspective, Management & Treatment."

Winning this award would not have been possible without the inspiration & valuable inputs of my colleague and my Friend Dr Shishir Paratane.
Ayurvedic Treatment has proven its role in critical diseases like Cancer and we presented certain aspects of the same along with Observational Prospective Case Studies.

The total number of doctors attending this conference were around 1500. It was really a challenge for organising council to accommodate such a huge crowd. We sincerely thank Organisers of VishwaVyakhyan Mala for arranging such beautiful national conference full of Knowledge.

आयुर्वेद व्यासपीठ :पनवेल शाखा आयोजित "हृदय विकार आणि आयुर्वेद" या विषयावरील व्याख्यान शनिवार  दिनांक 10/02/18 रोजी अत्यं...
12/02/2018

आयुर्वेद व्यासपीठ :पनवेल शाखा आयोजित "हृदय विकार आणि आयुर्वेद" या विषयावरील व्याख्यान शनिवार दिनांक 10/02/18 रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
खारघर, नवी मुंबई येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक फिजिशियन *डॉ कल्याणकर किरण* यांनी उपस्थित डॉक्टरांना विविध हृदय विकारांसाठीचे निदान कसे करावे तसेच आयुर्वेदीक चिकित्सा याविषयी मार्गदर्शन केले
पनवेल, खारघर, कामोठे आदी परिसरातील अनेक मान्यवर डॉक्टरांची सन्माननीय उपस्थिती होती, आयुर्वेदाच्या विद्यार्थी वर्गानेही आवर्जून उपस्थिती दर्शवली. आयुर्वेदातील हृदय या शब्दाचे अर्थ ततसंबंधी व्याधी आणि लक्षणे तसेच आधुनिक काळातील Coronari artery diseases, Cardiomegaly, valvular abnormalities, Angina pectoris, hypertension अशा अनेक व्याधीवर चर्चा झाली.
सदर कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल आयुर्वेद व्यासपीठ:पनवेल शाखेचे आभार व्यक्त करतो.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ सुभाष जैन सर, डॉ इंदिरा चव्हाण मॅडम, डॉ समीक्षा नवरीकर मॅडम, डॉ मालती राजे मॅडम, डॉ संदीप राजपूत सर , डॉ मंदार गद्रे सर यांनी विशेष प्रयत्न केले.

जागतिक कर्करोग दिन : भाग 2    डॉ कल्याणकर किरण (कर्करोग निमित्त प्रकाशित लेखमालेचा भाग 2)कर्करोग हे नाव काढले तरी अंगावर...
06/02/2018

जागतिक कर्करोग दिन : भाग 2

डॉ कल्याणकर किरण
(कर्करोग निमित्त प्रकाशित लेखमालेचा भाग 2)

कर्करोग हे नाव काढले तरी अंगावर भीतीचा काटा येतो आणि अशीच स्थिती रुग्ण अनुभवीत असतो. आपल्याला कर्करोग झाला आहे हे समजताच बऱ्याच रुग्णांचे हातपाय गळून जातात.
आयुर्वेदामध्ये, *" विषाद: रोगवर्धनानाम श्रेष्ठ : ।। "*
विषाद (दुःख, खेद, भीती, शोक करणे) हा रोगाला वाढवण्यासाठी श्रेष्ठ असा वर्णिला आहे. यामुळे निदान झालेले कॅन्सर सारखे आजार आणखी बळावायला लागतात. आपण जागरूक असू तर कर्करोगासारख्या आजारापासून आपण आपली मुक्तता करून घेऊ शकतो.
कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. हा कर्करोग कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. कॅन्सरचे कितीतरी प्रकार असून या सगळ्या प्रकारांमधला समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाने नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशींची आवश्यकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजेच टय़ुमर(गाठी) होय. हे टय़ुमर दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे बिनाइन टय़ुमर म्हणजे साधी गाठ आणि दुसरा प्रकार म्हणजे मारक गाठी (मॅलिग्नंट). पहिल्या प्रकारची (बिनाईन) गाठ ही सहज काढून टाकता येते. या बेनाईन गाठी नवनवीन अवयवांमध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करत नाहीत.
मात्र दुस-या प्रकारात (मालिग्नंट) कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणा-या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवांमध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्या पेशी लसिकेमार्फत किंवा रक्तवाहिन्यांमधून इतर अवयवांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे मूळ अवयवाबरोबरच इतर अवयवांमध्येही कर्करोग पसरतो. तसंच आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात कर्करोग होऊ शकतो. यातील एक लक्षात घेण्याजोगा भाग म्हणजे रक्ताचे कॅन्सर मध्ये मात्र कुठल्याही गाठी तयार होत नसतात. रक्ताचे कॅन्सर हे बहुतांश वेळा मालिग्नंट स्वरूपाचेच असतात आणि लहान मुलांमध्ये (ल्युकेमिया: वयोगट 3 ते 16) याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. स्तनांचा, प्रोस्टेट किंवा पौरुष ग्रंथी आणि मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग प्रौढपणी होतो. सगळे कॅन्सर हे योग्य वेळेत निदान झाल्यास बरे होण्याची शक्यता वाढते.
आपण काय करू शकतो.
शरीराला उच्च कोलेस्टेरॉल देणारे पदार्थ जसं की मांस, लिव्हर आणि दुधापासून तयार केलेले पदार्थासारखे आहार टाळावेत. अतितेलकट पदार्थ टाळावे. मद्यपान टाळावे. फूड कलर्स, त्वचेची रासायनिक सौन्दर्य उत्पादने, केमिकल्स चा धूर, अतिशय तंग कपडे, तंबाखू गुटखा खैनी बिडी सिगारेट आदी पदार्थ टाळावेत.
उन्हातून फिरताना छत्री किंवा हॅट वापरावी. आंबा, पेरू, द्राक्ष, अननस, संत्रे, मोसंबी, आवळा यासारख्या फळांचा आणि पडवळ, भोपळा, घोसाळे, टोमॅटो यासारख्या फळभाज्या , हिरव्या पालेभाज्या अशा भाजांचा तसंच कडधान्याचा, मोड आलेली उसळ आदींचा आहारात समावेश करावा. तसंच आहारात गहू, तांदूळ, नाचणी आणि ज्वारी अशा पदार्थाचा समावेश करावा. थोडक्यात तंतुमय पदार्थाचे सेवन, जीवनसत्त्व, क्षार, तेलाचे कमी प्रमाण आणि संतुलित आहार घेतल्याने कर्करोगाची शक्यता कमी होते. नैसर्गिक आणि सेंद्रिय(Organic vegetables) भाजीपाला, फळे यांचा आवर्जून वापर करावा.
*शरीरातील सर्व अवयवांची साम्यवस्था टिकविणे अतिशय गरजेचे असते, यासाठी नियमित स्वरूपात आपल्या प्रकृतीनुसार योग्य ती आयुर्वेदिक औषधे घेणे तसेच वर्षातून एकदा तरी पंचकर्म उपचार करून घेणे श्रेयस्कर ठरते.*
सध्या भारतात तोंडाचा , फुफुसांच्या, स्तन आणि गर्भाशयमुख या चार कॅन्सर चे मिळून एकत्रित प्रमाण 50% ते 60% आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, फुप्फुसांचा आणि तोंडाचा कर्करोग हा सामान्यपणे कोणालाही होऊ शकतो. तर स्तनांचा आणि गर्भाशयाचा कर्करोग हा महिलांनाच होतो. सध्याच्या घडीला भारतात कर्करोगामुळे मृत्युमुखी पडणा-या लोकांचं प्रमाण अधिक असून पाच ते सहा दशलक्ष रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत. भारतात वर्षाला जवळपास ५ लाख लोक कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार या वर्षी ही संख्या ७ लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. प्रतिवर्षी कर्करोगाचे निदान होणारे रुग्णांचे प्रमाण याच पटीमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. तसंच फुप्फुसं, तोंड, ओठ, घसा आणि प्रोस्टेटचा कर्करोग प्रामुख्याने पुरुषांमध्ये तर बहुतांश महिलांमध्ये गर्भाशय, स्तन आणि अंडाशयाचा (Ovarian cancer) कर्करोग आढळतो. भारतात प्रामुख्याने मूत्रपिंड, पुरुषांचे जननेंद्रिय, आतडय़ांच्या कर्करोग वृद्ध पुरुषांना तर गर्भाशयाचा कर्करोग हा वृद्ध महिलांना होतो. बाकीचे बहुतांश कर्करोग हे वयाच्या ३० ते ५० या वयोमर्यादेत होतात.
*स्तनांचा कर्करोग(Breast cancer)*
गेल्या काही वर्षात स्तनांचा कर्करोग हा तरुण वयातच होण्याचं प्रमाण अधिक वाढलेलं दिसतंय. त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. पूर्वीपेक्षा हे प्रमाण अधिक वाढलं आहे. अलीकडे याकडे लक्ष केंद्रित केल्याने काही रुग्ण प्रगतिपथावर आहेत. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण हा कर्करोग पूर्णतः बरा होण्याची शक्यता असते. यासाठी नियमित अर्धा तास स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वयाच्या २० वर्षीपासूनच योग्य डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. जेणेकरून या कर्करोगाचं निदान लवकर होण्यास मदत होईल आणि वेळीच उपचार केल्याने नव्याने जीवनाची संधी मिळू शकते. नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की दर अठ्ठावीस महिलांमधील एका महिलेला स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. भारतात स्तनांचा कर्करोग ३० ते ४५ या वयादरम्यान होतो. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाविषयी महिलांमध्ये अधिकाधिक जागरूकता कशी निर्माण होईल, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
कर्करोगाचं निदान लवकर झाल्यास त्याचा उपचार कमी खर्चिक असतो तसंच रुग्ण लवकर बराही होऊ शकतो. त्याचप्रमाणे कर्करोगाचं निदान उशिरा झाल्यास त्यावरील उपचार ही खर्चिक बाब असतेच, त्याचप्रमाणे त्यातून मुक्तता होण्याची शक्यतादेखील कमी असते.
*डॉक्टरांच्या मते, कर्करोगाचा प्रादुर्भाव होण्याचं मुख्य कारण म्हणजे अनुवंशिक संप्रेरकांचा वापर आणि रोगप्रतिकारशक्तीचा अभाव हीदेखील असू शकतात.* याशिवाय बाहय़ आणि पर्यावरणविषयक कारणं, उदाहरणार्थ अन्न सवयी, औद्योगिकीकरण, रासायनिक खते, पेस्तीसाईड चा अनिर्बंध वापर लोकसंख्या वाढ अशीही असू शकतात.
निदान करण्यात विलंब, आवश्यक वैद्यकीय सुविधांचा अभाव, आपापसांत दुर्लक्ष असणे यामुळे कर्करोग हा ‘किलर रोग’ ठरू शकतो. खरं म्हणजे कर्करोगाचं निदान लवकर झालं तर त्यावर योग्य ते उपचार केले जातील आणि रुग्ण एक निरोगी आयुष्य जगेल. म्हणूनच कॅन्सरचे कोणते प्रकार आहेत आणि त्यांची लक्षणं काय आहेत याविषयी लोकांमध्ये माहिती प्रसारित करणं आवश्यक आहे.
या कर्करोग दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने अधिकाधिक लोकांना कर्करोगाविषयी माहिती देऊन *'कॅन्सर ला कॅन्सल'* करून आजाराविषयी जागरूकता वाढवुयात.
(कॅन्सर वरील लेखमालेतील तिसरा भाग लवकरच प्रकाशित करू.)
डॉ. कल्याणकर किरण
आरोग्य विषयक लेख मिळवण्यासाठी आपले नाव आणि व्हाट्सअप्प क्रमांक पुढील फोन क्रमांक वर पाठवा.
8898630831
डॉ कल्याणकर किरण
M.D. (Ayu.)
Consulting Ayurvedic Physician
आयुर्वेद वाचस्पती, योग आयुर्वेद तज्ञ
संपर्क- 8898630831
श्री विश्व-गणेश आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सालय
शॉप क्र. 17, मीरा आरकेड, शिल्प चौका जवळ, सेक्टर 20, खारघर, नवी मुंबई.

जागतिक कर्करोग दिन - भाग १      डॉ. कल्याणकर किरणजगभरात 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोगदिन म्हणून साजरा केला जातो. क...
04/02/2018

जागतिक कर्करोग दिन - भाग १
डॉ. कल्याणकर किरण

जगभरात 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोगदिन म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजारांच्या यादीत कर्करोग महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे. भारतात, कुठल्याही घडीला 25 लाख कर्करोगपीडित रुग्ण आढळतात, त्यात दरवर्षी आठ-नऊ लाख नवीन रुग्णांचे निदान होते. एका अहवालानुसार बालकांमध्ये कर्करोगाच्या प्रमाणात दरवर्षी मोठी वाढ होत आहे.

हे केल्यास कर्करोग राहील दूर समतोल आहार:
आहारात सर्व डाळी, कडधान्ये, विशेषत: मोड आलेली कडधान्ये, सालीच्या डाळी यांचा समावेश असावा. सर्व प्रकारची फळे (सालीसह) तर कोशिंबीर (गाजर, मुळा, काकडी, बीट इत्यादी.) मुबलक खावीत. शरीराला तंतुमय पदार्थ व रोगप्रतिबंधक घटक मिळतात. जंक फूड, पॅकेज फूड, अन्नात वापरले जाणारे रंग आणि सेन्ट, कृत्रिम अन्नपदार्थ, अतिशय तिखट आहार, अतिरिक्त मांसाहार, स्निग्ध पदार्थांचे अतिसेवन टाळा.

व्यसनांना दूर ठेवा
धूम्रपान व इतर कोणत्याही स्वरूपात तंबाखूचा वापर पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. अतिरिक्त प्रमाणात मद्यपानदेखील यकृत व पचनसंस्थेच्या कर्करोगाचा धोका वाढवते. तरुणांनी या व्यसनांची सुरुवातच न करणे केव्हाही हितकारकच ठरते.

नियमित व्यायाम करा
नियमित व्यायामाव्दारे वजन नियंत्रणात राखण्यास मदत होते. त्यायोगे स्तनांच्या, आतड्यांच्या कर्करोगाची जोखीम कमी होते. उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह या आजारांनाही नियंत्रणात ठेवता येते.

लसीकरण
हिपॅटायटीस बी या विषाणूविरुध्दची लस यकृताच्या कर्करोगापासून बचाव करते. स्त्रियांमधील गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एच.पी.व्ही. (ह्युमन पॉपीलोमा व्हायरस) या विषाणूविरुध्दची लस उपयुक्त आहे.

आयुर्वेदिक चिकित्सा
आयुर्वेदिक औषधांच्या वापराने अनेक कॅन्सरची यशस्वी ट्रीटमेंट करता येते, शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, वजन वाढविणे तसेच केमोथेरपी आणि रेडिएशन चे दुष्परिणाम कमी करणे यांसारख्या अनेक हेतूसाठी आयुर्वेदिक औषधे सुपरिणाम दाखवितात.

चला कर्करोगाला ठेवूया चार हात दूर.
एक काळा असा होता की, कॅन्सर अर्थात कर्करोग म्हणजे आयुष्य संपल्याची खूण समजली जायची; मात्र या जीवघेण्या आजारावर आणि त्याच्या उपचारासंबंधी कित्येक दशकांच्या संशोधनानंतर कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. वाजवी खर्चाचे विविध उपायांसोबतच इच्छाशक्ती वापरून यावर मात केलेल्या रुग्णांच्या यशोगाथेमुळे हे चित्र आता पालटत आहे.

कर्करोगावर मात उपाय
कर्करोग पूर्णत : टाळता येणे जरी शक्य नसले तरी त्यावर मात करण्याचा दुसरा उपाय म्हणजे त्याचे प्राथमिक अवस्थेत निदान करणे. वेळेत निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी हे करणे गरजेचे-

कर्करोगाची सूचक लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा.
नियमितपणे शरीराची स्वतपासणी करा, स्त्रियांनी स्वत:चे स्तन तपासणी करणे गरजेचे.
नियमितपणे तज्ज्ञ डॉक्टरांकडून संपूर्ण शारीरिक तपासणी व काही प्रयोगशालीय तसेच रेडिओलॉजीकल चाचण्या करवून घेणे आवश्यक आहे.

योग्य ठिकाणी गेल्यास खर्च अल्प
कर्करोगाच्या उपचारांकरिता खूप खर्च लागतो हा समज चुकीचा आहे. सध्याच्या उपचार पध्दतीत एक लाख रुपयांच्या आत 90 टक्के कर्करोगांवर पूर्ण उपचार करता येतो. फक्त योग्य अशा कर्करोग रुग्णालयात उपचारांना सुरुवात होणे गरजेचे असते. राजीव गांधी योजना आणि जीवनदायिनी योजना या शासकीय योजनांतूनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळतो.

या आहेत उपचार पद्धती
किमोथेरपी- किमोथेरपी ही तात्पुरत्या स्वरूपात त्रायदायक ठरते. या थेरपीनंतर केस गळतात, अशक्तपणा जाणवतो, रक्त कमी होते, मळमळते यांसारख्या तात्पुरत्या त्रासांना सामोरे जावे लागते.

टार्गेटेड थेरपी
यापूर्वी कोबाल्टच्या मशीनव्दारे रेडिएशन दिले जात; मात्र जगभरात या तंत्रज्ञानावर बंदी आली आहे, त्याऐवजी आता बायोटेक्नॉलॉजीच्या आधारावरील तंत्रज्ञानाने टार्गेटेड रेडिएशन थेरपी केली जाते. लिनियर अँक्सेलेटर आणि एक्सरे जनरेटेड याव्दारे ही थेरपी होते. यात कॅन्सर ट्यूमरच्या (गाठीच्या) आकार आणि खोलीनुसारच रेडिएशन दिले जाते, त्याचा परिणाम केवळ ट्यूमरवरच होतो.
(लवकरच भाग २ प्रसिद्ध करू)

*©लेखक: डॉ. कल्याणकर किरण*

आरोग्य विषयक लेख मिळवण्यासाठी आपले नाव आणि व्हाट्सअप्प क्रमांक पुढील फोन क्रमांक वर पाठवा.
8898630831

डॉ कल्याणकर किरण
M.D. (Ayu.)
Consulting Ayurvedic Physician
आयुर्वेद वाचस्पती, योग आयुर्वेद तज्ञ
संपर्क- 8898630831
श्री विश्व-गणेश आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सालय
शॉप क्र. 17, मीरा आरकेड, शिल्प चौका जवळ, सेक्टर 20,
खारघर, नवी मुंबई.

Address

Navi Mumbai

Opening Hours

Monday 9am - 9:30pm
Tuesday 9am - 9:30pm
Wednesday 9am - 9:30pm
Thursday 9am - 9:30pm
Friday 9am - 9:30pm
Saturday 9am - 9:30pm
Sunday 9am - 9:30pm

Telephone

+918898630831

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishwa-Ganesh Ayurveda & Panchakarma Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Vishwa-Ganesh Ayurveda & Panchakarma Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram