14/10/2024
...... अभ्यंग स्नानाची वेळ झाली!!!!!
दिवाळीतील उत्साही वातावरण, पहाटेची थंडी आणि त्यात "अभ्यंग" हा शब्द उच्चारला की आनंद अजूनच द्विगुणित होतो. दिवाळीच्या पहिल्या पहाटे अभ्यंगस्नान करतात. मात्र धावपळ आणि गडबडीत आजकाल बऱ्याच घरांमध्ये अभ्यंगाचा विधी जवळजवळ उरकला जातो.
अंगाला तेल लावणं यालाच "अभ्यंग" असं म्हणतात. या अभ्यंगाबरोबर सुख आणि प्रेमाचा स्नेह सर्वत्र पसरतो. हा विधी आपल्याकडे मर्यादीत स्वरूपात होत असला तरी आयुर्वेद शास्त्रानुसार अभ्यंग रोज करण्यास सांगितले आहे. केवळ त्वचाच नव्हे तर संपूर्ण शरीर तसंच मानसिक निरामयतेच्या दृष्टीने हा विधी अतिशय उपयुक्त आहे.
दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. प्रदूषणाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. प्रदुषित वातावरण, जंतुसंसर्ग यापासुन त्वचेचं रक्षण करुन, त्वचेला पोषण देऊन तिचं आरोग्य राखण्यासाठी अभ्यंग गरजेचं आहे.
हवामानाच्या परिणामानासुद्धा आपण अभ्यंगामुळे दूर ठेऊ शकतो. अभ्यंग केल्यावर थकवा दूर होतो. शरीर सदृढ आणि बळकट बनतं, हलकं होत. झोप चांगली लागते. त्वचा मृदू बनते शिवाय पुष्ट आणि तजेलदारही बनते. आयुर्वेदात अभ्यंगाला विशेष महत्त्व आहे.
दिवाळीच्या दिवसात अभ्यंगस्नानासाठी तेलाबरोबरच उटण्याचाही वापर करावा. अभ्यंगामुळे त्वचेवरचा मळ सुटा होतो आणि त्वचेची छिद्र मोकळी होतात. परंतु हा मळ तिथून बाजूला करण्यासाठी आणि त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी उटणं वापरणं फायदेशीर ठरते.
उटणं म्हणजे सुगंधी वनस्पतीचं कोरडं चूर्ण. या चूर्णात नागरमोथा, सुगंधी कचोरा, वाळा, आवळकाठी, मंजिष्टा, दवणा, उपळसरी, गुलाब पाकळी अशा अनेक सुवासिक वनस्पतींचा वापर केला जातो. उटण्यामुळे कफनाश आणि मेदनाश होतो. त्वचेचं सौंदर्य वाढतं. वेगवेगळ्या ऋतूत वेग वेगळी उटणी वापरतात
पावसाळ्यात: तांदळाचं पीठ, सुंठ, नागरमोथा, हळद यांचं उटणं.
हिवाळ्यात: नागरमोथा, हळद, वेखंड,ज्येष्ठमध, गहूला याचं उटणं.
उन्हाळ्यात:चंदन, वाळा, नागरमोथा, कचोरा, मसुराच्या डाळीचं पीठ याचं उटणं.
तारुण्य टिकवण्यासाठी, श्रमहर, वातहर, दृष्टी सुधारण्यासाठी, त्वचेला नितळपणा येण्यासाठी अभ्यंग उपयोगी ठरते.
"अभ्यंग आचरेत नित्यम!" हा आयुर्वेदाने दिलेला मूलमंत्र आहे. केवळ दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान करून भागत नाही, ते वर्षभर नित्यनेमाने केलं पाहिजे.
चला तर मग..........अभ्यंग स्नानाची वेळ झाली!
उत्कृष्ट दर्जाचे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेले, उटणं, साबण आणि अभ्यंग तेल उपलब्ध.
संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होऊ शकते.
संपर्क:
वैद्य. गजेंद्र प्रकाश सिलीमकर
श्री क्लिनिक, परदेशी आळी, पनवेल.
९८७०३८०६७३/ ९१६७७५४८४२.