20/11/2019
आज , WORLD COPD DAY निमित्त आपण ह्या आजाराची माहिती करून घेऊ.
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज (COPD) हा जगातला पाचवा सर्वात घातक आजार आहे. सामान्यपणे हा आजार धुम्रपान करणाऱ्या लोकांना होतो, पण आता हा आजार धुम्रपान न करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा जीवघेणा ठरतो आहे. ज्या लोकांनी आयुष्यात कधीच धुम्रपान केल नाही, त्यांनाही या रोगाची लागण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. विशेष म्हणजे यात महिलांची संख्या अधिक आहे.
हा एक फुप्फुसाचा आजार आहे. ह्यात फुप्फुसामध्ये हवा पोहोचण्यास अडथळा निर्माण होत असतो. निदान वेळेत झाले नाही तर यामुळे श्वासाला अडथळा निर्माण होऊन त्यापासून बचाव करणे कठीण होऊन बसते.
COPD हे फुफ्फुसाच्या आजारांच्या ग्रुपचे नाव आहे. सीओपीडी संबंधित सर्वात सामान्य रोग जुने ब्रॉन्कायटिस आणि ऍम्फिसीमा आहेत. कधी-कधी एकाच व्यक्तीला हे दोन्ही आजार होऊ शकतात.
एका रिपोर्टनुसार, विकसनशील देशात सीपीओडीने होणाऱ्या मृत्यूंमध्ये 50 टक्के मृत्यूचं कारण बायोमासचा धूर असल्याच समोर आलं आहे. ज्यामध्ये 75 टक्के महिलांचा समावेश आहे. बायोमास इंधन जसे की, लाकूड, जनावरांचं शेण, पिकांचे अवशेष हे सर्व धुम्रपान करण्याइतकचं घातक आहे. यांसर्वांमुळे महिलांमध्ये सीओपीडीचे प्रमाण तीप्पटीने वाढले आहे. विशेषकरून ग्रामीण परिसरात याचं प्रमाण अधिक बघायला मिळत आहे.
हा आजार पसरण्यामागे अॅग्रीकल्चरल पेस्टीसाईड्स आणि डास पळवण्यासाठी वापरण्यात येणारी मॉस्क्विटो कॉईल यांचं वाढतं प्रमाण कारणीभूत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण एका मॉस्क्विटो कॉईलमधून 100 सिगारेट एवढा धूर, तर 50 सिगारेट एवढा फॉरमलडिहाईड निघतो, जो आपल्यासाठी जीवघेणा ठरु शकतो.
कारणे
तंबाखूचे सेवन आणि तंबाखूचा धूर
>> घरातील प्रदूषण
>> बाहेरील प्रदूषण
>> कामाच्या ठिकाणी असलेली धूळ आणि रसायने
>> लहानपणापासून असणारे जुने श्वसनाचे आजार
>> अयोग्य पद्धतीने दम्यावर उपचार झाल्यास त्यातून सीओपीडी उद्भवतो
>> ग्रामीण भागात सीओपीडी होण्याचे कारण म्हणजे बायोमास इंधनाचा वापर
>> शहरी महिलांमध्ये अतिरिक्त धुम्रपानामुळे
>> हायकोलेस्ट्रॉल, डायबेटिस, हृदयरोग, संधिवात
सीओपीडीची लक्षणं
• वेगाने श्वास घेणे
• कफ आणि खोकला होणे
• खोकताना रक्त येणे
• सतत कोल्ड फ्लू राहणे
• छातीत इंफेक्शन होणे
• छातीत दाटल्यासारखे वाटणे
• अशक्तपणा जाणवणे
• वजन कमी होत जाणे
चाचण्या
फुफ्फुसाची चाचणी ( Pulmonary Function Test) केल्यानंतर एखादी व्यक्ती किती प्रमाणात श्वास आत घेऊ शकते किंवा बाहेर टाकू शकते, याची चाचणी केली जाते. त्यातून ही हवा फुफ्फुसापर्यंत किती प्रमाणात पोहचते हे लक्षात येते. या चाचणीमधून पेशंटला सीओपीडी आहे का, याचे निदान होते.
COPD आणि होमिओपॅथी उपचार
COPD बाबतीत होमिओपॅथी चांगली साथ देणारी भूमिका देते. होमिओपॅथी फुफ्फुसातील ऊतींचे पुढील नाश नियंत्रित करू शकते. लक्षणात्मक आराम आणि गुंतागुंत रोखणे हा होमिओपॅथीद्वारे मिळवलेला मुख्य फायदा आहे. सीओपीडीवर होमिओपॅथिक उपचारांमुळे ब्रोन्कोडायलेटर आणि स्टिरॉइड औषधांवर अवलंबून असण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट साधण्यास मदत होते. होमिओपॅथिक उपचारांमध्ये दिलेले प्रत्येक औषध कोणत्याही प्रतिकूल प्रतिक्रिया किंवा दुष्परिणामांच्या भीतीशिवाय रुग्णांना त्यांच्या त्रासदायक लक्षणांपासून मुक्त करू शकते. होमिओपॅथी ही सर्वात लोकप्रिय समग्र औषध प्रणाली आहे. होमिओपॅथीचा हेतू केवळ COPD च्या लक्षणांवर उपचार करणे नव्हे तर त्यामागील मूळ कारण आणि वैयक्तिक संवेदनशीलता यावर लक्ष देणे आहे.
- डॉ.जगदाळे होमिओपॅथी ( ऐरोली , नवी मुंबई)