06/09/2025
देवासारखे धावले आरपी हॉस्पिटलचे डॉक्टर… 🧑🏻⚕️🏥
अत्यंत गंभीर अवस्थेत आर.पी. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 20 वर्षीय तरुणाला आपल्या आरपी हॉस्पिटलमधील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीनं जीवनदान मिळालं.
सगळी संकटं या युवकावर एकत्रच गुदरली!
मेंदूची दुखापत, मायोकार्डायटिस, डाव्या फुफ्फुसाचा निमोनिया, जंतुसंसर्ग, रक्तदाब कमी, ऑक्सिजन पातळी घसरणे अशा जटिल अवस्थेमुळं आणीबाणीची स्थिती निर्माण झाली.. अत्याधुनिक आय.सी.यू. सुविधा व मेडिसिन विभागातील तज्ञ डॉक्टरांच्या विविधांगी उपचार पद्धतीमुळे रुग्णाला यशस्वीरीत्या स्थिर करता आले.
डॉ. संतोष हरकळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले तत्पर, सर्वंकष उपचार, आधुनिक यंत्रणांचा वापर, तब्बल 10 दिवस चाललेला व्हेंटिलेटर सपोर्ट या सर्वांचा परिणाम म्हणून हा युवक आज पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे.
अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी, तसेच मेडिसिन विभागातील डॉ. संतोष हरकळ, डॉ. सलाम तांबोळी, डॉ. शहाजी बोडखे, डॉ. दैठणकर, डॉ. दलसुख वडेखनीया, डॉ. खिलन पटेल व नर्सिंग स्टाफ या सर्वांचं मी विशेष अभिनंदन आणि कौतुक करतो.
आर.पी. हॉस्पिटलचं अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, समर्पित टीममूळं गंभीर रुग्णांनाही नवजीवन मिळतं, हीच खरी आमची ताकद आहे. आज एका तरुणाला मृत्यूच्या दारातून परत आणण्याचा चमत्कार आमच्या आर.पी. हॉस्पिटलनं करून दाखवला, याचा मला आनंद आहे.