
29/10/2024
*खरे धन*
*धनत्रयोदशी*
धनत्रयोदशी आली की सोन / चांदी / भांडी यांची पूजा आपण करतो अथवा नवीन खरेदी करण्याची प्रथा चालू झाली आहे
पण *दिवाळी मध्ये धनत्रयोदशी आणि*
*लक्ष्मी पूजन असे दोन दिवस येतात*
*दोन्ही दिवस धनाची पूजा असते का?*
पण नक्की कोणते धन?
आरोग्य धन की आर्थिक धन??
आज धनाचे ( आर्थिक )आकर्षण इतक आहे की *दिवस का साजरा करतात त्या मागचा अर्थ च आपण कधीच विसरलो*
आयुर्वेदची देवता *भगवान धन्वंतरी यांच्या पृथ्वी वर अवतारण्याचा दिवस म्हणजे धन्वंतरी जयंती -धनत्रयोदशी*
भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे आराध्य दैवत यांनी आजच्या दिवशी मानवाच्या स्वास्थ्य रक्षणार्थ पृथ्वीवर अवतरले
ते चारभुजा धारी आहेत.त्यांच्या
एका हातामध्ये शंख - नाद (वायु शुद्धी )
एका हातात चक्र-(सर्व रोगनिवाराणार्थ )
एका हातात जळू- (रक्त शुद्धी-पंचकर्म)
एका हातामध्ये अमृत कलश( मानव जाती साठी अमृत धारण )
जीवनात धन म्हणजे संपत्तीची नितांत आवश्यकता आहे हे मान्य आहे परंतु त्या साठी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे मान्य नाही.
स्वास्थ्य असेल तर आर्थिक संपत्तीला कामावता येते परंतु आर्थिक संपत्ती ने स्वास्थ्य मिळवता येत नाही.
*आजचा दिवस धन्वंतरी ( विष्णु अवतार) पुजानाचा आहे व नंतर लक्ष्मी पूजन दिवस दिवाळीत येतो* म्हणून *स्वास्थ्य हीच खरी संपत्ती* आहे आठवण करून देण्याचा आहे.
*आपली खरी जबाबदारी म्हणून शरीराकडे,मनाकडे कितीसे लक्ष आपण देत असतो याचा विचार आज नक्की करा व त्या अनुषंगाने वागा*
लेखिका :
वैद्य पारितोषिणी कुकडे-पाटील.
*स्वास्थ्यायान आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्मा केंद्र कडून धनत्रयोदशीच्या आरोग्यदायी शुभेच्छा*
दररोज आरोग्य विषयक आयुर्वेदिक टीप मिळवण्यासाठी खालील लिंक जाईन करा
WhatsApp Group Invite