16/03/2024
“ दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे, कर माझे जुळती.”
मी सुनिल भा.नाईक वय 65 वर्ष. पनवेल हार्ट केअर क्लिलिक, येथे औषध उपचार घेणारा एक हृदय रोग पिडीत.. माझ्या अनुभवावरून, खरंच येथील “ किलेशन थेरेपी ” हा एक हृदयरोगावर चांगला पर्याय आहे.
माझी कथा अशी...साधारण 2000 रोजी मला हृदय विकाराचा त्रास सुरु झाला.एन्जोग्राफिने तपासणी केली असता, बायपास शिवाय पर्याय नाही,असे डॉक्टरांनी सांगितले.माझी घाबरगुंडी उडाली, माझी एक जमेची बाजु.. शिवसेनेचे उद्धव ठाकरे माझे वर्ग मित्र. त्यांनीही वेळ न दवडता परळचे आमदार दगडुदादा यांना फोनद्वारे सांगुन, तातडीने माझ्या बायपासची केईएमला व्यवस्था केली..2002 ला माझी बायपास झाली..तेंव्हा धिर देण्यास मुंबई चे महापौर देवळे साहेब स्वतः हजर होते.त्यानंतर साधारण 14 वर्षानंतर मला पुन्हा हृदयाचा त्रास सुरू झाला..एन्जोग्राफि केलि असता कळले.बायपास केलेले ब्लॉक भरले आहेत.
आता एन्जोप्लास्टी पद्धती नुसार, हृदयात स्टेन टाकण्यांची पद्धत सुरू झाली होती. त्यानुसार चुन्नाभट्टि हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊन त्यावेळी 2016 ला माझ्या हृदयात दोन स्टेन टाकण्यात आल्या..मि पुन्हा व्यवस्थित झालो..2018 ला कोरोना आला. यावेळी जनतेने करोनामध्ये कोणति काळजी द्यावी, अशा विषयांचे मी 100 पोष्टर बनवुन त्यांचे सायन तसेच नविन मुंबई येथे प्रदर्शन भरवून जनजागृती केली.. तसेच अजूनही सानपाड्या मध्ये माझी जुनी वृक्षारोपणाचि मोहिम हि चालुच होती. झाडे लावा.झाडे जगवा. हे माझे आंदोलन गेली 17-18 वर्ष अविरत विभागात चालू आहे. कोरोनाच्या काळात कोव्हिडचा त्रास होउ नये म्हणून मी औषधाचे सगळे ढोस घेतले होते. आणी त्यानेच मला त्रास झाला...माझ्या रक्तामध्ये क्लोटेज निर्माण होऊन माझ्या हृदयातील दोन्ही स्टेन भरल्या. त्याने मला दम लागणण्यास सुरवात झाली.. चालतांना, बोलतांना मला त्रास जाणावायला लागला.. मला प्रचंड थकवा यायला लागला.सॉरबिटची गोळी नेहमी घ्यावयास लागायची.
एक दिवस माझा मित्र शैलैश कोचरेने, मला परळला कोडिओ लाजिक तज्ञ डॉक्टर कडे जाण्यांचा सल्ला दिला.तेथे इसिजि तसेच रक्त चाचण्या आणि थ्रिडि हृदय तपासणी करुन माझे हृदय हे केवळ 20% चालत असून माझ्या हृदयाच्या बहुतेक नसा ब्लॉक झाल्यात हे सांगितले. मि विचारले यावर ठोस उपाय काय ? ते म्हणाले सेकंड बायपास, आणि मला घाम फुटला. मिसेस मला धिर देत होति..पण माझ्या डोळ्या समोर अंधारच होता..एका संध्याकळि मि माझा मित्र सुमित कदम याला पुण्याला फोन लावला.त्याने माझे सगळे ऐकल्यानंतर मला धिर दिला आणि “ किलेशन थेरेपी ” बद्दल सांगितले. व त्यांचे 5-6 फोन नंबर व पत्ते पाठवले. आणि दुसर्या दिवशी फोन लावला.तो पनवेलचा होता. मनात म्हटले आपल्या पासून जवळ आहे. या ठिकाणी आपण उपचारासाठी जाऊया, असे आमचे ठरले.
मी, डॉक्टर श्री. सतेज बागडे साहेबांशी बोललो, त्यांनी माझ्या घाबरलेल्या मनाला धिर दिला.आणि तुमचे सगळे रिपोर्ट घेवून मला पनवेल हार्ट केअर क्लिनिक माझ्या हास्पिटल मध्ये भेटण्यास या, आम्ही दोघे गेलो, आणि दोघेही त्यांचेच पेशंट झालो.कारण माझ्या मिसेसला गुढगादुखिचा प्रचंड त्रास होता..रक्त तपासण्या तसेच कार्टोग्राफी, मिसेच चे एक्सरे अशा तपासण्या माझ्या झाल्यानंतर मी माझी आणि मिसेस सोनाबाथ,गूढग्यासाठी मशीन थेरेपी ट्रिटमेंट घेत असून माझ्या मिसेसला त्याने आराम आहे.मला हि बरे वाटत असून मला आता दम लागत नाही..माझ्यात तो पुर्विचा उत्साह पुन्हा येत चालला असून माझि ट्रिटमेंट आता शेवटच्या टप्पात आली आहे. “ किलेशन थेरेपी ” म्हणजे, कोणतेही ऑपरेशन न करता. कमरेखाली वापरलेली इसीपी मशीन थेरेपी , आणि सलाईन मार्फत,हृदयासारख्या आजारावर उपचार करण्याची कमि खर्चाचि एक उत्तम उपचारपद्धती आहे. हृद्यरोग शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर,तसेच हृद्यरोगासंमधी इसिजी, कॉर्डियोलॉजिष्ट, ऑक्सीजन पुरवठा, शस्त्रक्रिये साठी विविध मटेरियल पुरविणारे सप्लायर्स, अशा सगळयांचे हित समंधाची जवळीक असल्याकारणाने तसेच,सरकारतर्फे- किंवा प्रायव्हेट मधून या ट्रीट्मेंडला मेडिकल इन्शुरन्स मिळत असल्याने,सगळीकडेच बायपास किंवा एन्जोप्लास्टी असा स्वरूपाचे सल्ले, पेशंटच्या वयाचा विचार न करता, डॉक्टर अगदी सहजपणे देतात,. आणि हताश आजारी व्यक्ती,उपचार मेडिक्लेमनुसार फुकट होतोय म्हणून, शरीराला कायमचे अपंगत्व करणाऱ्या शस्त्रक्रियेला मान्यता देतात. परंतु शस्त्रक्रियेविना हृद्यरोगासंमधी केल्याजाणाऱ्या उपचारपद्धती विषयी “ किलेशन थेरेपी ” ला कोणीच दुजोरा देत नाही, तसेच तिच्या मेडिक्लेमसाठी कोणी प्रयत्न करत नाही. याचे वाईट वाटते.तस पहाता,आजारी व्यक्तीला रोगापासून मुक्तता मिळणे,आराम मिळणे हाच निकष जर लावला तर मला असे वाटते, “ किलेशन थेरेपी ” हि स्वस्थ,मस्त, कोणताही धोका नसलेली, शस्त्रक्रियेविना केली जाणारी चांगली उपचार पद्धत आहे. असे माझे प्रमाणिक मत झाले आहे. आपणासही वरील असा त्रास होत असेल तर. डॉक्टर श्री.सतेज बागडे यांना भेटा.92241 25241