22/11/2022
*पंचकर्म एक संपुर्ण चिकित्सा*
पंचकर्म ही आयुर्वेदाची एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे. प्राचीन शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली ही उपचार पद्धती आहे. यामध्ये रोग बरा करण्यासाठी एखादे औषध देऊन शरीरातच तो रोग जिरवून न टाकता तो रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे रोग समूळ नष्ट होतो. अर्थात तो रोग पुन्हा डोके वर काढत नाही व रोग समूळ नष्ट होतो. अशा रीतीने रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेला शोधन क्रिया म्हटले जाते. मात्र त्याचबरोबरच अजुन काही पूर्वकर्म केली जातात पण त्याबद्दल आपण नंतर सविस्तर बोलू.. पंचकर्म उपचारात वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण हे प्रमुख व अत्यंत महत्त्वाचे असे उपचार आहेत.
प्रत्येक रुग्णाला हे पाचही उपचार केलेच पाहिजे, असे आवश्यक नाही. रुग्णाची प्रकृती, आतापर्यंत झालेली मोठमोठी आजारपणे, वय, कुठला ऋतू सुरू आहे या सर्वांचा विचार करून वैद्य रुग्णाला नेमका कुठला उपचार द्यायचा हे ठरवितात. पंचकर्मामध्ये वात, पित्त आणि कफ या तीन दोषांचे शोधन करायचे असते. वात, पित्त व कफ हे तीन दोष संतुलित असतील तर कोणताही रोग होत नाही. मात्र यांच्यापैकी एखादाही दोष वाढला असेल तर, शरीरात रोग निर्माण होत असतो. साधारणतः अन्न पचन न होणे, तोंडाला चव नसणे, स्थूलपणा, शौचास साफ न होणे,रक्त कमी असणे ,दमा जीर्ण सर्दी,अंगावर पित्त उठणे, इसब, psoriasis सारखे जीर्ण त्वचेचे आजार, संधिवात, आमवात, gout, मणक्याचे आजार, कंबर मान दुखणे, जीर्ण डोकेदुखी,अतिशय आळस येणे, अकारण अशक्तपणा येणे, सर्वांगास दुर्गंधी येणे, वारंवार कफ होणे, वारंवार पित्त होणे, निद्रानाश किंवा अतिशय झोप येणे, गर्भाशयात होणाऱ्या गाठी ,PCOD, मुल न होणे,वारंवार miscarrage होणे, शरीराचा वर्ण काळवंडणे, इत्यादी अनेक जीर्ण व्याधीत पंचकर्म उपचार देणे अतिशय लाभकारक असते.
पंचकर्म उपचार करताना रोग्याची शक्ती पाहिली जाते. हे उपचार सोसण्याची ताकद रुग्णामध्ये असली पाहिजे. वात, कफ व पित्त हे तीन दोष शरीरात वाढले असतील. सर्व शरीरात पसरले असतील व ते साम अवस्थेत असतील तर ते दोष वाढलेले असूनदेखील पंचकर्माद्वारे तसेच्या तसे बाहेर काढता येत नाहीत. . यासाठी पाचन, स्नेहन व स्वेदन हे तीन पूर्व उपचार केले जातात तसेच काही औषधे दिली जातात व तद्नंतर पंचकर्म उपचार केले जातात.
वैद्यांनी सांगितलेल्या पथ्या चे पालन पंचकर्म उपचारांचा अधिकाधिक लाभ व्हावा यासाठी करणे गरजेचे असते.
पंचकर्माने रोग शरीरातून समूळ नष्ट होतो. परंतु काही इतरही याचे फायदे आहेत. शरीरात अग्नी प्रदीप्त होतो. शरीराला व मनाला स्वस्थता मिळते. शरीराचा वर्ण व कांती उजळते. त्वचा तजेलदार दिसू लागते. कार्यशक्ती म्हणजे स्टॅमिना वाढतो. शरीर पुष्ट व भारदार होते. वृद्धावस्था लवकर येत नाही. निरोगी अवस्थेत दीर्घायुष्य मिळते. योग्य संतती प्राप्ती करीता पंचकर्म नक्कीच फायदेशीर ठरते.पंचकर्म उपचार तज्ज्ञ व्यक्तिच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा. त्याने दुष्पपरिणाम होत नाहीत. हे सर्व फायदे मिळवायचे असतील तर पंचकर्म उपचार वर्षातून किमान एकदा तरी करून घेतलाच पाहिजे.
Dr. Sheth's Holistic Care Center
https://maps.app.goo.gl/6wBNV9SuPtWXLfFp8
Contact - 8779497692
★★★★★ · Homeopath